PHOTO: प्रियांका गांधींचं ‘मिशन आसाम’; चहाच्या मळ्यात खुडली पानं

प्रियांका गांधी यांनी महिला कर्मचाऱ्यांसोबत पारंपारिक पद्धतीने चहाची पाने खुडली. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. | Priyanka Gandhi Assam

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:13 PM, 2 Mar 2021
1/7
Assam Assembly Elections Priyanaka Gandhi plucking tea leaves in Assam
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी सधारु टी स्टेट येथे चहाच्या मळ्यातील कामगारांशी संवाद साधला.
2/7
Assam Assembly Elections Priyanaka Gandhi plucking tea leaves in Assam
यावेळी प्रियांका गांधी यांनी महिला कर्मचाऱ्यांसोबत पारंपारिक पद्धतीने चहाची पाने खुडली. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
3/7
Assam Assembly Elections Priyanaka Gandhi plucking tea leaves in Assam
चहाचा मळा आणि कामगार हे कायमच आसाममधील राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने आसाम विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे आता आसाममध्ये राजकीय नेत्यांच्या प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे.
4/7
Assam Assembly Elections Priyanaka Gandhi plucking tea leaves in Assam
प्रियांका गांधी यांनी सोमवारी कामाख्या मंदिरात देवीचे दर्शन घेऊन आसामच्या दौऱ्याला सुरुवात केली होती.
5/7
Assam Assembly Elections Priyanaka Gandhi plucking tea leaves in Assam
कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर प्रियांका गांधी लखीमपूरला रवाना झाल्या होत्या. लखीमपूर भागात प्रियांका गांधी यांनी झुमर या पारंपारिक नृत्याचा आनंदही लुटला होता.
6/7
Assam Assembly Elections Priyanaka Gandhi plucking tea leaves in Assam
आसाममध्ये विधानसभेच्या 126 मतदारसंघांमध्ये 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल अशा तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. तर मतदानाचा निकाल 2 मे रोजी जाहीर होईल.
7/7
Assam Assembly Elections Priyanaka Gandhi plucking tea leaves in Assam
प्रियांका गांधी चहाच्या मळ्यात पाने खुडताना.