AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 7 April 2025 : पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण: रुपाली चाकणकरांची पत्रकार परिषद; शासनाच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका

| Edited By: | Updated on: Apr 09, 2025 | 12:13 PM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 7 एप्रिल 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 7 April 2025 : पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण: रुपाली चाकणकरांची पत्रकार परिषद; शासनाच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका
live breaking

विरारमध्ये राम नवमीच्या कार्यक्रमात अज्ञात व्यक्तीकडून अंडे फेकल्याच्या आरोपावरून तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून लोकांना शांत केले. त्यामुळे अनर्थ टळला. रेशन धारक लाभार्थ्यांना इ केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढ दिली आहे. इ केवायसी न करणाऱ्यांचे रेशन बंद होणार आहे. नाशिक महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त नियुक्तीस शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारने तूर आणि हरभरा खरेदीचे आदेश काढले होते. मात्र शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. हमीभावापेक्षा बाजारात अधिकचा दर मिळत असल्याने खरेदी केंद्रात शेतमाल देण्यापेक्षा खासगी व्यापाऱ्यांना माल दिला जात आहे. पुण्यात उन्हाचा तडाखा वाढणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेशातील, क्राडी, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Apr 2025 02:54 PM (IST)

    गोदावरीसह राज्यातील नद्यांच्या संदर्भात मनसे आक्रमक

    नद्यांचे पावित्र्य जपलं जावे, प्रदूषण मुक्त नद्या व्हाव्या यासाठी मनसे आंदोलन करणार. प्रचंड पैसा खर्च करूनही नद्या प्रदूषित असल्याने मनसेने प्रशासनाला ईशारा दिला आहे. नाशिकच्या राजगड येथील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेत मनसेने भूमिका मांडली आहे.

  • 07 Apr 2025 02:34 PM (IST)

    लातूर महानगरपालिका आयुक्त मनोहरे एअर अॅम्ब्युलन्सने मुंबई विमानतळावर दाखल

    लातूरमध्ये महानगरपालिका आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यानंतर बाबासाहेब मनोहरे यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबई विमानतळावर आणण्यात आले. मुंबई वाहतूक पोलिस आणि मुंबई पोलिसांचे पथक मनोहरेला विमानतळावरून कोकिलाबेन रुग्णालयात घेऊन जात आहेत. विमानतळापासून कोकिलाबेन रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे.

  • 07 Apr 2025 02:21 PM (IST)

    काळाराम मंदिराच्या अध्यक्षांना उच्च न्यायालयाने हटकले; पूजेचे पैसे व्याजासह कोर्टात जमा करण्याचे आदेश

    नाशिकमधील काळाराम मंदिराच्या अध्यक्षांना उच्च न्यायालयाने हटकले आहे. जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश हे काळाराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष होते. दैनंदिन पूजा आणि प्रसादासाठी येणाऱ्या खर्चाला अध्यक्षांनी नकार दिला होता. आता पूजेचे पैसे व्याजासह कोर्टात जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

  • 07 Apr 2025 01:51 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात उच्चांकी; 43 अंश डिग्री तापमानामुळे नागरिकांचे गरमीने हाल

    चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात रोज नवीन उच्चांकी गाठत असल्याचे चित्र दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान 43 डिग्री इतका पोहोचलं असून नागरिकाच्या अंगाची लाही लाही होत आहे. दुपारी 12 ते 4 यादरम्यान खूपच आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडणे टाळावे असं आवाहन जिल्हा प्रशासन कडून करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य चौकातले सिग्नल हे दिवसभर चालू राहत असल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे सिग्नल 12 ते 4 च्या दरम्यान बंद ठेवण्याचंही नागरिकाचं मत आहे.

  • 07 Apr 2025 01:39 PM (IST)

    गर्भवती महिलेला रक्तस्त्राव, तरीही उपचार केले नाही, डॉ. घैसास यांनी 10 लाखांची मागणी केली: रुपाली चाकणकर

    पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेते अनेक मुद्दे मांडले. तसेच त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीकाही केली. त्या म्हणाल्या की,” गर्भवती महिलेला रक्तस्त्राव, तरीही उपचार केले नाही. मंगेशकर रुग्णालयाने रुग्णांची दखल घेतली नाही. डॉ. घैसास यांनी 10 लाख रुपये डिपॉझिट मागितले. रुग्णालयाची 3 समित्यांकडून चौकशी सुरु आहे. तसेच गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी शासनाचे अजून 2 अहवाल येणार आहेत. तर धर्मादाय आयुक्तांचा अहवाल उद्यापर्यंत (8 एप्रिल 2025) सादर होणार आहे. तसेच ‘माता मृत्यू अन्वेषण समिती सखोल अहवाल देणार आहे.” असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. तसेच अंतिम अहवालानंतर दोषींवर कारवाई होणार असल्याचं चाकणकरांनी म्हटलं आहे.

  • 07 Apr 2025 01:12 PM (IST)

    पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण: रुपाली चाकणकरांची पत्रकार परिषद; शासनाच्या अहवालात दीनानाथ रुग्णालयावर ठपका

    पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देत म्हटलं की, ” पेशंटला योग्य उपचार मिळाले नाहीत असा शासनाचा अहवाल आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. साडेपाच तास गर्भवती महिला ही रुग्णालयातच होती. त्या तासाच रुग्णालयाने योग्य ते उपचार केले नाहीत. त्वरित उपचार मिळाले असते तर रुग्ण वाचला असता. पण मंगेशकर रुग्णालयाने कोणतीही नियमावली पाळली नाही. त्यामुळे रुग्णालयावर कायदेशीर कारवाई होणार” असं चाकणकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान शासनाच्या अहवालात दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे.

  • 07 Apr 2025 12:58 PM (IST)

    तब्बल साडेपाच तास पेशंट रुग्णालयात होता, रक्तस्त्राव सुरूच होता

    तब्बल साडेपाच तास पेशंट रुग्णालयात होता, रक्तस्त्राव सुरूच होता, रुग्णाचं मानसिक खच्चीकरण झाल – रुपाली चाकणकर

  • 07 Apr 2025 12:56 PM (IST)

    पुणे – मंगेशकर हॉस्पिटलने स्वतःला वाचवण्यासाठी माहिती जाहीररित्या सोशल मीडिया वरती प्रसारित केली

    दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने रुग्णाची वैयक्तिक माहिती प्रसारित केली. मंगेशकर रुग्णालयाला याबाबत समज देण्यात येईल – रुपाली चाकणकर

  • 07 Apr 2025 12:51 PM (IST)

    नांदेड – दारू पिऊन भांडण करणाऱ्या मुलाचा जन्मदात्या आईनेच केला खून

    -दारू पिऊन भांडण करणाऱ्या मुलाचा जन्मदात्या आईनेच केला खून. नांदेडमध्ये ही घटना घडली. मयत बालाजी हा सातत्याने त्याच्या आईला आणि पत्नीला मारहाण करायचा. संतापाच्या भरात आईने  धारदार शस्त्राने मुलाच्या डोक्यात वार केले . याप्रकरणी दुसऱ्या मुलाने दिलेल्या फिर्यादवरून भोकर पोलीस ठाण्यात नागाबाई राऊत हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

  • 07 Apr 2025 12:34 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायबर लॅबचं उद्घाटन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायबर लॅबचं उद्घाटन. मुंबई पोलिसांच्या ताफ्यात सायबर लॅब समाविष्ट. सायबर गुन्ह्याची उकल करण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल.

  • 07 Apr 2025 12:24 PM (IST)

    पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणातील अहवाल सरकारल सादर

    पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणातील अहवाल सरकारल सादर. रुग्ण एकाच ठिकाणी असता, तर जीव वाचला असता असा उल्लेख समितीच्या अहवालात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्या महिला रुग्णाला दाखल करून घेणं आवश्यक होतं असंही अहवालात नमूद करण्यात आल्याची महिती मिळत आहे.

  • 07 Apr 2025 12:05 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अमरावतीमध्ये शिवसेना उबाठा पक्षाकडून रास्ता रोको

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अमरावतीमध्ये शिवसेना उबाठा पक्षाकडून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शिवसैनिक आक्रमक झालेत.

    निवडणुकीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यामुळे सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे या मागणीसाठी अमरावतीच्या पंचवटी चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचा रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

  • 07 Apr 2025 11:45 AM (IST)

    Maharashtra Breaking : विक्रोळी पार्कसाईट, भांडुपमध्ये 40 वर्षांपासून डोंगराळ भागात पाण्याची समस्या

    आंदोलने, मोर्चे काढून देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेन… महापालिका नवी जलवाहिनी आणि पाण्याची टाकी कधी टाकणार… डोंगराळ भागामुळे काही तांत्रिक कारणास्तव पाणी पुरेशा दाबानेवर चढत नाही…

  • 07 Apr 2025 11:27 AM (IST)

    Maharashtra Breaking : नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी गावची धक्कादायक घटना

    नवऱ्याने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न… मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकत घरही पेटवून दिले… घटनेत बायको स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे भाजल्या गेल्याने गंभीर जखमी… घटनेत आरोपी पती केदार हंडोरे स्वतःही जखमी… घटनेमागील कारण अस्पष्ट, पुढील तपास सुरू… जखमी नाशिक मधील खाजगी रुग्णालय उपचारासाठी दाखल…

  • 07 Apr 2025 11:14 AM (IST)

    Maharashtra Breaking : “वक्फ सुधारणा कायद्याविरोधात दाखल असेलल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्या”

    सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकिलांनी प्रकरण केलं मेंशन… जमात उलेमा ए हिंद यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टापुढे प्रकरण केलं मेंशन… “आम्ही प्रकरण तपासून सुनावणीची तारीख देवू… आज दुपारनंतर आम्ही प्रकरण पाहून तारीख निश्चित करू”, सुप्रीम कोर्टाकडून वकिलांना आश्वासन… वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका झाल्या आहेत दाखल

  • 07 Apr 2025 10:57 AM (IST)

    पेशंटच्या गोपनीय गोष्टी जाहीर केल्या ते अत्यंत चुकीचं – रुपाली चाकणकर

    “रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी जो अहवाल सादर केला, त्यात त्यांनी पेशंटच्या गोपनीय गोष्टी जाहीर केल्या ते अत्यंत चुकीचं आहे. रुग्णालयाने ज्या गोष्टी समिती समोर मांडायला हव्या होत्या, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या. रुग्णालयाला मी कडक समज देते” असं राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर म्हणाल्या.

  • 07 Apr 2025 10:24 AM (IST)

    मोदी 2025 पर्यंत सत्तेवर राहतील का? ही मला शंका – संजय राऊत

    “मोदी 2025 पर्यंत सत्तेवर राहतील का? ही मला शंका. ट्रम्प यांच्याकडून मस्कला अमेरिका विकली जात आहे. अमेरिकेप्रमाणे भारताच्या जनतेचाही स्फोट होईल. आपल्या देशातही अदानींना सर्व विकलं जात आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

  • 07 Apr 2025 10:22 AM (IST)

    वक्फच्या जमिनी घशात घालण्याठी विधेयक आम्ही त्याला विरोध केला – संजय राऊत

    “डोनाल्ड ट्रम्प यांना जाब विचारणाऱ्या अमेरिकी जनतेच अभिनंदन केलं पाहिजे. वक्फ बिलाचा संबंध इस्टेट आणि प्रॉपर्टीशी. वक्फच्या जमिनी घशात घालण्याठी विधेयक आम्ही त्याला विरोध केला. जमिनी विकू असं शाहच्या भाषणात सतत होतं” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

  • 07 Apr 2025 10:19 AM (IST)

    भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमक्या

    भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांचा आणि अनधिकृत मशिदींचा प्रश्न लावून धरला आहे. शिवाजी नगर गोवंडीमधील 72 मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत त्यांनी तक्रार केली आहे. यावरुन त्यांना आता सोशल मीडियावर धमकावले जात आहे.

  • 07 Apr 2025 09:54 AM (IST)

    नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी गावची धक्कादायक घटना

    नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी गावची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकत घरही पेटवून दिलं. या घटनेत बायको स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे भाजल्या गेल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेत आरोपी पती केदार हंडोरे स्वतःही जखमी झाला आहे. या घटनेमागील कारण अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे.

  • 07 Apr 2025 09:40 AM (IST)

    ठाण्यातील बेकायदा शाळांना ठोकणार टाळं

    वार्षिक परीक्षा झाल्यानंतर ठाण्यातील सर्व बेकायदा शाळांना टाळं ठोका, असे स्पष्ट निर्देश ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या आदेशांनंतर बेकायदा शिक्षण संस्था चालवणाऱ्या संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. प्रशासनाननेही लेखी आदेश काढत कारवाईला सुरुवात केली आहे.

    ठाणे महापालिका हद्दीत ८१ बेकायदा शाळा आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळा मुंद्रा आणि दिवा विभागात आहेत. अशा शाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. बेकायदा शाळांवर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने ९ पथकांची स्थापना केली आहे

  • 07 Apr 2025 09:31 AM (IST)

    शेअर बाजार उघडताच मोठी पडझड

    शेअर बाजार उघडताच मोठी पडझड पहायला मिळत आहे. ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार माजला आहे. निफ्टीची लोअर सर्किटच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतीय शेअर बाजारात पडझड पहायला मिळतेय. सेन्सेक्स 3 हजार तर निफ्टी 1 हजार अंकांनी घसरला आहे.

  • 07 Apr 2025 09:20 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर-मध्य श्रीलंकेतील अनुराधापुरा येथे भेट

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर-मध्य श्रीलंकेतील अनुराधापुरा इथं भेट दिली. भारताच्या मदतीने दोन रेल्वे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसनायके यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर 14 भारतीय मच्छीमारांची श्रीलंकेकडून सुटका करण्यात आली. राष्ट्रपती दिसनायके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाबोधी मंदिराला भेट दिली.

  • 07 Apr 2025 09:10 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ, 400 एकर मधील मक्याचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त

    गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला असून 400 एकरमधील मक्याचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. आरमोरी तालुक्यातील आकापूर, सूर्य डोंगरी, केटाळी, पंजेवाही याठिकाणी रानटी हत्तींच्या कळपाने हैदोस घातला. यामुळे एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचे हात रिकामे झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन लागवड केली होती.

  • 07 Apr 2025 09:00 AM (IST)

    कल्याण पूर्वेत राम नवमीच्या मिरवणुकीत नथुराम गोडसेचे फलक

    राम नवमीनिमित्त कल्याण पूर्वेत मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत कल्याण पूर्वेतील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक झळकावले. मात्र याच मिरवणुकीत काही जणांनी नथुराम गोडसे यांचे फलक झळकावले. नथुराम गोडसे यांचे फलक झळकावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

  • 07 Apr 2025 08:50 AM (IST)

    ठाण्यातील बेकायदा शाळांना ठोकणार टाळे

    वार्षिक परीक्षा झाल्यानंतर ठाण्यातील सर्व बेकायदा शाळांना टाळे ठोका, असे स्पष्ट निर्देश ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या आदेशांनंतर बेकायदा शिक्षण संस्था चालवणाऱ्या संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. प्रशासनाननेही लेखी आदेश काढ़त कारवाईला सुरुवात केली आहे.

  • 07 Apr 2025 08:35 AM (IST)

    दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर सलग चौथ्या दिवशी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विविध पक्ष,संघटनांच्या वतीने मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात आंदोलन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून खबरदारी म्हणून बंदोबस्त लावला आहे.

  • 07 Apr 2025 08:14 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात तापमानाने चाळीसी ओलांडली

    पुणे शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ झाल्याने उष्णतेचा पारा पुन्हा ४१ अंशांच्या पुढे पोहोचला आहे. रविवारी (दि. ६) शहरात उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला होता. पाषाण येथे सर्वाधिक ४१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

Published On - Apr 07,2025 8:13 AM

Follow us
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.