AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये अप्पीची भूमिका बदलणार? कथानकातील वळण पाहून प्रेक्षकांना शंका

अर्जुन अमोलला वचन देतो की तो अप्पीला परत आणेल. आता अर्जुन आपलं वचन पूर्ण करू शकेल का? अप्पीचा शोध लागेल का? या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील. 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Jan 22, 2025 | 1:53 PM
Share
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अप्पीचं संपूर्ण कुटुंब आसगावला पोहोचलंय. अमोलला गावात परतल्याचा खूप आनंद होतोय. तो शेतांमध्ये फिरतोय आणि गावातील ओळखीच्या जागांना भेट देतोय.

1 / 7
मात्र, एका अशुभ घटनेमुळे कुटुंबाची चिंता वाढली आहे. अमोलला अप्पीची आठवण येतेय आणि तिच्या विचारात अमोल मग्न आहे. त्याचवेळी अप्पी फोन करून ती लवकरच पोहोचत असल्याचं सांगते.

2 / 7
अप्पी प्रवासाला निघाल्यावर तिच्या गाडीचा डोंगराळ भागात अपघात होतो आणि ती खोल दरीत कोसळते. जेव्हा अप्पी वेळेवर पोहोचत नाही, तेव्हा संपूर्ण कुटुंब तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांना अपघाताबद्दल समजतं, पण ते अमोलला काहीच सांगत नाहीत.

3 / 7
अर्जुन घटनास्थळी धावतो, तर कुटुंब अमोलला घेऊन घरी परततं. अपघाताच्या ठिकाणी अर्जुनला कळतं की गाडी मोठ्या उंचावरून कोसळली आहे आणि स्फोट झाला आहे. ड्रायव्हरचा मृतदेह सापडतो, पण अप्पीचा कुठेही पत्ता लागत नाहीये.

4 / 7
हे पाहून अर्जुन खूपच खचतो. अप्पीचा अपघात आणि तिचा शोध सुरू असल्याची बातमी गावभर पसरते आणि अखेर अमोलला ही बातमी समजते. सर्वांना भीती वाटते की अमोल कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल, पण तो शांतपणे सांगतो की त्याची आई नक्की परतेल.

5 / 7
असं बोलताना तो स्वतःला दोष देतो की आसगावला निघताना त्याने तिला सोडून का दिलं? दरम्यान, अर्जुन अप्पीचा शोध घेण्यासाठी रात्रंदिवस झटतोय. सगळं कुटुंब हताश झालं असताना अर्जुन मात्र आशा सोडत नाहीये. कुटुंबाला काळजी आहे की अमोल पुन्हा आजारी पडेल.

6 / 7
संपूर्ण कुटुंब अमोलसाठी चिंतेत आहे आणि त्याला शाळेत परत पाठवण्यावर भर देतं, कारण सर्वांना वाटतंय की शाळेत गेल्याने तो हळूहळू सावरू शकेल. पण शाळेतून अमोलच्या वागणुकीच्या तक्रारी येऊ लागतात, ज्यामुळे अर्जुन अधिक चिंतीत होतो. डॉक्टरही अमोलच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करतात.

7 / 7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.