Maharashtra Breaking News LIVE 19 April 2025 : महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाषिक वाद -संजय राऊत
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 19 एप्रिल 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांना त्वचा विकारांचा धोका आहे. महिन्याभरात मुंबईत त्वचेच्या विकाराचे 35 टक्के रुग्ण वाढले असून घाम येण्यामुळे जीवाणुजन्य, बुरशीजन्य विकार, घामोळे यामुळे नागरिक हैराण झालेत. जळगावातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात तब्बल 20 दिवसांपासून जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. शेगाव तालुक्यातील गावांमध्ये नखं गळतीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून पुन्हा 3 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत नखं गळणाऱ्या रुग्णाची संख्या 40 वर पोहचली असून नागरिकांमध्ये चिंतेंचे वातावरण कायम आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी ते समाज कल्याण कार्यालय सभागृहात आदिवासी विकास विभागाचा आढावा घेणार असून दुपारी 12.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह वैद्यकीय महाविद्यालय परिसरात शिक्षक मेळाव्याला उपस्थित राहतील. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
गडचिरोलीत पोलिसांना मोठं यश, 40 लाखांचं बक्षीस असलेल्या चार नक्षलवाद्यांना अटक
गडचिरोलीत पोलिसांना मोठं यश, 40 लाखांचं बक्षीस असलेल्या चार नक्षलवाद्यांना अटक
दक्षिण गडचिरोली विभागीय सचिव व भामरागड एरिया कमिटीचा सचिव या दोघांसह दोन नक्षलवादी संघटनेच्या सदस्यांना अटक
या चार नक्षलवाद्यांवर जाळपोळ, भूसुरंग स्फोट घडविणे, हत्या, चकमक असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
१) सायलु भुमय्या मुड्डेला
२) जैनी भीमा खटाराम
३) तलांडी गंगू
४) सरिता गावडे
अशी अटक झालेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत.
-
मुंबई-आग्रा महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, दोन जखमी
मुंबई-आग्रा महामार्गावर कारचा भीषण अपघात
अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी
कारवरील नियंत्रण सुटल्याने कार बाजूच्या नालीला जाऊन धडकली
जखमींना तातडीनं स्थानिकांच्या मदतीनं कासारा येथील रुग्णालयात करण्यात आलं दाखल
-
-
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंदूवरील अन्यायाचा बजरंग दलाकडून निषेध
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंदूवरील अन्यायाचा बजरंग दलाकडून निषेध
गोंदिया शहरातील नेहरू चौक ते प्रशासकीय इमारतपर्यंत काढला निषेध मोर्चा
तहसीलदारांमार्फत पाठविले राष्ट्रपतींना निवेदन
-
Maharashtra Breaking: टोमॅटोला भाव मिळेना, शेतकऱ्यांनी केला ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाल चिखल
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील शेतकरी आक्रमक… जवळपास 200 शेतकऱ्यांनी केली टोमॅटोची लागवड… शेतकऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी… जेव्हा टोमॅटोचा भाव दोनशे रुपये किलो झाला तेव्हा श्रीमंतासाठी सरकारने विदेशातून टोमॅटो मागवले…
-
Maharashtra Breaking: गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी – मुख्यमंत्री फडणवीस
गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली… बीड जिल्ह्याशी आमचं वेगळं नातं तयार झालं आहे… बीडमध्ये 93 वर्षांपासून सप्ताह सुरु आहे… गडाची जबाबदारी आम्ही सगळे मिळून घेऊ… असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
-
-
Maharashtra Breaking: महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंची भूमिका
महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंची भूमिका… आमच्यातले वाद, भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र खूप मोठा आहे… असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी उद्धव ठाकरेंना राज यांचा प्रस्ताव… मी सोबत काम करावं ही उद्धव ठाकरेंची इच्छा आहे का…? असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थीत केला.
-
Maharashtra Breaking: अंबाजोगाई महिला वकील मारहाण प्रकरण
ॲड. ज्ञानेश्वरी अंजन घेणार बीड पोलीस अधीक्षकांची भेट… मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी,मला आणि कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावं… या मागण्या साठी घेणार बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट…
-
विरोधी पक्षांचे माईक बंद केले जातात
संसद संसद राहिली नाही, जनतेच्या प्रश्नावर चर्चा होऊ देत नाही. विरोधी पक्षाचे माईक बंद केले जातात. कुंभमेळाव्यात २०० पेक्षा जास्त लोक मेल्याचे माहिती देत होत आसतांना माझा माईक बंद केला होता, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
-
अमरावतीत बजरंग दलाचे आंदोलन
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकार विरोधात अमरावतीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन केले. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा आंदोलकांनी आरोप केला. अमरावतीच्या राजकमल चौकात बजरंग दलाने आंदोलन केले.
-
साखर उद्योग हा ग्रामीण उद्योगांचा कणा
गळीत हंगामाचा कालावधी दिवसेंदिवस कमी होतोय. साखर धंद्याच शास्त्र अडचणीत येत आहे. जे- जे काही नवीन करू शकतो. जे काही नुकसान होतय, त्याची नुकसानभरपाई होण्याची काळजी घेतल्यास साखर धंद्याच अर्थकारण मजबूत होईल. साखर उद्योग हा ग्रामीण उद्योगांचा कणा आहे असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.
-
मनसे नेते महेंद्र भानुशाली यांची राऊतांवर टीका
संजय राऊत हा पगारावर बोलणारा माणूस आहे, ते उद्धव ठाकरेंकडून पगार घेतात आणि दररोज सकाळी बोलतात. शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राजसाहेब ठाकरे ज्या भाषेत बोलले होते ती भाषा संजय राऊत यांना ऐकू आली नाही का? संजय राऊत संपूर्ण भाषण शांतपणे ऐकत होते, अशी टीका मनसे नेते महेंद्र भानुशाली यांनी केली.
-
हिंदी सक्तीविरोधात मनसेचे आंदोलन
महाराष्ट्रात हिंदीची सक्ती विरोधात मनसे कार्यकर्ते घाटकोपर असल्फा येथे आंदोलन करणार आहेत. मनसेच्या आंदोलनापूर्वी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
-
पृथ्वी वाचवण्यासाठी देशपातळीवर काम-पाशा पटेल
२२ एप्रिलला जागतिक वसुंधरा दिवस आहे. हा वसुंधरा दिन देशातील ८ राज्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती शेतकरी नेते पाशा पटेल यांनी दिली आहे. पृथ्वीवर अलिकडच्या काळात ५० अंश सेल्सिअस तापमान होणार आहे. असं बोललं जात आहे. त्यामुळे पृथ्वीवर माणूस जीवंत राहील का नाही? असा सवाल उपस्थित होत आहे
-
राज्यातील शिंदे – भाजपचे मंत्री टँकर माफीयांकडून पैसे घेतात
राज्यातील शिंदे – भाजपचे मंत्री टँकर माफीयांकडून पैसे घेतात, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. राज्यात जनतेला पाणी टंचाईच्या झळा बसत असल्याचे ते म्हणाले.
-
अमरावतीमध्ये संत्रा बागा धोक्यात
विदर्भातील वाढत्या तापमानाने अमरावती जिल्ह्यातील संत्र्याचा आंबिया बहार धोक्यात आला आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने संत्रा गळतीचे प्रमाण वाढले आहे. हजारोंचा खर्च करूनही फुलवलेल्या बागा उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
-
संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार नाही- सुळे
माझे आणि संग्राम थोपटे यांची भेट नाही. माझे त्यांच्याशी चांगले संबंध राहिले आहेत. ते माविआमध्ये राहतील. त्यांनी चांगले काम केले आहे. ते भोरसाठी योग्य निर्णय घेतील, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी थोपटे यांच्या भाजप प्रवेशावरील चर्चेवर म्हटले आहे.
-
ससूनच्या अहवालावर सुप्रियांची टीका
ससून रुग्णालयाने गर्भवती महिला प्रकरणात दिलेल्या अहवालावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. आपणास हा अहवाल अमान्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
-
नाशिक काठे गल्ली परिसरातील रस्ता अखेर वाहतुकीचसाठी खुला
नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील रस्ता अखेर वाहतुकीचसाठी खुला करण्यात आला. तीन दिवसानंतर पोलीसांनी रस्त्यावरील बॅरिकेट हटवले आहे. काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा नाशिक महापालिकाने हटविला आहे.
-
पुणे – भाजप कार्यकर्त्यांनी फाडले काँग्रेसचे बॅनर
पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे बॅनर फाडले. सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे फोटो असणारं पोस्टर फाडण्यात आलं. बॅनर्स फाडल्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
हिंदी भाषा ही वेगळी भाषा नाही राज ठाकरे यांचे जे मत असेल ते असेल – गिरीश महाजन
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे त्यामुळे हिंदी आपल्याला आलीच पाहिजे. मराठीची सक्ती आपण करतोच आहोत, या राज्यात जो राहील त्याला मराठी आलीच पाहिजे.
हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा आहे त्यामुळे हिंदी भाषा आली पाहिजे या मताचा मी आहे. हिंदी भाषा ही वेगळी भाषा नाही राज ठाकरे यांचे जे मत असेल ते असेल, ज्या देशात आपण राहतो त्या देशाची राष्ट्रभाषा जी आहे ती हिंदी आहे त्यामुळे प्रत्येकाला ती आली पाहिजे, असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं.
-
केबल चोरी झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत
खडवली – टिटवाळा स्थानकांदरम्यान पहाटे 4.25 सुमारास केबल चोरी झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या गाड्या ठप्प झाल्या असून रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे.
-
कैऱ्या तोडण्यावरून मुलांमध्ये वाद, वडिलांवर चाकू हल्ला
कैऱ्या तोडण्यावरून मुलांमध्ये वाद झाल्यानंतर मुलाच्या वडिलांवर चाकूने हल्ला करण्यात आला. कल्याण मधील धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीसांनी तपास सुरू केला आहे.
-
शेगाव तालुक्यातील गावांतील नखं गळतीच्या रुग्णांची संख्या वाढली, नागरिक चिंतेत
शेगाव तालुक्यातील गावांमध्ये नखं गळतीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून पुन्हा 3 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत नखं गळणाऱ्या रुग्णाची संख्या 40 वर पोहचली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे.
-
वाढत्या तापमानामुळे मुंबईकर हैराण, त्वचा विकारांचाही धोका वाढला
वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांना त्वचा विकारांचा धोका आहे. मुंबईत आणखी 2 ते 3 अंशांनी तापमान वधारणार, राजस्थानमधील उष्णतेचे वारे राज्याकडे सरकत आहेत. महिन्याभरात मुंबईत त्वचेच्या विकाराचे 35 टक्के रुग्ण वाढले असून घाम येण्यामुळे जीवाणुजन्य, बुरशीजन्य विकार, घामोळे यामुळे नागरिक हैराण झालेत.
Published On - Apr 19,2025 8:57 AM
