Maharashtra Breaking News LIVE 19 May 2025 : पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणे पोलीस एक्शन मोडवर
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 19 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

राज्यातील अनेक भागांत सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे. तसेच पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आयएमडीकडून काही जिल्ह्यांना यलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विविध विकास कामांचा शुभारंभ ते करणार आहेत. तसेच काही शासकीय बैठका घेणार आहेत. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेही उपस्थित राहणार आहेत. कल्याण पश्चिम येथे नव्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या प्रगत व सुविधायुक्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या आकाशात पुढील 17 दिवस ड्रोन उडविण्यावर बंदी आणली आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
कल्याणमध्ये जोरदार पावसाची हजेरी
कल्याणमध्ये जोरदार पावसाची हजेरी
शहरात सायंकाळच्या सुमारास पाऊस
सकाळपासूनच होतं ढगाळ वातावरण
पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
-
पुण्याला पावसानं झोडपलं, मुसळधार पाऊस
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात
पुण्याच्या स्वारगेट , फातिमनगर , हडपसर, शिवाजीनगर भागात पावसाची जोरदार हजेरी
हवामान खात्याकडून देण्यात आला होता पावसाचा इशारा
पावसाने पुणे शहराला झोडपले
-
-
पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणे पोलीस एक्शन मोडवर
पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणे पोलीस अलर्टवर आहे. पुणे शहरात पावसाळ्यात पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे शहरातील 33 मुख्य रस्त्यांवरील 110 स्पॉट्स आयडेंटिफाय करण्यात आले आहेत. याची माहिती महानगरपालिका आणि इतर विभागाना देण्यात आली आहे. आम्ही एकत्रित ड्रिल सुद्धा करणार आहोत, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे. पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीसअधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी एकत्रित ड्रिल करणार आहोत. पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी समन्वय राहो म्हणून व्हाट्सअप ग्रुप देखील तयार करण्यात आलाय, असंही मनोज पाटील यांनी सांगितलं.
-
अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजून गुन्हेगारी वाढली, काँग्रेसच्या नाना पटोले यांचा आरोप
अजित पवार हे 2 जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजून गुन्हेगारी वाढली, असा आरोप काँग्रेसच्या नाना पटोले यांनी केला आहे.अजित पवार ज्या दिवशी बीडचे पालकमंत्री झाले तेव्हा पुन्हा माफियांचं राज्य उभं राहिलं आहे, असंही पटोले यांनी म्हटलं.
-
नांदेडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी आर कदम भाजपच्या वाटेवर?
नांदेडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी आर कदम भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे. अशोक चव्हाण यांनी बी आर कदम यांचा घरी जाऊन सत्कार केला. तसेच कदम यांनीही खासदार अशोक चव्हाण यांचा सत्कार केला. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात गेले असताना अशोक चव्हाण यांनी ही भेट घेतली. त्यामुळे आता बी आर कदम काय निर्णय घेतात? याकडे जिल्ह्यातील लोकांचं लक्ष असणार आहे.
-
-
बीड जिल्ह्यात मोठं ऑपरेशन करावं लागेल : विजय वडेट्टीवार
बीड जिल्ह्यात मोठं ऑपरेशन करावं लागेल. तसेच बीडमधील गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून काढावं लागेल, असं विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. तसेच 15 दिवसांपूर्वी रुजु झालेल्या बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बदलीसाठी मुख्यमंत्र्याकडे अर्ज दिला, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.
-
करमाळा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी
सोलापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. करमाळा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. करमाळ्यातील उमरड,जेऊर,पोफळज आणि कुंभेज भागात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. त्यामुळे नागरिकांना उकड्यापासून काहीसा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
-
मुरादाबाद येथून अटक करण्यात आलेला आयएसआय एजंट शहजादची लखनौ तुरुंगात रवानगी
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून पकडण्यात आलेल्या आयएसआय एजंट शहजादला लखनऊ तुरुंगात पाठवण्यात आले आहे. अटकेनंतर, यूपी एसटीएफने आज आरोपीला न्यायालयात हजर केले, जिथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. रविवारी मुरादाबाद येथून यूपी एटीएएसएचने शहजादला अटक केली.
-
ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी 25 मे रोजी गुजरातला भेट देऊ शकतात
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 मे रोजी पहिल्यांदाच गुजरातला भेट देऊ शकतात. पंतप्रधान मोदी त्यांच्या गुजरात दौऱ्यादरम्यान अहमदाबाद, दाहोद, भूज येथील कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी कच्छमधील भूज येथे एका जाहीर सभेलाही संबोधित करतील. या भेटीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
-
हरियाणा पोलिसांनी आतापर्यंत 6 पाकिस्तानी हेरांना अटक केली
हरियाणा पोलिसांनी सांगितले की आतापर्यंत सहा हेरांना अटक करण्यात आली आहे. दोन जण नूह येथून आणि इतर तीन जण हिसार, कैथल आणि पानीपत येथून आणि एका संशयिताला पंचकुला येथून अटक करण्यात आली आहे.
-
संभल जामा मशीद सर्वेक्षण प्रकरण, मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली
संभल जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला मोठा धक्का दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाची दिवाणी पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे, आता सर्वेक्षणाचा खटला संभळच्या जिल्हा न्यायालयात सुरू राहील हे स्पष्ट झाले आहे.
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत ओसीआय पोर्टलचे उद्घाटन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली येथे नवीन ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) पोर्टलचे उद्घाटन केले. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की गेल्या दशकातील लक्षणीय तांत्रिक प्रगती आणि ओसीआय कार्डधारकांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या पार्श्वभूमीवर, विद्यमान कमतरता दूर करण्यासाठी आणि वापरकर्त्यांचा अनुभव वाढविण्यासाठी एक नवीन ओसीआय पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
-
पुणे – महिलेचे मंगळसूत्र हिसकावणारा जेरबंद
मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसुत्र हिसकावणारा १२ तासात जेरबंद, पुण्यातील सहकारनगर पोलिसांची कारवाई
-
अमरावतीत शिक्षकांसाठी बच्चू कडू यांचे आंदोलन
अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांचे आंदोलन सुरु असून त्यांनी जिल्हा परिषद शाळांना जाचक ठरणारा जीआर रद्द करा अशी मागणी केली आहे.
-
विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग
विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले आहे.
-
काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी काँग्रेसला राम राम करण्याच्या तयारीत
पक्षश्रेष्ठी प्रतिसाद देत नाहीत, अडचणीकडे लक्ष देत नाहीत, पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याने काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी राजीनामा देण्याची चर्चा सुरु आहेत
-
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना; आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. स्कॅनिंग मशिनमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं राहुल नार्वेकरांनी सांगितलं आहे.
-
ISI च्या निमंत्रणावरून गौरव गोगोईंचा पाक दौरा, हिमंता बिस्व सरमांचा आरोप
ISI च्या निमंत्रणावरून गौरव गोगोईंचा पाक दौरा केला होता असा आरोप हिमंता बिस्व सरमा यांनी केला होता. मात्र गौरव गोगोई यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मानसिक आरोग्य ठीक नाही असंही गोगोई यांनी म्हटलं आहे.
-
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची हेर तारिफ याची कबुली, हरियाणाच्या नूहमधून तारिफला पोलिसांकडून अटक
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची हेर तारिफने कबुली दिली आहे. हरियाणाच्या नूहमधून तारिफला पोलिसांनी अटक केली आहे. सिरसा एअरबेसचे फोटो आणि व्हिडीओ देण्यास सांगितल असल्याचं तारिफने कबुल केलं आहे. पाकच्या दुतावासातील अधिकाऱ्याने संपर्क केल्याचंही त्याने सांगितलं.
-
‘देशद्रोही लोकांवर कारवाई झाली पाहिजे’, मंत्री गिरीश महाजन यांची मागणी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेली हरियाणातील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी ‘देशद्रोही लोकांवर कारवाई झाली पाहिजे’ अशी मागणी केली आहे.
-
संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका न्यायालयात सुनावणी सुरु
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुरू आहे. सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. कागदपत्र मिळालेले नसल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. पेंड्राइव्ह देखील अद्याप मिळाला नसल्याचे आरोपीच्या वकिलांचे म्हणण आहे. दरम्यान, सरकारी वकील उज्वल निकम आज गैरहजर आहेत.
-
मंत्री विजय शाह प्रकरणी माफी स्वीकारली जाणार नाही, सुप्रीम कोर्टाने फटकारलं
मंत्री विजय शाह यांनी कर्नल कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. मंत्री विजय शाह प्रकरणात SIT स्थापन करा, मध्य प्रदेश सरकारनं SIT गठित करावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच विजय शाह यांची माफी स्वीकारली जाणार नाही असे ही म्हटले आहे.
-
मोठी बातमी! आणखी एका पाकिस्तानी हेराला अटक
ज्योती मल्होत्रा पाठोपाठ उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये रविवारी यूपी एटीएसने एका ISI एजंटला अटक केली आहे. पोलिसांनी शहजाद नावाच्या व्यक्तीला मुरादाबादमधून हेरगिरीच्या प्रकरणात अटक केली. शहजादच्या पत्नीने त्याने हेरगिरी केलीच नाही असे म्हटले आहे. शहजादच्या पत्नीचे म्हणणे आहे की तिचा पती पाकिस्तानातून कापड आणून व्यवसाय करतो.
-
पाणीटंचाईमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांचा आत्महत्येचा प्रयत्न
पाणीटंचाईमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांचा आत्महत्येचा प्रयत्न केला. नांदेडच्या उमरी तालुक्यातील सिंधी तांडा येथे प्रकार घडला आहे. जीव धोक्यात घालून विहरती उतरून काढावं लागतं गावकऱ्यांना पाणी…
-
मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित राष्ट्रीय सुरक्षेचे निर्णय घेतलेत त्याबाबत मानले आभार
मात्र ऑपरेशन सिंदूरनंतर राज्यात जो जल्लोष साजरा केला जातोय त्याबाबत अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत… सध्याची स्थिती विजयाची नसून युद्धविरामाची आहे, त्यातच जवानांचे प्राण देखील गेलेत… अशा स्थितीत विजय साजरा करणे अनेकांच्या मनाला वेदना देणार”…. युद्धविराम जरी झाला असला तरी पाकिस्तानवर विश्वास ठेवणे कठीण पाकिस्तानने अनेकदा दगाफटका केला, नागरिकांना मार्गदर्शन आवश्यक… युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजय रॅली ज्या निघत आहेत त्या टाळाव्या अशी विनंती अमित ठाकरे यांनी केलीय…मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचेही अमित ठाकरेंच्या पत्रात नमूद…
-
जालन्यात महिलेच्या घरातून 4 किलो गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई
जालना शहरातल्या चंदनझिरा परिसरात एका महिलेच्या घरातून मानवी आरोग्यास घातक आणि प्रतिबंधित असलेला चार किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून सदर महिलेला ताब्यात घेऊन तिला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी कडक पावले उचलली असून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार गुप्त बातमीदारमार्फत ही माहिती मिळाली असता या पथकाने छापेमारी करून हा गांजा जप्त केला. जवळपास 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
-
सोलापूर धुळे महामार्गावर कार उलटून अपघात,महिलेसह अडीच वर्षांची चिमुकली ठार
सोलापूर महामार्गावर सौंदलगाव जवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली. भरधाव वेगात या कारचे समोरील टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मृतांमध्ये दोन वर्षीय बाळासह एका महिलेचा समावेश आहे. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. 29 वर्षीय रोहिणी चव्हाण आणि अडीच वर्षीय नूरवी चव्हाण या चिमुकलीचा मृत्यू झालाय.जखमीमध्ये दोन पुरुषांसह तीन महिला आणि एका बाळाचा समावेश आहे.
-
गोल्डन टेम्पलवरील हल्ल्याचा पाकचा डाव उधळून लावला
अमृतसर गोल्डन टेम्पलवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा डाव होता. 8 व 9 मे रोजी गोल्डन टेम्पलवर हल्ला करण्याचा रचला होता कट. पाकिस्तानच्या घुसखोरीचे प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडले.
-
जालन्यात महिलेच्या घरातून 4 किलो गांजा जप्त
जालना शहरातल्या चंदनझिरा परिसरात एका महिलेच्या घरातून मानवी आरोग्यास घातक आणि प्रतिबंधित असलेला चार किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून या महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
-
मावळ – पाचाने गावातील खाणीत बुडून 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
मावळ तालुक्यात पाचाने गावातील खाणीत एका नऊ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आंब्याची बाग राखणदार करणाऱ्या शेत मजुराचा मुलगा सूरज भोसले हा घराच्या अंगणातून पाण्याच्या खाणीत एकटाच पोहोण्यासाठी गेला होता, तो परत घरी परतलाच नाही. त्याचा शोध घेण्यात आला असता मृतदेह खाणीत आढळला.
-
ऑपरेशन सिंदूरबाबतचा नवा व्हिडीओ लष्कराकडून जारी
ऑपरेशन सिंदूरबाबतचा नवा व्हिडीओ लष्कराकडून जारी करण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या शौर्याचा नवा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे.
-
करमाळा तालुक्यात वादळी वारा, अवकाळी पावसाची हजेरी
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात वादळी वारे व अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने जिंती परिसरातील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. वादळी वाऱ्यमुळेने केळी पिके भुईसपाट झाली .
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
-
वाहतूक शाखेकडून एआयचा वापर
वाहतूक पोलिसांची एआय तंत्रज्ञानाद्वारे पंधरा दिवसांत 194 जणांवर कारवाई केली. या तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहतूक पोलिसांनी विना सीट बेल्टचा 163 केस, हेल्मेट न वापरता दुचाकी चालवणारे 30 केस व इतर एक अशा एकूण 194 केसेस गेल्या पंधरा दिवसांत दाखल केल्या.
-
ठाण्यात २४ दिवसांत सलग तिसऱ्यांदा शेकडो माशांचा मृत्यू
ठाणे शहरातील सिद्धेश्वर तलाव मृत झाला असल्याची भीती व्यक्त होत आहे. या तलावात २४ दिवसांत सलग तिसऱ्यांदा शेकडो माशांचा मृत्यू झाला असून, महापालिकेचे प्रदूषणमुक्तीचे प्रयत्न फोल ठरले आहेत. या प्रकाराबद्दल भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
-
ठाण्यात मॉक ड्रिल
आपत्ती काळात बचावासाठी सज्ज ठाण्यात सतरा ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात आले. पावसाळ्यामुळे ठाणे शहरातील सर्व शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. सतरा ठिकाणी मॉडलच्या रंगीत तालमीतून आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
-
नदीपात्रात कार कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू
अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. नदीपात्रात कार कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रत्नागिरी खेडमधील जगबुडी नदीपात्रात ही घटना घडली.
-
जेवणातून १३ जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरापासून जवळ असलेल्या शहागड फाट्यावर वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांना जेवणातून विषबाधा होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. तर तेरा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
नागपूरच्या आकाशात ड्रोन उडविण्यावर बंदी
नागपूरच्या आकाशात पुढील 17 दिवस ड्रोन उडविण्यावर बंदी असणार आहे. भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. विशेषतः संघ मुख्यालय, स्मृती मंदिर, दीक्षाभूमी हे दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असल्याने ही विशेष काळजी घेतली आहे.
Published On - May 19,2025 7:57 AM
