AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस मराठी’मधील सर्वांत वादग्रस्त अभिनेत्रीची ‘आई तुळजाभवानी’मध्ये एण्ट्री; रुप पाहून चाहते थक्क!

जगदंबा यांना कशी सामोरी जाणार? कसे त्यांचे वार परतवून लावणार, प्रेक्षकांना 'आई तुळजाभवानी' या मालिकेच्या आगामी भागांमध्ये पहायला मिळणार आहे. ही मालिका दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होते.

| Updated on: Jul 13, 2025 | 2:41 PM
Share
‘आई तुळजाभवानी’ या मालिकेच्या कथानकात आता एक नवं वळण येणार आहे. मायेचा विनाश होईल की ती देवीला शरण जाईल हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे. पण, मायानंतर आता जगदंबेसमोर समोर आणखी दोन आव्हान उभे ठाकणार आहेत. ते म्हणजे दोन षड्रिपू ‘मोह’ आणि ‘क्रोध’.

1 / 6
येत्या आठवड्यात या दोन प्रबळ असुरी शक्तींचं अवतरण थरारक आणि रहस्यमय पद्धतीने मालिकेत होणार आहे. महिषासुराच्या क्रूर यज्ञक्रीयेने आणि दितीच्या सूचनेनुसार आता षड्रिपूंच्या शक्तीला आवाहन करण्यात आलं आहे. पट्टीग्रंथातील मंत्रोच्चार, गूढ प्रकाशयोजना, भीषण ध्वनी आणि वेगवेगळ्या आहुतींच्या माध्यमातून ‘क्रोध’ आणि ‘मोह’ या दोन शक्तींना जागृत केलं जाणार आहे.

2 / 6
मालिकेत 'मोह' षड्रिपूंचं मोहिनी रूप अभिनेत्री जान्हवी किल्लेकर साकारणार आहे. 'भाग्य दिले तू मला' आणि ‘बिग बॉस मराठी’सारख्या कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेली जान्हवी आता 'आई तुळजाभवानी'मध्ये एक वेगळी, अनोखी भूमिका साकारताना दिसणार आहे.

3 / 6
या भूमिकेविषयी जान्हवी म्हणाली, "मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा ही खूपच वेगळी आहे. त्यामुळे मला सुरुवातीला थोडं दडपण आलं होतं. माझे कॉस्च्युम खूप वजनदार आहेत. मला विशिष्ट पद्धतीने साडी नेसवली आहे, केशभूषा आगळीवेगळी आहे. भाषाही खूप वेगळी आणि अवघड आहे. पण माझ्यासाठी हा एक वेगळाच अनुभव आहे."

4 / 6
एकीकडे ‘क्रोध’ ही उग्र आणि आक्रमक ऊर्जा भयंकर लाव्हा रसासोबत अवतरते, तर दुसरीकडे ‘मोह’ एक मोहक, लालित्यपूर्ण आणि नखरेल पण धोका असलेली शक्ती बनून समोर येते. "तुळजा सावध रहा, आम्ही एकाच संकटाची दोन टोकं आहोत. एक जाळतो, एक गुंतवतो  पण दोघंही संपवतो", असा इशारा देत क्रोध आणि मोह आता देवीसमोर उभे ठाकणार आहेत.

5 / 6
क्रोध आणि मोहच्या येण्याने मालिकेत रंगत, गूढता तिप्पट वाढणार आहे. 'आई तुळजाभवानी' मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये महिषासुराचे डावपेच, मोह आणि क्रोध यांची ताकद, आणि त्यांच्यासमोर आई तुळजाभवानीच्या बालरूप जगदंबेची सज्जता हे सर्व रंगतदार पैलू प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहेत.

6 / 6
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.