Maharashtra Live News Headlines 25 August 2024 : पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाची विश्रांती
TV9 Marathi, Maharashtra Political News Live 25 August 2024 : आज 25 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदीं’चा मेळावा पार पडणार आहे. जळगाव विमानतळ परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जवळपास एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी काय घोषणा करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौऱ्याचा आज अंतिम टप्पा सुरु आहे. राज ठाकरे वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. सध्या मुंबई, पुणे, नाशिकसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
राज ठाकरेंच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न
बुलढाण्यामध्ये राज ठाकरे यांच्या समोरच मोठा गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घालणाऱ्या व्यक्तील बाजूल घेऊन जाण्यात आलं.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मुंबई गोवा महामार्गाची करणार पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार उद्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार महामार्गाची पाहणी करणार असून दुपारी बारा वाजल्यापासून पनवेल पळस्पे इथून पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पहिला टप्प्यात पनवेल ते महाड असा पाहणी दौरा असणार आहे.
-
-
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 26000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 26000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रात्री अकरा वाजता 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तसेच गरज पडल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
-
तपासामुळे प्रकरणात काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता
बदलापूर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील तपास अधिक मजबूत करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम पुन्हा शाळेत दाखल झाली आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी आणखी काही महत्त्वाच्या पुराव्यांचा शोध घेण्यासाठी शाळेचा पुन्हा एकदा आढावा घेत आहे. या तपासामुळे प्रकरणात काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात
-
वाहतुकीवर कोणताच परिणाम नाही
मुंबई उपनगरातील दहिसर, बोरिवली, मालाड, अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रूझ, वांद्रे, माहीम परिसरात अधूनमधून पाऊस पडत आहे. सध्या या भागात पावसाची रिपरिप सुरूच आहे. पावसामुळे कुठेच वाहतूक कोंडी झालेली नाही. मिलन सबवे, अंधेरी सबवे, मालाड सबवे, दहिसर सबवे गाड्यांच्या वाहतुकीसाठी खुले आहेत. कुठेही पाणी साचलेले नाही. मात्र या भागात काळे ढग असून आता हलका पाऊस सुरू आहे.
-
-
वसई विरारमध्ये पावसाला सुरूवात
वसई विरार नालासोपा-यात सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारनंतर हजेरी लावली आहे.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्याचा बदलापूर दौरा रद्द
बदलापुर चिमुकलीवर अत्याचार झालेल्या मुलीच्या आई-वडिलांची भेट घेत पोलीस आणि शाळेत देखील जातं घेणार होते माहिती राज ठाकरे माहिती
-
करमाळयाच्या तहसिलदार शिल्पा ठोकडे यांचा वाळू माफियांना दणका
तब्बल 80 ब्रास वाळूसाठा केला जप्त. करमाळा तालुक्यातील कंदर येथे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी छापा टाकत केली कारवाई
-
जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
बदलापूरची घटना पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला. संस्थाचालकाला मदत करण्याची राजकीय भूमिका यात दिसते म्हणून चार दिवस उशिराने गुन्हा दाखल केला, असे जयंत पाटलांनी म्हटले.
-
Marathi News: पुण्यात 300 जणांवर गुन्हे दाखल
पुण्यात “सर तन से जुदा” करण्याचा घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या घोषणा दिल्या गेल्या. समाजामध्ये सार्वजनिक शांततेचा भंग होऊन असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे.
-
Marathi News: शरद पवारांचे विचार अन् अजित पवारांचे नेतृत्व- अतुल बेनके
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढील विधानसभेला सामोरे जाणार आहे. माझी लढाई शरद पवारांच्या विरुद्ध आहे असे समजायचं कोणी कारण नाही. शरद पवारांचे विचार घेऊनच पुढे जाणार आहे, असे अतुल बेनके यांनी सांगितले.
-
Marathi News: गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले
मागील तीन दिवसांमध्ये गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे काल गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आले होते. या 33 दरवाजांमधून 1 लाख 73 हजार 769 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
-
Raj Thackeray: अकोल्यात राज ठाकरेंना घेतला आढावा
राज ठाकरे यांच्या अकोल्यातील संघटनात्मक बैठक घेतली. या बैठकीत पाच मतदारसंघांचा आढावा घेतला. यावेळी सभागृहात पदाधिकारी सोडून कुणीच कार्यकर्ते थांबू नये असे राज ठाकरेंचे दिले होते.
-
ग्रामीण भागातील सखी मंडळांना गेल्या दहा वर्षांत 9 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप – पंतप्रधान
बँकांतून साल 2014 तक 25 हजार कोटी रुपयांपेक्षा कमी लोन सखी मंडळांना मिळाले होते. गेल्या 9 लाख कोटी रुपयांची मदत दिलेली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे
-
महाराष्ट्राच्या लोकांनी महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव असेच उंच करत राहायला हवं- पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जळगावात लखपती दिदी योजनेचे उद्घाटन केले. महाराष्ट्राच्या लोकांनी महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव असेच उंच करत राहायला हवं असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
-
मोदींच्या नेतृत्वातील विकासाचा रथ जळगावात- अजित पवार
“मोदींच्या नेतृत्वातील विकासाचा रथ जळगावात आला आहे. मी आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात एवढ्या प्रचंड संख्येने महिलांनी महाराष्ट्रात पंतप्रधानांचं स्वागत केल्याचं पाहिलं नव्हतं. हे मी पहिल्यांदाच पाहत आहे,” असं अजित पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर आहेत.
-
दिल्लीतील नजफगड परिसरात एका दहा वर्षांच्या मुलाकडून पिस्तूल जप्त
दिल्लीतील नजफगड परिसरात एका दहा वर्षांच्या मुलाकडून पिस्तूल जप्त करण्यात आलं. काल हा मुलगा बॅगेत पिस्तूल घेऊन शाळेत गेला होता. त्यानंतर शाळा प्रशासनाने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. काही महिन्यांपूर्वी मृत्यूमुखी पडलेल्या त्याच्या वडिलांच्या नावावर पिस्तुलाचा परवाना आहे. पिस्तूलचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
-
कोलकाता प्रकरणातील आरोपीची पॉलीग्राफ चाचणी
पश्चिम बंगाल- आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बलात्कार-हत्येप्रकरणातील आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ चाचणी करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी कोलकाता इथल्या प्रेसिडेन्सी जेलमध्ये पोहोचले.
-
धुळे- अक्कलपाडा धरणातून पांजरा नदीपात्रात 12 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
धुळे- अक्कलपाडा धरणातून 12 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पांजरा नदीपात्रात करण्यात आला आहे. सकाळीच सात हजार क्युसेक पाणी पांजरा नदीपात्रात सोडण्यात आलं होतं. साखरी तालुक्यात होत असलेल्या सतत पावसामुळे साक्री तालुक्यातील सर्व धरणं भरली आहेत. पांजरा नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
-
धुळे महापालिकेच्या भुयारी गटार योजनेचा बोजवारा
धुळे महापालिकेच्या भुयारी गटार योजनेचा बोजवारा उडाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली भुयारी योजना उद्घाटनाआधीच निकामी झाली आहे. भुयारी गटार योजनेच्या चेंबरमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडतंय. भुयार गटारी योजनेच्या बोगस कामाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसे यांनी आंदोलन केलंय.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बचत गटाच्या महिलांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावच्या दौऱ्यावर असून त्यांनी लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. मोदींनी या कार्यक्रमात बचत गटाच्या महिलांशी संवाद साधला आहे. या कार्यक्रमात 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
-
आमदार अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला
अजित पवारांचे शिलेदार जुन्नर चे आमदार अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. आज शरद पवार हे उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुका दौऱ्यावर आहेत. शरद पवारांचा जुन्नर तालुक्यातील दौरा सुरू असताना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांनी भेट घेतली. सलग दुसऱ्यांदा अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने जुन्नरच्या राजकारणात ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे…
-
अमरावतीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात आज अमरावतीत सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील नेहरू मैदान ते इर्विन चौकापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चा नेहरू मैदान ते इर्विन चौक या मार्गाने हा मोर्चा जाणार आहे. विविध हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चात सहभाग असेल.
-
व्हीआयपी हॉटेलमध्ये जुगाऱ्यांना अटक
नांदेड शहरातील नामांकित हॉटेलमध्ये जुगाराचा खेळ सुरु होता. पोलिसांनी धाड टाकून नऊ जुगारींना ताब्यात घेतले. 1 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. नांदेडमध्ये आलेल्या अनेक व्हीआयपीचा याच हॉटेलमध्ये मुक्काम असतो.
-
नाथाभाऊंना कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांनी स्वतः याविषयीची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी लखपती दीदी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज जळगावमध्ये आहेत. पण नाथाभाऊंनाच या क्रार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेले नाही.
-
लखपती दीदी योजनेसाठी पंतप्रधान जळगावमध्ये
नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत “लखपती दीदी” क्षमता बांधणी मेळावा होत आहे. जळगाव येथील प्राईम इंडस्ट्रियल पार्कवर हा कार्यक्रम होत आहे.
-
युट्यूब गेमरला मनसेचा हिसका
भारतातील खूप मोठा युट्युब गेमर जोनाथन याने पबजी गेम खेळताना मराठी तरुणाला आक्षेपार्य विधान करत शिवीगाळ केली होती मराठी भाषेचा अपमान केला होता. ही बाब नवी मुंबईतील मनसेच्या लक्षात आली. भारतातील खूप मोठा युट्युब गेमर जोनाथन याचे नवी मुंबईत खारघर मध्ये गेम्सचं दुकान आहे. जोनाथन नवी मुंबईतील खारघर मधील दुकानात आला असता मनसैनिकांनी त्याला पकडून माफी मागायला लावली आहे.
-
लाडकी बहीण योजनेत अजून मोठा दिलासा
लाडकी बहीण योजनेची महत्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे लवकर हाती न आलेल्या राज्यातील महिलांना सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेची मुदत वाढीसंदर्भात घोषणा होऊ शकते.
-
अतुल बेनकेंनी लावलेल्या बॅनर्सची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्या हस्ते आज ओतूरमध्ये स्वर्गीय विलासराव तांबे यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात येणार आहे. यासाठी पवार ओतूरला येणार आहेत. शरद पवार ओतूरमध्ये येत असल्याने अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांच्याकडून स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. स्वागताच्या फोटोमध्ये अजित पवार यांचे फोटो नाहीत. काही दिवसापूर्वीच अतुल बनके यांनी शरद पवारांची भेट घेत शरद पवार गटात जाण्याच्या चर्चेला रंगल्या होत्या. त्यानंतर अतुल बेनके यांनी खुलासा करत मी अजित पवार गटातच राहणार असल्याचे सूचक वक्तव्य केलं होतं. मात्र त्यानंतर आज शरद पवार हे जुन्नर तालुक्यात येत असताना त्यांच्या स्वागताचे बॅनर ओतूरमध्ये पाहायला मिळत आहेत.
-
पंतप्रधानांच्या कार्यक्रमात ढिसाळ नियोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात वाहतुकीचं ढिसाळ नियोजन केलं गेलं आहे. भर पावसात महिलांनापायपीट करावी लागत आहे. नियोजन नसल्याने संपूर्ण जळगाव शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. तर सभास्थळापर्यंत महिलांना ऐन पावसात पायपीट करत यावं लागल्याने महिलांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. थेट पंतप्रधानांचा दौरा असताना देखील असं नियोजन असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
-
मविआच्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मविआच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला महाविकास आघाडीकडून विरोध केला जात आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळावरून या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला ठाकरे गटाचा विरोध
छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिक रस्त्यावर उरतले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगाव दौरा असून ते छत्रपती संभाजीनगरहून जळगाव कडे जाणार आहेत. छत्रपती संभाजी नगर विमानतळाच्या बाजूला असलेल्या मातोश्री लॉन या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमलेत. दानवे यांच्या नेतृत्वात मोदींच्या दौऱ्याला विरोध केला जातोय. त्या दृष्टीनेच या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.
-
Maharashtra News Live : रत्नागिरीत पावसाचा ऑरेंज अलर्ट, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा आज ऑरेंज अलर्ट
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टी भागात सरींवर पाऊस
जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे
पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार हवामान खात्याचा इशारा
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मच्छीमारीला ब्रेक
आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज
काजळी नदी सुद्धा दथडी भरून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पहाटेपासून जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला
-
Maharashtra News Live : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 2 कोटी अर्ज
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जवळपास २ कोटी अर्ज आल्याची माहिती
ऑगस्ट अखेरीस अडीच कोटी इतकी संख्या होण्याची शक्यता
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार योजनेची मुदत वाढवण्याची शक्यता
जवळपास १. ६० कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळायला सुरुवात
मात्र आणखी अर्ज येण्याची शक्यता आहे त्यामुळ मुदत वाढ मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
-
Maharashtra News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जळगाव दौऱ्यानिमित्त मोठी बॅनरबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यात आले आहे.
लखपती दिदी हा कार्यक्रम जळगाव शहरांमध्ये पार पडत आहे.
या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी यांची उपस्थिती राहणार आहे.
बचत गटांच्या महिलांना नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत.
तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यामध्ये येत असल्याने या ठिकाणी होणाऱ्या सभेमध्ये नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी काळात विधानसभा निवडणूक या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी जळगाव जिल्ह्यासाठी काय नवी घोषणा करतात याकडे लक्ष लागले आहे.
-
Maharashtra News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावात; ‘लखपती दीदीं’शी साधणार संवाद
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज रविवारी (25 ऑगस्ट) ‘लखपती दीदीं’चा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
जळगाव विमानतळ परिसरात हा कार्यक्रम होणार आहे.
जळगाव विमानतळ परिसरातील 100 एकर जागेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या लखपती दीदी कार्यक्रमासाठी जय्यत तयारी केली जात आहे.
या कार्यक्रमाला जवळपास एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वांचेच लक्ष या सभेकडे लागले आहे.
-
Maharashtra News Live : राज ठाकरे आज वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद
वाशिम, रिसोड, कारंजा विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा
हॉटेल दानिश एम्पायर येथे सकाळी 9 वाजता होणार बैठक
अमित ठाकरेही असणार बैठकीला उपस्थित सोबत
राज ठाकरे रात्री पासूनच वाशिम मध्ये मुक्कामी
कार्यकर्त्यांकडून जेसीबीतून फुल उधळून झालं होतं राज ठाकरे यांचं स्वागत
-
Maharashtra News Live : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर
त्या निमित्ताने सर्व संबंधित शासकीय यंत्रणा, अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सोमवारी बोलाविली आहे
या बैठकीत राष्ट्रपतींच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात येणार आहे
राष्ट्रपती २८ आणि २९ जुलै रोजी पुणे दौऱ्यावर येणार होत्या.
मात्र, अपरिहार्य कारणास्तव हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता
आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रपती मुर्मू यांचा पुणे दौरा होणार आहे
-
Maharashtra News Live : नागपुरात रिमझिम पावसाला सुरुवात, पूर्णतः ढगाळ वातावरण
नागपुरात सकाळ पासूनच रिमझिम पावसाला सुरवात
पूर्णतः ढगाळ आणि पावसाचं वातावरण
नागपूर सह परिसरात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्या पासून नागपूरकरांना दिलासा
-
Maharashtra News Live : पुण्यात आज रेड अलर्ट, दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता
पुणे शहरासह जिल्ह्याला आज हवामान खात्याचा रेड अलर्ट
पुणे शहरासह जिल्ह्यात आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता
आज सकाळपासून शहरात रिमझिम पावसाला सुरुवात
खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये देखील काल रात्रीपासून पाऊस
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
-
Maharashtra News Live : पुणेकरांकडून सर्रास वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली, 86 लाख रुपयांचा दंड वसूल
पुणेकरांकडून सर्रासपणे शहरात वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली
ऑगस्ट महिन्यात केवळ 22 दिवसात बेशिस्त पुणेकरांकडून 86 लाख रुपयांचा दंड वसूल
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर पुणे वाहतूक पोलिसांची कारवाई
22 दिवसात 12 हजाराहून अधिक वाहनांवर पुणे पोलिसांकडून करण्यात आली कारवाई
Published On - Aug 25,2024 9:30 AM
