PHOTO | वामिकाच्या जन्मानंतर पुन्हा सेटवर परतली अनुष्का शर्मा, ‘कूल लूक’ पाहून चाहतेही उत्सुक!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) पुन्हा एकदा कामावर परतली आहे. नुकतेच तिला एका शूट दरम्यान स्पॉट केले गेले. लेकीच्या जन्माच्या दोन महिन्यांनंतर तिने पुन्हा शूटींगला सुरुवात केली आहे.

1/6
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा  (Anushka Sharma) पुन्हा एकदा कामावर परतली आहे. नुकतेच तिला एका शूट दरम्यान स्पॉट केले गेले. लेकीच्या जन्माच्या दोन महिन्यांनंतर तिने पुन्हा शूटींगला सुरुवात केली आहे. यावर्षी जानेवारीमध्ये ‘वामिका’ला जन्म दिला होता. तेव्हापासून ती मातृत्वाचा आनंद घेत होती. असे म्हटले जात होते की, ती मेपासून नव्या प्रोजेक्टसाठी शूट करण्यास सुरुवात करेल. पण, ती अचानक एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी हजर झाली होती.

2/6
यावेळी अनुष्का शर्मा बर्‍यापैकी फिट आणि कूल दिसत होती. सेटवर परतलेल्या अनुष्काला पाहिलेल्या तिच्या एका चाहत्याने म्हटले की, ‘अनुष्का शर्मा आता पुन्हा एकदा फिट झाली आहे. ती नुकतीच आई बनली आहे आणि आम्हाला खात्री आहे की, ती आपल्या व्यावसायिक आयुष्यात आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये चांगले संतुलन साधू शकेल. तिची तिच्या कामावर निष्ठा आहे.’

3/6
अनुष्का इंडस्ट्रीमध्ये तिच्या वेळ पाळण्याच्या सवयीमुळे ओळखली जाते. शूटिंग सुरू होण्याआधीच ती अनेकदा सेटवर पोहोचते. या शूटसाठीही ती ठरलेल्या वेळेच्या आधी पोहोचली होती. यावेळी ती बरीच सुंदर आणि आनंदी दिसत होती. यावेळी अनुष्काने मास्क परिधान केला होता. कूल लूकमध्ये ती व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताना दिसली.

4/6
अनुष्का शर्मा लवकरच सेटवर पूर्ण उत्साहाने काम करताना दिसणार आहे. आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्यासाठी तिने एक वेळापत्रक बनवल्याचे कळते आहे. या वेळापत्रकानुसार अनुष्का काम करणार आहे. आगामी काळात अनुष्का शर्मा बर्‍याच मोठ्या ब्रँडसाठी सातत्याने शुटिंग करणार आहे.

5/6
अनुष्काचे नवे फोटो खूप चर्चेत आले आहेत. एका ब्रँडच्या शूटसाठी ती पुन्हा कामावर परतली आहे. अनुष्काच्या या फोटोंवर लोक विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काही लोकांनी दोन महिन्यांच्या प्रसूतीनंतर तिच्या सुपरफिटनेसचे कौतुक केले, तर काहींनी लहान मुलगी घरी सोडून कामावर परत आल्याबद्दल तिच्यावर टीका देखील केली आहे.

6/6
अनुष्का अखेर 2018 मध्ये 'झिरो' या चित्रपटात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत शाहरुख खान आणि कतरिना कैफ देखील होते. सध्या ती टीव्ही जाहिरातींमध्ये व्यस्त आहे. तसेच, भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी यांच्या बायोपिकमध्येही ती झळकण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI