Maharashatra News Live : मुसळधार पावसाने गंगाखेड-वडगाव जवळ रेल्वेचा ट्रॅक खचला, अनेक गाड्या रद्द
Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

मुंबईत पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून अधून-मधून पावसाचा जोर वाढत आहे. पावसाचा जोर कायम राहिले तर अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे कल्याण वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या पाच ते दहा मिनिटे उशिराने सुरू आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव मुळे पुढील पाच दिवस पुण्यासह राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 29 सप्टेंबर पर्यंत जोरदार पाऊस तर 30 सप्टेंबर पासून पाऊस काही प्रमाणात कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
मुसळधार पावसाने गंगाखेड-वडगाव जवळ रेल्वेचा ट्रॅक खचला, अनेक गाड्या रद्द
मुसळधार पावसामुळे गंगाखेड-वडगाव जवळ रेल्वेचा ट्रॅक खचल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. गेल्या दोन तासांपासून परळी-बेंगळुरू-नांदेड एक्स्प्रेस गाडी परळी स्थानकावर उभी आहे. वडगाव ते गंगाखेड दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यामुळे ट्रॅक खचला आहे. त्यामुळे नांदेड बंगळूर रेल्वे परळी स्थानकात थांबवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच, नांदेड–पनवेल एक्स्प्रेस तब्बल 4 तास उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
-
तामिळनाडूत विजय थलापाथीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, दोघाांचा मृत्यू
मोठी बातमी समोर आली आहे. तामिळनाडूत विजय थलापाथीच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याचं समोर आलं आहे. या चेंगराचेंगरीत दोघाांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-
-
शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल. त्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. मुख्यमंत्र्यांनी जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळेस फडणवीस यांनी शब्द देत शेतकऱ्यांना दिलासा दिला.
-
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात मुसळधार पाऊस, नदी-नाले तुडुंब
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले आहेत. आसोला गावातील काही विद्यार्थी मानोरा येथे शाळेत गेले होते. शाळा सुटल्यानंतर घरी परतताना आसोला–मानोरा रस्त्यावरील नाल्याला पूर आल्याने विद्यार्थी अडकले. दरम्यान, स्थानिकांनी तत्परता दाखवत ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्सी बांधून दोन ते तीन विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे दुसऱ्या बाजूला नेले.
-
भारतीय नौदलाने जागतिक पातळीवर दाखवली बचावाची क्षमता
XPR-25 दरम्यान भारतीय नौदलाने दक्षिण चीन समुद्रात परदेशी पाणबुड्यांसोबत पहिलंच यशस्वी मिशन राबवलं. यावेळी मदत आणि बचाव कार्यांचा संपूर्ण स्पेक्ट्रम आयोजित केला होता. तीन दिवसांत ROV ऑपरेशन्ससह तीन यशस्वी सोबत्यांनी भारताच्या वाढत्या जागतिक बचाव क्षमतांचे प्रदर्शन केले.
#WATCH | Indian Navy achieved maiden mating with foreign submarines in the South China Sea during XPR-25, conducting a full spectrum of Intervention & Rescue Operations. Three successful mates, including ROV ops over three days, showcased India’s growing global rescue… pic.twitter.com/piPKmPpfKP
— ANI (@ANI) September 27, 2025
-
-
शैलेश कुमारने पुरुषांच्या उंच उडी T63 फायनलमध्ये सुवर्णपदक
जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारताच्या शैलेश कुमारने पुरुषांच्या उंच उडी T63 फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले. वरुण सिंग भाटीने कांस्यपदक जिंकले.
-
चीन-पाकिस्तान सीमेवर तैनात होणार ‘अनंत शस्त्र’
भारतीय लष्कराने आपले हवाई संरक्षण बळकट करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तान-चीन सीमेवरील हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी 30 हजार कोटींचे निविदा जारी केली आहे.
-
झुबिन गर्ग प्रकरणात लूकआउट नोटीस
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, ईशान्य महोत्सवाचे आयोजक आणि गायक झुबिन गर्ग यांच्या व्यवस्थापकाविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.
-
नेपाळ: जाळपोळीतून ‘Gen-Z सरकार’ स्थापन – माजी पंतप्रधान ओली
नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली काठमांडूमध्ये म्हणाले, “सध्याच्या सरकारला ‘Gen-Z सरकार’ म्हटले जाते, जे संवैधानिक तरतुदींनुसार किंवा लोकांच्या मताने स्थापन झालेले नाही. ते तोडफोड आणि जाळपोळीद्वारे स्थापन झाले आहे.”
-
लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करणाऱ्यां अज्ञात इसमाविरोधात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल
लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करणाऱ्यां अज्ञात इसमां विरोधात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुका पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर नगर दौडं महामार्गावर हल्ला करण्यात आला होता. दैत्यनांदूर या ठिकाणी ओबीसी मेळाव्यासाठी जात असतांना अहिल्यानगरमध्ये हल्ला झाला होता. तिघांना ताब्यात घेऊन पुढील तपास करत असल्याची उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष ओमने यांनी माहिती दिली.
-
सोलापूर: मोहोळमध्ये नागरिकांसाठीचे धान्य दाखल
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता मोहोळमध्ये जनावरांना आणि नागरिकांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. यासाठी मोहोळच्या शासकीय गोदामात पशुखाद्य आणि धान्य दाखल धाले आहे. पूरग्रस्त 2 हजार 849 कुटुंबांना प्रत्येकी 10 किलो गहू आणि तांदूळ वाटप करण्यात येणार आहे.
-
डोंबिवली: मुख्याध्यापकाचा शाळकरी विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार
निळजे गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रभारी मुख्याध्यापकांनी सहा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. संतप्त गावकऱ्यांनी प्रभारी मुख्याध्यापकाला चोप देत मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. महेंद्र खैरनार असे प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव असून मानपाडा पोलीसांनी आता गुन्हा दाखल केला आहे.
-
नंदुरबार: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात
अनेक दिवसास प्रतीक्षा नंतर नंदुरबार शहर आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता ढगाळ वातावरणामुळे संपूर्ण शहर व परिसरात अंधार पसरला आहे. शहरातील अनेक सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
-
जालना : सरकारचं शिष्टमंडळ धनगर उपोषण स्थळी दाखल
धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मागील 10 दिवसापासून जालना येथे दीपक बोऱ्हाडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 11 वा दिवस आहे. आज सरकारचे शिष्टमंडळ जालन्या पोहोचले आहे. सरकारच्या शिष्टमंडळामध्ये मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे यांचा समावेश आहे.
-
वाशिम जिल्ह्याला पावसानं झोडपलं, दोन दिवसांपासून पाऊस सुरूच
दोन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू
रात्रीपासून सुरू असलेल्या संतधार पावसामुळे जन जीवन विस्कळीत
शेतकऱ्यांना मोठा फटका शेतीचं प्रचंड नुकसान
शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचीही चिंता वाढली
नदी ,नाल्यांच्या पाणीपातळी वाढ
-
चांदी कडाडली, जळगावच्या सराफा बाजारात दरानं रचना नवा उच्चांक
जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दराने इतिहास रचला असून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरामध्ये तब्बल साडेचार हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 44 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
-
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, आमदार रवी राणा यांची मागणी
राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे. आपण शेतकऱ्यांच्या व्याथा मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. राज्यात पावसाचा पिकांना चांगलाच फटका बसला असून मोठं नुकसान झालं आहे.
-
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जोरदार राडा, तक्रार करण्यासाठी आलेले तरुण आपसात भिडले
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जोरदार राडा
पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आलेले तरुण आपसात भिडले
तक्रारीचे क्रेडिट आपल्याला मिळावं म्हणून एकाच गटातील लोक आपसात भिडले
काही तरुणांना काेळसेवाडी पोलिसांनी घेतलं ताब्यात.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
-
सांगली शहरातील वाहतूक विस्कळीत
सांगलीहून उपनगराकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्यामुळे तसेच पूर झाल्यामुळे शहरातील अनेक सखल मार्ग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सांगली शहरातील अनेक मार्गांवरील वाहतूक ही विस्कळीत झाली आहे.
-
अजित पवारांनी घेतला नांदेडच्या पूर्व परिस्थितीचा आढावा
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अजित पवार यांच्याशी संवाद साधला. व्हिडीओ कॉलवर अजित पवार यांनी नांदेडच्या पूर्व परिस्थितीचा आढावा घेतला.
-
नांदेडमध्ये वीज पडून 45 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
नांदेडमधील कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे दुर्घटना घडली आहे. वीज पडून 45 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
-
कर्जमाफीसाठी पुराच्या पाण्यात बसून शेतकऱ्याची सरकारला विनंती
नांदेडच्या मालेगांवमध्ये रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यानंतर इथले कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी भगवान इंगोले यांनी कर्जमाफी द्या म्हणत पुराच्या पाण्यात व्हीडिओ बनवला आहे. शेतकऱ्याचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
-
शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाही
सोलापुरातील मोहोळ तालुक्यात शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत पोहोचली नाही. दहा किलो गहू, तांदूळ तसेच जनावरांना चारा शासनातर्फे देण्यात येणार आहे. मात्र अद्यापही मोहोळ मधील शेतकऱ्यांना शासकीय धान्य तसेच जनावरांचा चारा मिळाला नाही. शेतकऱ्यांकडून प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त होत आहे
-
पंढरपूर तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे अक्षरशः हवालदिल
पंढरपूर तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे अक्षरशः हवालदिल झाले आहेत. नुकसान झाल्यानंतर सावकाराचे पैसे कसे फेडायचे? नुकसान भरपाई कधी मिळणार? असा आक्रोश शेतकरी करत आहेत. या तणावातूनच एका शेतकऱ्याने स्वतःच्या बागेत डोक्यात दगड घालत आत्महत्येचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पेरूच्या बागेत वाहत असलेल्या पाण्यात उभा राहून शेतकऱ्यांनी फोडलेला टाहो आज सर्वांच्या डोळ्यात पाणी आणतो आहे.
-
रेणा नदीला पूर, गावांचा संपर्क तुटला
अतिवृष्टी पावसामुळे रेणा नदीला पूर अनेक गावांचा संपर्क तुटला तर शेतांना तळ्याचे स्वरूप आले. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर ते बर्दापूर जाणाऱ्या मार्गावर रेना नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. गेल्या चार दिवसानंतर पुन्हा पावसाने रात्रीपासून दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे अनेक शेतात तळ्याचे स्वरूप आले आहे
-
जेऊरमध्ये मध्यरात्रीपासूनच्या पावसामुळे पूरसदृश स्थिती
जेऊरमध्ये मध्यरात्रीपासूनच्या पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली. सरपंच पृथ्वीराज पाटील यांनी वृद्ध महिलेला पाण्यातून काढले बाहेर काढले. करमाळा तालुक्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जेऊर गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या वेळी, जेऊर गावचे सरपंच तथा आमदार नारायण पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांनी तत्परता दाखवत एका वृद्ध महिलेला कमरेइतक्या पाण्यातून उचलून सुरक्षित स्थळी नेले.
-
आम्ही पंचाग काढून नाही बसलो
शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी करणे जर राजकारण असेल तर हो ते राजकारण आहे. आम्ही पंचाग काढून नाही बसलो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला लगावला. शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त करा अशी मागणी त्यांनी केली.
-
सरकारची मदत तुटपूंजी -उद्धव ठाकरे
सरकारने आता जी मदत देऊ केली आहे. ती अगदीच तुटपूंजी आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. खूप मोठं नुकसान झालं आहे. दोन-तीन वर्ष त्यांना या संकटातून बाहेर पडायला लागेल. विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तकं वाहून गेली आहे.
-
मराठवाड्यात आकाश फाटलं
मराठवाड्यात आकाश फाटलं आहे. अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं झाले. पीक उद्धवस्त झालं. पीकं सडलेली होती. शेतात पाणी होतं. शेतकरी धायमोकलून रडत होते. शेतकरी आपुलकीने माझ्याशी बोलले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
-
सरकारच शिष्टमंडळ आज दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेणार
सरकारच शिष्टमंडळ आज ४ वाजता दीपक बोऱ्हाडे यांची जालना येथे भेट घेणार. धनगर उपोषण करते दीपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाचा आज अकरावा दिवस. धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आमरण उपोषण सुरु. शिष्टमंडळामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे,मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचा समावेश. दीपक बोराडे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणार असल्याची शक्यता.
-
आता सदाभाऊ खोत यांना हाकलून लावले यापुढे जनता तुडवल्याशिवाय राहणार नाही
आता सदाभाऊ खोत यांना हाकलून लावले यापुढे जनता तुडवल्याशिवाय राहणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. आज सोलापूर मध्ये सदाभाऊ खोत यांना हाकलून लावण्यात आलं यावर प्रहार नेते बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. आज घर,शेत जमीन पाण्याखाली गेल असेल तर किमान दोन वर्ष शेतकऱ्यांना सावरता येणार नाही. सरकार एनडीआरएफच्या निकषा बाहेर जायला तयार नाही. या निकषानुसार अनुदान कधी मिळेल याची शाश्वती नाही, असे ते म्हणाले.
-
सीना नदीच्या पुरामुळे शेती पाण्यात वाहून गेली
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात सीना नदीच्या पुरामुळे शेती पाण्यात वाहून गेली. भोयरे गावातील सीना नदीकाठचा अर्धा एकर ऊस मातीसह वाहून गेला. आमचं घर पूर्णतः पाण्यात गेलं, शेती वाहून गेली आता आमच्याकडे काहीच राहिले नाही. नदीचे पाणी अचानक रात्रीत वाढल्याने आम्ही जीव मुठीत धरून घर सोडून पळालो. आमची उसाची अर्धा ते पाऊण एकर शेती नदीच्या पुरात वाहून गेली.अजूनही थोडी थोडी करत शेती वाहून जात आहे मात्र अद्यापही प्रशासनाकडून पंचनामे झाले नाहीत.
-
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
नाशिक निफाड येथे वातावरणाचा चाळीत साठवलेल्या कांद्याला फटका. तब्बल 50 टक्क्यांहून अधिक कांदा खराब निघत असल्याने शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी. ऐन सणासुदीच्या काळात कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. विक्री झालेल्या व विक्रीसाठी असलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 2000 रुपये अनुदान दया शेतकऱ्यांची मागणी.
-
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला
अहिल्यानगर जवळ असलेल्या आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर हाके यांच्या गाडीवर अज्ञात तरुणांनी केला हल्ला. नाश्ता करून पुढे जात असताना अज्ञात तरुणांनी काठ्यांनी गाडीवर केला हल्ला. आज पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी जात होते लक्ष्मण हाके.
-
नांदेडमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस…
हवामान विभागाच्या वतीने आज नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट… जिल्ह्यातील नदीला मोठा पूर… नांदेडच्या लोहा तालुक्यातील लोंढे सावंगी गावात शेती पिकाचा प्रचंड मोठ्या नुकसान… संपूर्ण कापूस, सोयाबीन पीक गेले पाण्याखाली…
-
सांगली महापालिका क्षेत्रातल्या सर्व शाळांना पालिके प्रशासनाकडून सुट्टी जाहीर
सांगली शहरासह परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे पालिका प्रशासनाने घेतला निर्णय… काल रात्रीपासून सांगली शहर परिसरात पाऊसाची सुरू आहे संततधार…
-
नांदेडच्या लोहा तालुक्यातील लोंढे सांगवी येथे कापूस – सोयाबीन पाण्याखाली
कापूस पाण्याखाली गेल्याने महिला भगिनींनी फोडला टाहो… लाडक्या भाऊंनी आता लाडक्या बहिणीकडे पहावं… लाडक्या भाऊंनी आता बहीण भावाचं नातं पाळावं… कापूस पाण्याखाली गेल्याने धायमोकळून रडल्या लाडक्या बहिणी
-
सर्व शाळांना पालिके प्रशासनाकडून सुट्टी जाहीर
सांगली महापालिका क्षेत्रातल्या सर्व शाळांना पालिके प्रशासनाकडून सुट्टी जाहीर.सांगली शहरासह परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे पालिका प्रशासनाने घेतला निर्णय
-
सोलापूर जिल्हात पावसाचा कहर
अक्कलकोट तालुक्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे रिधोरे गावाला बसला होता पाण्याचा वेढा. सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्परता दाखवत रिधोरे गावच्या ग्रामस्थाना तात्काळ सुरुक्षित स्थळी हलवले.
-
पावसाचा रेड अलर्ट
सीना नदीत आज पुन्हा ७५ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आलंय. आताच कुठे पुरस्थिती ओसरली असताना पुन्हा एकदा कोळेगाव चांदणी,खासापुरी-या तिन्ही मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने पुरस्थितीची शक्यता वर्तवली आहे-
-
राऊतांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
तुम्ही शेण खाता त्यावर बोला म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
-
भूम तालुक्यातील पाथरूड परिसरात जोरदार पाऊस
ईट आणि पाथरूड गावचा संपर्क तुटला. ईट आणि पाथरूड ला जोडणाऱ्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी रस्ता वाहतुकीसाठी बंद….
-
राज्यात आधी नगरपालिका की जिल्हा परिषद निवडणूक ?
राज्यात आधी नगरपालिका की जिल्हा परिषद निवडणूक होणार ? निवडणूक आयोगाची दोन्ही निवडणुकांसाठी तयारी सुरू झाली आहे. नगरपालिकांची निवडणूक घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी तर अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीस अडचण येत आहे.
-
धाराशिव – मुसळधार पावसाने कळंब तालुक्यातील संजीतपुर गावचा संपर्क तुटला
धाराशिव – मुसळधार पावसाने कळंब तालुक्यातील संजीतपुर गावचा संपर्क तुटला आहे. रात्रभर पडलेल्या पावसाने तेरणा नदीला पूर, तेरणा नदीच्या परिसरातील गावांना अलर्ट देण्यात आलाय. कळंब तालुक्यातील संजीतपुर गावातून जाणाऱ्या तेरणा नदीच्या पुलावर पाणी आल्याने या गावचा संपर्क तुटला आहे
-
लातूर – निलंगा ते कासार शिरसी मार्गावरचा पूल पाण्याखाली
लातूर – निलंगा ते कासार शिरसी मार्गावरचा पूल पाण्याखाली गेला आहे. नदीच्या पुरामुळे हा मार्ग बंद झाला असून त्यामुळे अनेक गावांचा संपर्कसुद्धा तुटला आहे. नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.
-
मध्यरात्रीपासून धाराशिव जिल्ह्यातील भूम परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू
मध्यरात्रीपासून धाराशिव जिल्ह्यातील भूम परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू असून पावसामुळे शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. उभ्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पुढील दोन दिवस धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यातल आला आहे.
-
धाराशिव – बोरखेडा येथे तेरणा नदीच्या पुरात शेतकऱ्यांचे सोयाबीन बरबाद
धाराशिव तालुक्यातील बोरखेडा येथे तेरणा नदीच्या पुरात शेतकऱ्यांचे सोयाबीन बरबाद झाले . खत दुकानदार पैसे मागण्यासाठी फोन करतो म्हणून शेतकऱ्यांवर फोन बंद करून ठेवण्याची वेळ, बोरखेडा गावातील शेतकऱ्यांची व्यथा.
खत आणि बी उधार आणलं पहिलं बी उगवलं नाही म्हणून दुबार पेरणी केली आता काढणीला आल्यावर पावसानं मातीमोल केलं, सावकाराचे अजून घेतलेले पैसे द्यायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
-
हिंगोली- वसमत तालुक्यातील कीन्होळा गावात आसना नदीचे पाणी घुसले
हिंगोली- वसमत तालुक्यातील कीन्होळा गावात आसना नदीचे पाणी घुसले. नवरात्र दुर्गा महोत्सवाच्या टेडॉलमध्ये मध्ये पाणी घुसले. कीन्होळा गावात असना नदीचे पाणी घुसले. जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरू होता.
-
नांदेड जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी
नांदेड जिल्ह्यासाठी आज हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने नांदेड शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाले आहेत.
शहरातील बाबानगर रस्त्यावरून पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आदेश.
-
मध्य रेल्वे विस्कळीत ! कल्याण-सीएसएमटी मार्गावर गाड्या उशिराने सुरू
मध्य रेल्वे विस्कळीत झाली असून सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे कल्याण-सीएसएमटी मार्गावर गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. माटुंगा वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या आणि कल्याण मार्गावर वाहतूक उशीराने सुरू असल्याने प्रवाशांना फटका बसला
Published On - Sep 27,2025 8:49 AM
