Maharashtra Breaking News LIVE 16th May 2025 : बिहार निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी बैठक सुरू
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 16 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

नीरव मोदीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. लंडन हायकोर्टाने दहाव्यांदा नीरव याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. नीरव मोदी याला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित देखील करण्यात आलं आहे. तर आगामी मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जालना जिल्ह्यात पर्जन्यमान चांगले राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने जिल्ह्यातील 47 गावांना पुराचा धोका असल्यासही सांगण्यात आलं असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जवळपास दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. गोंदिया येथे एमबीबीएस विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे. 200 पुस्तके दिनबंधू वाचनालयाला भेट म्हणून दिली आहेत. NEET आणि JEE तयारीसाठी 200 पुस्तकांचा अनमोल खजिना वाचनालयात आता उपलब्ध आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
माझ्या विधानाचा विपर्याय केला गेला- देवडा
“माझ्या विधानाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. मी फक्त एवढेच म्हटले होते की, देशाच्या सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि देशाची जनता सैन्याच्या चरणी नतमस्तक आहे.”
#WATCH इंदौर: भारतीय सशस्त्र बलों को लेकर दिए गए अपने कथित बयान पर मध्य प्रदेश के उपमुख्यमंत्री जगदीश देवड़ा ने कहा, “कांग्रेस इसे गलत तरीके से पेश कर रही है। मेरे बयान को तोड़-मरोड़ कर पेश किया गया है। मैंने कहा था कि देश की सेना ने ऑपरेशन सिंदूर में जबरदस्त काम किया है और देश… pic.twitter.com/b8yKq3TMw0
— ANI_HindiNews (@AHindinews) May 16, 2025
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी बिकानेरला भेट देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी बिकानेरच्या नल विमानतळावर पोहोचले. यानंतर ते बिकानेरपासून 20 किमी अंतरावर असलेल्या पलाना येथील रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील. पंतप्रधानांचा पलाना येथे एका मोठ्या जाहीर सभेचा कार्यक्रम देखील आहे.
-
-
कोट्यवधी लोकांना फसवणाऱ्या दोन सायबर गुंडांना अटक
नोएडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आणि डिजिटल अटक करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन फसवणूक करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस संपूर्ण टोळीची चौकशी करून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
बिहार निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी बैठक सुरू
भारताचे निवडणूक आयुक्त विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आज बिहारमधील निवडणूक तयारीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक सुरू आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, राज्य पोलिस नोडल अधिकारी, पोलिस महानिरीक्षक, जिल्हा दंडाधिकारी, एसएसपी पाटणा हे देखील बैठकीला उपस्थित आहेत.
-
सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस
सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस
कणकवली, वैभववाडी, ओरोस या भागामध्ये जोरदार पाऊस
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज
नागरिकांची उडाली तारांबळ
-
-
अहिल्यानगर जिल्ह्याला पावसानं झोडपलं, अवकाळीचा तडाखा
अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले
राहाता, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यांसह सर्वदूर पावसाची हजेरी
दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
अर्धा तास सुरू असलेल्या पावसाने रस्ते झाले जलमय
अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत
फळ पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता
-
मनसेनं पंढरपुरात फुंकले नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग
मनसेनं पंढरपुरात फुंकले नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग
विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे उतरणार आगामी नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात
दिलीप धोत्रे यांनी आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणूक लढवण्याची केली घोषणा
पंढरपूर शहरातील आठ प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय
-
जुळ्या बहिणींना सारखे गुण
जुळ्या बहिणींना इयत्ता दहावी मध्ये सेम टू सेम गुण मिळाले. बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील अनुष्का व तनुष्का धिरज देशपांडे या जुळ्या बहिणींचे एकसारखे 96% गुण घेत यश मिळवले.
-
काश्मिरमध्ये 6 अतिरेक्यांचा खात्मा
त्राल आणि शोपियान भागात सैन्य दलाला मोठे यश आले. याभागात 6 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. काश्मीर घाटीत हल्ला करण्याची तयारी होती, त्यापूर्वीच या दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
-
राऊतांना नरकातही जागा मिळणार नाही- संजय गायकवाड
नरकातला स्वर्ग या संजय राऊतांच्या कथित कल्पित कथा आहेत. संजय राऊत यांना नरकातही जागा मिळणार नाही, अशी विखारी टीका आमदार संजय गायकवाड यांनी केली.
-
रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात वडूज पोलिस माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिले सोबत रामराजे यांचे मोबाईलवर संभाषण झाल्याचे उघड झाले होते.
-
राऊतांवर संजय शिरसाट यांची टीका
हे प्रकार प्रसिद्धीसाठी आहेत. नौटंकी आहे. राऊतांनी जे काही पुस्तक लिहिलंय ते पिक्चरची स्टोरी लिहिल्यासारखं केली आहे. स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याचा हा प्रकार असल्याची टीका संजय शिरसाट यांनी केली.
-
चारा स्वरूपात केळी जनावरांना टाकण्याची शेतकर्यावर वेळ
वादळी वारा अवकाळीचा फटका त्यात केळीला भाव नाही त्यामुळे जनावरांना चारा म्हणून केळी टाकण्याची शेतकर्यांवर वेळ आली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत.
-
100 फूट तिरंग्यासह जळगावमध्ये तिरंगा यात्रा
जळगावात भाजपच्या वतीने सैन्याचे मनोबल बाळ वाढवण्यासाठी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. 100 फूट तिरंगा धरून संपूर्ण शहरांतून यात्रा काढण्यात आली. तिरंगा यात्रेमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे हे सुद्धा हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले.
-
INDIA आघाडीविषयी पी. चिदंबरम यांचे मोठे वक्तव्य
इंडिया आघाडी अस्तित्वात आहे, या मताशी आपण सहमत नसल्याचे ते म्हणाले. खरं तर सलमान खुर्शीद त्याचे उत्तर देऊ शकतील, ते या आघाडीशी चर्चा करणाऱ्या टीमचे सदस्य आहेत, असे चिदंबरम म्हणाले. जर इंडिया आघाडी कायम आहे, तर मला आनंद आहे. पण ही आघाडी मजबूत आहे, असे मला वाटत नाही. अर्थात ही आघाडी अजून जोडल्या जाऊ शकते, अजून वेळ आहे. अजून बऱ्याच घटना घडतील, असे चिदंबरम म्हणाले.
-
मी अनेक गोष्टी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत- राऊत
“मी अनेक गोष्टी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये ऐकल्या आणि अनुभवल्या आहेत. अनेकांनी मला तेव्हाच सांगितलं की तुमच्या प्रवासावर पुस्तक लिहा. पण मला वाटतं आपल्या वरिष्ठांसोबत राहून आपण केलेल्या आहेत, ज्याला सीक्रेट मिशन म्हणतो, त्या पुस्तक रुपाने लिहिणं, लोकांसमोर आणणं हे नैतिकतेला धरून नाही,” असं राऊत म्हणाले.
-
काही गोष्टी गोपनीय असल्या पाहिजेत, मी फक्त संदर्भ दिला- राऊत
“काही गोष्टी गोपनीय असल्या पाहिजेत, मी फक्त संदर्भ दिला आहे. उपकाराची परतफेड अपकाराने केली, हेच सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. मी मर्यादेत राहून हे पुस्तक लिहिलं आहे. पवार, बाळासाहेबांनी मदत केली, पण त्याची परतफेड पक्ष फोडून केली”, अशी टीका राऊतांनी केली.
-
बाळासाहेब, पवारांनी मोदी-शाहांना मदत केली, याचा मी साक्षीदार- राऊत
“नरकातला स्वर्ग हे पुस्तक म्हणजे सत्यकथा आहे. ती कादंबरी नाही. या पुस्तकात लिहिलेल्या अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. बाळासाहेब, पवारांनी मोदी-शाहांना मदत केली, याचा मी साक्षीदार आहे. बाळासाहेब, पवारांच्या मदतीला ते जागले नाहीत”, असा टोला राऊतांनी लगावला.
-
मी शरद पवारांना माझ्या पुस्तकात काय लिहिलंय ते सांगितलं- संजय राऊत
“मी शरद पवारांना माझ्या पुस्तकात काय लिहिलंय ते सांगितलं आहे. त्यावर अमित शाहांची काय प्रतिक्रिया असेल ते पाहुया, असं पवार म्हणाले. शरद पवार या सर्व प्रकरणावर काय सांगतील ते माहिती नाही,” असं संजय राऊत म्हणाले.
-
संजय राऊतांकडून पवारांच्या नावाचा जाणीवपूर्वक वापर- संजय शिरसाट
“संजय राऊतांकडून पवारांच्या नावाचा जाणीवपूर्वक वापर करण्यात आला आहे. राऊतांनी पवारांनाही यात गुंतवलंय” अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली. राऊतांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात मोदी आणि शाह यांच्याबद्दल गौप्यस्फोट केले आहेत.
-
संजय राऊत वाट्टेल तसं बडबडतात, त्यांना कोणीच गांभीर्याने घेत नाही – गिरीश महाजन
राजकारणात खळबळ माजवणारा आरोप संजय राऊय यांनी केल्यावर आता भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राऊतांवर टीका केली आहे
संजय राऊत यांच्या बद्दल काय बोलावं ? ते काय बोलतात आता ते कोणी ऐकत सुद्धा नाही, वाटेल तसे ते फालतू बडबड करत असतात अशी टीका महाजन यांनी केली.
आता या माणसाला कोणीच गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं असं मला वाटतं अशी टीकाही महाजन यांनी केली.
-
महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना विभागाचा विविध मागण्यांसाठी संप
महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना विभागाने विविध मागण्यांसाठी पुकारला बेमुदत संप पुकारला आहे.
कर्मचारी भरती तात्काळ करणे, खाजगीकरण बंद करणे, कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे, तांत्रिक वेतन श्रेणी कर्मचाऱ्यांवरती होणाऱ्या कारवाया, अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग यांनी बेमुद संप पुकारला आहे.
-
ऊद्धव ठाकरेंच्या कामगार सेनेला शिंदेंच्या शिवसेनेचा दणका
ऊद्धव ठाकरेंच्या कामगार सेनेला शिंदेंच्या शिवसेनेने दणका दिला आहे. मातोश्री बाहेर एकनाथ शिंदेंचे बॅनर लागले असून त्या माध्यमातून ठाकरेंना टोला लगावला.
एअरपोर्टवरील आंदोलनाचं श्रेय घेणारे बॅनर संपूर्ण बांद्रा ते अंधेरी परिसरात लावण्यात आले आहेत. तुर्कीच्या सेलेबी न्यास अमिड या कंपनीचा करार रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.
भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. याच तुर्की देशाची सेलेबिनास कंपनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येते कार्यरत होती. मात्र या आंदोलनामुळे त्यांचा करार रद्द केला आहे. या करार कंपनी मधील 4000 भूमिपुत्रांना नवीन करारानुसार नवीन कंपनीनुसार पुन्हा तेथेच रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-
गिरगाव चौपाटीत बेकायदा पार्किंग वसुलीप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा
तापस पटनाईक, गौतम कुमार सगल,गौतम हरीश गिरी , सुषांत सोनाथन दास आणि हेमंत सनातन दास नावाच्या पाच जनावर केला गुन्हा दाखल… अहमदाबादवरून फिरायला आलेल्या चालकाला गिरगाव चौपाटी परिसरात मोटरगाडी उभी करण्यासाठी तासाला शंभर ते दीडशे रुपये घेत वाहन चालकांची करत होते फसवणूक… तर सार्वजनिक ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होणार नाही अशी हमी देत काही वाहन चालकाकडून महिन्याचे ४ हजार, तर काहीजणांकडून दोन हजार रुपये घेत असल्याचे पोलीस तपासात आले समोर
-
तुर्की वरील सफरचंदाचा बहिष्कार तुर्कीला महागात पडला
जवळपास 1000 कोटी रुपये चा तुर्कीला व्यापाराचा फटका… पुण्यातील मार्केटमधून तुर्कीचे सफरचंद व्यापाऱ्याकडून विक्री करण्यास पूर्णपणे बंदी… कुठल्याही परिस्थितीत तुर्कीचे सफरचंद मागवले जाणार नाहीत आणि विक्री केले जाणार नाहीत व्यापाऱ्यांचा निर्धार
-
राज्यात आता पोलीस हवालदारालाही तपास करण्याचे अधिकार…
राज्यातील वाढते गुन्हे व पोलिसांचे अपुरे संख्याबळामुळे पोलीस यंत्रणेवरचा ताण वाढल्याने राज्य सरकारच्या गृह विभागाने घेतला महत्त्वाचा निर्णय… हवालदार पदवीधर, ७ वर्षे सेवा आणि नाशिक येथील 6 आठवड्याचा प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांनाच मिळणार तपासाचा अधिकार…
-
अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग
नाशिक शहरातून तब्बल ३७१ महाविद्यालयांचा सक्रिय सहभाग… तर १५० अधिक कनिष्ठमविद्यालयाचा समावेश… पसंतीच्या महाविद्यालयांत प्रवेशासाठी ऑनलाइन प्राधान्यक्रम नोंदविता येणार… १६ मेनंतर विद्यार्थ्यांचे लॉग इन ऑनलाइन उपलब्ध होणार… शहरात अकरावीच्या २६००० जागा असणार उपलब्ध
Published On - May 16,2025 8:01 AM
