AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार, निलेश राणेंची धाड

| Edited By: | Updated on: Nov 27, 2025 | 8:27 AM
Share

Maharashtra Breaking news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची अमेडिया कंपनी अडचणीत सापडली असून गंभीर आरोप केली जात आहेत. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात काही आरोप केली जात आहेत. त्यामध्ये मुद्रांक शुल्काबाबत कंपनीने वेळ मागून घेतला आहे.

Maharashtra News LIVE : मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार, निलेश राणेंची धाड
Maharashtra LIVE

देशात काही दिवसांपूर्वी कडाक्याची थंडी बघायला मिळाली. आता पुन्हा उकाडा जाणून लागला आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाचे ढग भारतात आल्यामुळे अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण गंभीर मुद्दा बनलाय. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. प्रचार जोरदार पद्धतीने सर्वच पक्षांचा सुरू आहे. पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेवर गंभीर आरोप करण्यात आली असून तो पोलिस कोठडीत आहे. अनंत गर्जेची पत्नी डॉक्टर गाैरी गर्जे हिने आत्महत्या केलीये. मात्र, तिच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप केली जात आहेत. शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणेला विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये स्वतःच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून 1 लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून मोठी खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीने महार वतनाची जमीन घेतली होती. हा जमीन घोटाळा पुढे आल्यानंतर हा व्यवहार रद्द होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. आता हा व्यवहार रद्द करण्याठी 42 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. त्यामध्येच अमेडिया कंपनीला 42 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Nov 2025 07:57 PM (IST)

    भारताने पाकिस्तान सीमेजवळ नोटम जारी केला

    भारतीय हवाई दलाच्या एका मोठ्या लष्करी सरावासाठी भारताने पाकिस्तानच्या सीमेवरील दक्षिणेकडील भागात हवाई क्षेत्र राखीव ठेवण्यासाठी एक NOTAM (नोटम) जारी केला आहे. ही कारवाई 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर 2025 पर्यंत चालेल.

  • 26 Nov 2025 07:34 PM (IST)

    मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार, निलेश राणेंची धाड

    मालवण पैसे वाटप होत असल्याची कुणकुण लागल्यानंतर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली. यावेळी निवडणूक अधिकारी आणि पोलीसही घटनास्थळी होते. त्यांनी घरात पैसे आढळल्याचा एक लाईव्ह व्हिडीओदेखील काढलेला आहे.

  • 26 Nov 2025 07:20 PM (IST)

    इम्रान खान यांना लवकरात लवकर तुरुंगातून सोडण्यात यावे – पीटीआय

    पाकिस्तानमधील पीटीआय समर्थकांनी इम्रान खान यांची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्याबाबत विविध बातम्या फिरत आहेत. समर्थकांना तुरुंगात त्यांना भेटू दिले जात नाही.

  • 26 Nov 2025 07:05 PM (IST)

    राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भारताकडे, अहमदाबादमध्ये होणार स्पर्धा

    कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनाची मोठी जबाबदारी भारतावर सोपवण्यात आली आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या कार्यकारी मंडळाने  घोषणा करत सांगितले की, 2030 चेकॉमनवेल्थ गेम्सभारतात आयोजित केले जातील. हे खेळ अहमदाबादमध्ये होणार आहेत. 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन भारताची राजधानी दिल्ली येथे करण्यात आले होते.

  • 26 Nov 2025 06:55 PM (IST)

    सोलापूर : 30 नोव्हेंबर रोजी CM फडणवीस सांगोल्यात सभा घेणार

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. नगरपालिका निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबर रोजी सांगोल्यात CM फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. सांगोल्यात शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना सुरू आहे. भाजप विरोधात शहाजीबापू पाटील आहेत चांगलेच आक्रमक झाले आहेत, त्यामुळे या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • 26 Nov 2025 06:42 PM (IST)

    शिरुर : सणसवाडी औद्योगिक वसाहतील कंपनीच्या गोडाऊनला आग

    पुण्यातील शिरूर जवळील सणसवाडी औद्योगिक वसाहतील एका कंपनीच्या गोडाऊनला आग लागली आहे. यात DBS पँकेजिंग कंपनीचे गोडाऊन जळून खाक झाले आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • 26 Nov 2025 06:27 PM (IST)

    मीरा भाईंदर : घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

    मीरा भाईंदरमधील काशिमिरा पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना नाशिक आणि बीड येथून जेरबंद केले आहे. पेणकरपाडा, मिरारोडमधील घरफोडीप्रकरणी हजारो सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

  • 26 Nov 2025 06:15 PM (IST)

    PCMC Election : आरपीआय आठवले गटाची भाजपाकडे पंधरा जागांची मागणी.

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी आरपीआय आठवले गटाने भाजपाकडे पंधरा जागांची मागणी केली आहे. मात्र आता भाजप यावर कार निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे, महानगरपालिका निवडणूकीसाठी भाजपाला पहिलं प्राधान्य द्या अशी सूचना रामदास आठवले यांनी नेत्यांना केली आहे.

  • 26 Nov 2025 05:57 PM (IST)

    गेवराईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवक पदाच्या महिला उमेदवाराचे निधन

    बीडच्या गेवराई नगरपरिषदेच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका पदाच्या उमेदवार दुरदाना बेगम सलीमोद्दीन फारुकी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालंय. तर मातोश्रींचे छत्र हरवल्याचे दुःख सहन न झाल्याने वसीम फारुकी यांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे वसीम फारुकी यांना रुग्णालयात करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्यासह माजी नगराध्यक्ष महेश अण्णा दाभाडे यांनी त्यांची सांत्वनपर भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली.

  • 26 Nov 2025 05:40 PM (IST)

    डोंबिवलीतल धक्कादायक घटना, पत्नीला संपवलं

    डोंबिवलीतल धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीत कोळेगाव परिसरात किरकोळ वादातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. ज्योती धाहीजे असे मयत पत्नीचे नाव आहे. तर पोपट धाहीजे असे हत्या करणाऱ्याचं नाव आहे. पत्नीला संपवल्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. पोलिसांची 2 विशेष पथकं आरोपीच्या शोधात आहेत.

  • 26 Nov 2025 05:22 PM (IST)

    मी बीड जिल्ह्याची आजन्म पालक, प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार : पंकजा मुंडे

    मी बीड जिल्ह्याची आजन्म पालक आहे. पालकमंत्री जालन्याची असले तरी मंत्री म्हणून मी बीड जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार आहे. अधिकाऱ्यांना कामाला लावणार आहे. असं भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मनातील बीड जिल्ह्याची पालकमंत्री होण्याची सुप्त इच्छा प्रगट केल्याची चर्चा होत आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे अजित पवार यांच्याकडे आहे. पंकजा मुंडे यांनी ऐन निवडणुकीत असे वक्तव्य केल्याने बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

  • 26 Nov 2025 05:03 PM (IST)

    अहिल्यानगर नगरपंचायत निवडणूक अपील संदर्भातील युक्तिवाद पूर्ण

    अहिल्यानगर नगरपंचायत निवडणूक अपील संदर्भातील सर्व बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. मात्र निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. न्यायाधीशानी निर्णय राखून ठेवला आहे. जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांच्या कोर्टासमोर उज्वला थिटे, प्राजक्ता पाटील आणि सरकार पक्षाच्या वतीने तिन्ही वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. या प्रकरणावर आज सकाळपासून युक्तिवाद सुरु होता. जवळपास 4 तास युक्तिवाद चालला. त्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखीव ठेवलाय. या अपील संदर्भात न्यायाधीश काय निर्णय देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

  • 26 Nov 2025 04:53 PM (IST)

    मालेगावात पुन्हा बालिकेचा विनयभंग

    मालेगावात पुन्हा एका बालिकेचा विनयभंग घडला आहे. एका १३ वर्षीय गतीमंद बालिकेचा विनयभंग केल्या प्रकरणात ५५ वर्षीय नराधम व्यावसायिकाला अटक झाली आहे.

  • 26 Nov 2025 04:39 PM (IST)

    रसायनी येथील पातळगंगा एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

    पातळगंगा ॲडिशनल एमआयडीसीमध्ये पिडिलाईट कंपनीजवळील एका कंपनीला अचानक भीषण आग लागली आहे. परिसरात धुराचे लोट पसरले असून अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल होत असून आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.

  • 26 Nov 2025 04:26 PM (IST)

    वाशीम : लाडक्या बहिणींनी सभेला गर्दी केली तेव्हा शिवसेना जिंकली – एकनाथ शिंदे

    जेव्हा जेव्हा लाडक्या बहिणींनी सभेला गर्दी केली, तेव्हा शिवसेना जिंकली आहे. मालेगावच्या विकासाचा नवा अध्याय लिहायचा. आपल्याला राजकारण नाही तर विकास करायचा आहे. संकट,आपत्ती,पूर,असो शिवसेना नेहमीच मदतीला धावत असते असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

  • 26 Nov 2025 04:12 PM (IST)

    दहिसर येथील इमारतीच्या आगीवर नियंत्रण

    दहिसर पूर्व आनंद नगर आरएमएस इमारतीला आग लागली होती. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आणि अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

  • 26 Nov 2025 03:56 PM (IST)

    वडिलांची दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या

    वडिलांची दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या

    नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दिघवद येथील दुर्देवी घटना

    आत्महत्येचे कारण अस्पष्ट

    मात्र कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची चर्चा

    या घटनेमुळे परिसरात हळहळ

  • 26 Nov 2025 03:54 PM (IST)

    कल्याण- मुरबाड रोडवर धावत्या जेसीबीला भीषण आग

    कल्याण- मुरबाड रोडवर धावत्या जेसीबीला भीषण आग

    चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने वाचला जीव

    घटनेमुळे  शहाडनजीक मोठी वाहतूक कोंडी

    ​ कल्याणवरून मुरबाडच्या दिशेने जाणाऱ्या जेसीबीला आग

    अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

  • 26 Nov 2025 02:56 PM (IST)

    मुटकुळेंचे सर्व उमेदवार रिंगण सोडून पळाले : बांगर

    मुटकुळेंचे सर्व उमेदवार रिंगण सोडून पळाले असा खोटक टोला बांगर यांनी लगावला आहे. तसेच त्यांचे 34 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचंही बांगर यांनी म्हटलं आ

  • 26 Nov 2025 02:51 PM (IST)

    नंदुरबार नगरपालिकेसाठी प्रचार, हिना गावितांचा शिवसेनेवर आरोप

    शिवसेनेचे आमदार गद्दार भूमाफिया आहेत, अशी टीका हिना गावितांनी केली आहे. नगरपालिकेच्या जागा मशीद, दर्गा, उर्दू शाळांना दिल्याचा आरोप हिना गावितांनी केला आहे.

  • 26 Nov 2025 02:26 PM (IST)

    भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकडून निलेश राणेंवर निशाणा

    सिंधुदुर्गात भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी निलेश राणेंवर निशाणा साधला आहे. निलेश राणे निवडणूक आयोगाला खोटं ठरवत आहेत असा आरोप शिल्पा यांच्याकडून करण्यात आला आहे.

  • 26 Nov 2025 02:11 PM (IST)

    पुणे जमीन प्रकरणात खोटी कागदपत्रं सादर करून स्टॅम्प ड्युटी घेतली : दमानिया

    पुणे जमीन प्रकरणात खोटी कागदपत्रं सादर करून स्टॅम्प ड्युटी घेतल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. पुणे जमीन प्रकरणात घोटाळा आहे अशी शंकाही अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे.

  • 26 Nov 2025 01:50 PM (IST)

    नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणुकींची लगबग

    नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणुकींची लगबग सुरू झाली असून अनेक इच्छुक उमेदवारांकडून आता महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतले जात आहेत. एकीकडे भाजपकडून नि:शुल्क उमेदवारी अर्ज यांचे वाटप केले जात आहे, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून 5 हजार रुपये उमेदवारी अर्जाचे घेतले जात आहेत.

  • 26 Nov 2025 01:40 PM (IST)

    नंदुरबार नागरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकणार- दादा भुसे

    “नंदुरबार नागरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकणार. आपल्या विरोधात असलेले नेते आता आपल्यासोबत आहेत. नगरपालिकेच्या विकासासाठी एकनाथ शिंदे काम करणार आहेत. कारण नगरविकास खातं शिंदेंकडे आहे,” असं दादा भुसे म्हणाले.

  • 26 Nov 2025 01:31 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा- दमानिया

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 24 तासांत अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. अजित पवारांनी राजीनामा दिला नाही तर दिल्लीत जाऊन अमित शाहांना भेटणार, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे.

  • 26 Nov 2025 01:20 PM (IST)

    काँग्रेस जिल्हाध्यक्ष अपहरण आणि मारहाण प्रकरणी काँग्रेस पदाधिकारी आक्रमक

    काँग्रेस जिल्हाध्यक्ष अपहरण आणि मारहाण प्रकरणी काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. काँग्रेस आमदार हेमंत ओगलेसह पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. मारहाण झालेले संजय गुजर यांच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

  • 26 Nov 2025 01:10 PM (IST)

    माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी कारचालकाचा खुलासा

    नाशिक –  माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी कारचालकाकडून अनवधानाने अपघात झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी याबाबतचा खुलासा केला आहे. तर कारचालक रामनाथ चौहान पोलिसांच्या ताब्यात आहे. कार चालवताना ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबल्या गेल्याने अपघात झाल्याचा खुलासा त्याने केला.

  • 26 Nov 2025 01:00 PM (IST)

    संविधान दिनानिमित आज काँग्रेसकडून गौरव मार्चला सुरुवात

    संविधान दिनानिमित आज काँग्रेसकडून गौरव मार्चाला सुरुवात होणार आहे. कांग्रेस, सीपीआय आणि आरपीआयचे कार्यकर्ते एकत्र मार्च काढणार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक कुर्ला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, चेंबूरपर्यंत हा मार्च काढण्यात येईल. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वातील हा मार्च म्हणजे मुंबई कांग्रेसचं कुर्ला, चेंबूर या मागास पट्ट्यात एकप्रकारचं शक्तिप्रदर्शनच आहे.

  • 26 Nov 2025 12:46 PM (IST)

    निवडणूक आयोगाचा पुन्हा एकदा घोळ, मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली पोलखोल

    निवडणूक आयोगाचा घोळ पुन्हा समोर आला आहे. ठाणे महानगरपालिका निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नवी मुंबईची यादी दिसत आहे.  मनसे नेते अविनाश जाधव यांनी मतदाराची यादी दाखवून निवडणूक आयोगाची आणि ठाणे महानगरपालिकेची पोलखोल केली आहे.

  • 26 Nov 2025 12:27 PM (IST)

    बीड – अधिकारी सोडून पोलिस कर्मचारीच करू लागले वाहनधारकांकडून वसुली

    बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत अहमदपूर-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर नेकनूर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांनाच दंडात्मक कारवाया करण्याचे अधिकार असल्याचे आदेश असतानासुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांकडून दिवसभर या महामार्गावर वाहनधारकांवर दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत.

  • 26 Nov 2025 12:25 PM (IST)

    दिल्ली स्फोट : उमर नबीला आश्रय देणाऱ्या एका आरोपीला NIA कडून अटक

    दिल्ली लाल किल्ला स्फोटप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.  उमर नबीला आश्रय देणाऱ्या एका आरोपीला NIA कडून अटक करण्यात आली आहे. अटक केलेला आरोपी हा हरियाणाच्या धौज परिसरातील रहिवासी असल्याचे समजते

  • 26 Nov 2025 12:11 PM (IST)

    मुंबई-गोवा महामार्गावर कीटकनाशकाचा टँकर पलटला

    मुंबई-गोवा महामार्गावर कीटकनाशकाचा टँकर पलटला आहे,  हातखंबा येथे हा टँकर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली. टँकर हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे,

  • 26 Nov 2025 12:06 PM (IST)

    अनगर नगरपंचायतमध्ये अर्ज बाद झाल्याप्रकरणी उज्वला थिटे यांच्या अपीलावर सुनावणी सुरु

    सोलापूर ब्रेकिंग : अनगर नगरपंचायतमध्ये अर्ज बाद झाल्याप्रकरणी उज्वला थिटे यांच्या अपील प्रकरणावर सुनावणीला सुरुवात. आज दोन्ही बाजूचा युक्तिवाद कोर्टासमोर होणार आहे, त्यामुळे आजच्या युक्तिवादामध्ये काय मुद्दे मांडले जातात हे पाहणं महत्वाचं ठरेल.

  • 26 Nov 2025 11:56 AM (IST)

    मुंबईच्या माजी महापौरांच मतदारयादीत दोनवेळा नाव

    भाजप सोडून सर्वच बोलतायत, अशा गोंधळात निवडणुका नकोत. निवडणूक आयोगाने कोणाच्या घरी बसून हे कांड केलं. असा आयोग असेल तर लोकशाही टिकेल का? किशोरी पेडणेकरांचा सवाल. किशोरी पेडणेकरांच मतदारा यादीत दोन वेळा नाव.

  • 26 Nov 2025 11:53 AM (IST)

    एकनाथ शिंदे यांची संकल्प सभा

    यवतमाळ वणी नागपरिषद निवडणूक प्रचाराकरीता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्प सभेचे आयोजन करणात आले आहे. वणी येथील शासकीय मैदान येथे सभा होणार आहे.

  • 26 Nov 2025 11:20 AM (IST)

    ग्रामपंचायत अधिकाऱ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळूनआत्महत्या

    सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या. प्रकाश बाविस्कर असे आत्महत्या केलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव. दरम्यान जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास बाविस्कर कुटुंबीयांचा नकार. उपमुख्य अधिकाऱ्यांच्या नावाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कुटुंबीयांचा आरोप.

  • 26 Nov 2025 11:15 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेबासारखा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

    देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेबासारखा व कोल्ड ब्लड आहे हे मी बोललो ते सिद्ध झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस आपल्या बगलबच्च्याना आवरा व महाराष्ट्राचे वाटोळं होत आहे ते थांबवा ही हात जोडून विनंती. हर्षवर्धन सपकाळ यांची श्रीरामपूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा अपहरण झालं याप्रकरणी सरकारवर टीका.

  • 26 Nov 2025 10:57 AM (IST)

    धाराशिव उमरगा नगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढत, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

    धाराशिव जिल्ह्यातील उमरगा नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा शिंदे गट (शिवसेना), भाजप आणि ठाकरे गट (शिवसेना) यांच्यात जोरदार तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी शिंदे शिवसेना आणि काँग्रेसने अभद्र युती केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे उमरग्यातील अनेक आजी-माजी आमदार आणि खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

  • 26 Nov 2025 10:49 AM (IST)

    सातारकरांना एक संधी द्या, शशिकांत शिंदेंचं आवाहन

    सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा पाटील आणि उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ गांधी मैदानावर जाहीर सभा पार पडली.  प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सातारकरांना एक संधी द्या असे आवाहन केले आहे. यासोबतच त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. महादेव जानकर यांनी भाजपने शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने आमदार पळवल्याचा आरोप केला आहे.

  • 26 Nov 2025 10:38 AM (IST)

    पिंपळगावात प्लास्टिकच्या सर्रास वापरामुळे पिण्याच्या पाण्याचे आरोग्य धोक्यात

    पिंपळगाव बसवंत परिसरात प्रशासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. यामुळे परिसरातील महत्त्वाच्या पालखेड डाव्या कालव्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. या कालव्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या आणि इतर कचरा फेकल्याने जलप्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

  • 26 Nov 2025 10:26 AM (IST)

    मुंबईवरील २६/११ हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण, गेट वे ऑफ इंडिया येथे शहिदांना अभिवादन

    शातील सर्वात मोठा आणि क्रूर दहशतवादी हल्ला होऊन आज १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईत केलेल्या या भीषण हल्ल्यात १६० हून अधिक निरपराध नागरिकांचा बळी गेला, तर ४८ तास मुंबई ठप्प झाली होती. या हल्ल्यात अतुलनीय शौर्य दाखवून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी आणि जवानांना आज मुंबईतील ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया येथे आदरांजली वाहण्यात येत आहे. या कार्यक्रमाला पाहण्यासाठी आणि शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केवळ देशातीलच नव्हे, तर देश-विदेशातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.

  • 26 Nov 2025 10:17 AM (IST)

    खर्रा खातात म्हणणाऱ्यांना खरी जागा दाखवा, चित्रा वाघ यांचे महिलांना आवाहन

    भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. लाडक्या भावासोबत काही दोडके भाऊ आहेत. तुमच्या इथे पण असा दोडका भाऊ आहे.  एक भाऊ म्हणतो बहिणीच्या हातात पैसे आले पाहिजे, दुसरा दोडका भाऊ म्हणतो पैसे आले तर महिला खर्रा खातात… खर्रा खातात म्हणणाऱ्यांना खरी जागा दाखवा, असे आवाहन चित्रा वाघ यांनी महिलांना केले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी पैसे आले तर महिला खर्रा खातात, असं वादग्रस्त विधान केलं होतं, त्यावरून वाघ यांनी जगताप यांना चांगलंच धारेवर धरलं…

  • 26 Nov 2025 10:05 AM (IST)

    आमदार हिरामण खोसकर निर्मला गावित यांच्या भेटीला, चर्चांना उधाण

    इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांची आमदार हिरामण खोसकर यांनी भेट घेतली आहे.  आमदार हिरामण खोसकर आणि माजी आमदार निर्मला गावित एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत.  निर्मला गावित यांनी हिरामण खोसकर यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती.  निर्मला गावित यांच्या अपघातानंतर आमदार हिरामण खोसकर यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेतली.

  • 26 Nov 2025 09:58 AM (IST)

    काॅग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण…

    जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण आणी मारहाण… माॅर्निग वाॅकला गेलेल्या जिल्हाध्यक्षाला दोघांनी जबरदस्तीने गाडीत घातले… हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप… आज सकाळी सात वाजता घडली घटना… सचिन गुजर यांचे अपहरण करत केली जबर मारहाण… आमदार हेमंत ओगले ,सचिन गुजर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते श्रीरामपूर पोलीस ठाण्यात… गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू… पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आरोप प्रत्यारोप… त्यातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहीती…

  • 26 Nov 2025 09:45 AM (IST)

    पुण्यातील डेक्कन परिसरात मध्य रात्री दुचाकी आणि चार चाकीचा अपघात

    गरवारे कॉलेज शेजारी झाला भीषण अपघात… या अपघातात 3 गंभीर जखमी… जखमीवर पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती… अपघातात जखमी झालेल्या चालकाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवल्याची माहिती..

  • 26 Nov 2025 09:30 AM (IST)

    नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक पदाचे ८ उमेदवार बाद…

    खामगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल… राजकीय क्षेत्रात खळबळ…  नूतनीकरण न झालेल्या नोटरीकडून शपथपत्र करून घेणे आणि इतर कारण उमेदवारांना भोवले… जळगाव जामोद येथील ३ उमेदवार, शेगाव येथील २ उमेदवार तर खामगावचे ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाद… भाजपच्या ३ काँग्रेस २, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ तर एम आय एम च्या १ उमेदवारांचा समावेश ..

  • 26 Nov 2025 09:09 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी बंद असणार

    मेट्रोच्या कामानिमित्त पाणीपुरवठा करणारी वाहिनी स्थलांतरित करण्याच्या कामामुळे हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून शहरातील पिंपरी,चिंचवड,भोसरी,देहूरोड, कासारवाडी यासह काही भागात पाणीपुरवठा केला जातो. गुरुवारी सकाळी आठ ते शुक्रवारी सकाळी आठ पर्यंत बंद राहणार असल्याचं औद्योगिक महामंडळाने स्पष्ट केले आहे

  • 26 Nov 2025 08:55 AM (IST)

    निर्मला गावित अपघात प्रकरणी त्या कारचालकाला अखेर ताब्यात

    माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी त्या कारचालकाला अखेर ताब्यात. नाशिकच्या म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या रामनाथ चौहान या कारचालकला पोलिसांनी घेतले ताब्यात. काल रात्री उशिरा कारचालकाला अटक. नातवा सोबत वॉक करताना निर्मला गावीत यांना मागून आलेल्या एका कार ने धडक दिल्यानंतर झाला होता अपघात

  • 26 Nov 2025 08:50 AM (IST)

    मनपा आयुक्त जी.श्रीकांत कडक इशारा

    महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्येअसंख्य चुका असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासक जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात मतदार याद्यांमधील चुका ही गंभीर बाब असून, त्या दुरुस्त करण्याची संधी आहे. त्यानंतरही चुका निदर्शना

  • 26 Nov 2025 08:40 AM (IST)

    निवडणूक आयोगाचे पुणे महापालिकेला आदेश

    महापालिका निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या मतदार यादीत दुबार नावे मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जाणे बाहेरील मतदारांची चुकीचा समावेश असा गंभीर चुका मोठ्या प्रमाणासमोर आले आहेत.

  • 26 Nov 2025 08:30 AM (IST)

    विमानतळ परिसरात पुन्हा दिसला बिबट्या

    औंधमधील सिंध कॉलनीत बिबट्या दिसल्याची घटना ताजी असताना धानोरीतील मुजांबा वस्ती परिसरात रविवारी पहाटे आणि लोहगाव विमानतळ परिसरात सोमवारी मंगळवारी बिबट्या कॅमेरामध्ये दिसून आला. सलग दोन दिवस लोकवस्ती आणि विमानतळ परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले

  • 26 Nov 2025 08:25 AM (IST)

    धावत्या लोकलमध्ये तरुणाची जीवघेणी नशा

    धावत्या लोकलमध्ये तरुणाची जीवघेणी नशा; दरवाज्यावर लटकत नशा, व्हिडीओ व्हायरल, भर गर्दीत धावत्या लोकलच्या दरवाजावर लटकत तरुणाची नशा; प्रवाशांची दहशत. जीव धोक्यात टाकत धोकादायक नशा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल, रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

  • 26 Nov 2025 08:19 AM (IST)

    अमेडिया कंपनीला मुदत वाढ

    पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीला 42 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल भरण्याबाबत सहज जिल्हा निबंधकांनी नोटीस बजावली होती. त्या नोटिशीला उत्तर द्यायला कंपनीने मुदतवाडीच्या केलेल्या अर्जानुसार चार डिसेंबर पर्यंत म्हणणे मांडण्यास मुदतीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Published On - Nov 26,2025 8:18 AM

Follow us
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.