2 महिन्यात 5 जबरदस्त गाड्या भारतात लाँच, जाणून घ्या कोणती कार आहे तुमच्यासाठी परफेक्ट

गेल्या दोन महिन्यांमध्ये कार निर्मात्या कंपन्यांनी 5 दमदार कार लाँच केल्या आहेत. यामध्ये 2021 MG Hector Facelift, Toyota Fortuner Facelift, 2021 Jeep Compass, 2021 Tata Safari आणि Renault Kiger या कार्सचा समावेश आहे.

1/6
लॉकडाऊन संपल्यापासून बाईक आणि कार सेलमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी नवीन बाईक आणि कार बाजारात सादर करण्याचा धडाका लावला आहे. 2021 च्या सुरूवातीलाच अनेक कंपन्यांनी कार आणि बाईक बाजारात आणण्यास सुरवात केली आहे जेणेकरून अधिकाधिक ग्राहकांना त्याकडे आकर्षित करता येईल. गेल्या दोन महिन्यांमध्ये कार निर्मात्या कंपन्यांनी 5 दमदार कार लाँच केल्या आहेत. यामध्ये 2021 MG Hector Facelift, Toyota Fortuner Facelift, 2021 Jeep Compass, 2021 Tata Safari आणि Renault Kiger या कार्सचा समावेश आहे.

2/6
2021 MG Hector Facelift : एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनीने भारतात MG हेक्टरची नवी गाडी लाँच केली आहे.मिड साइज एसयूव्ही एमजी हेक्टरला सध्या भारतीय बाजारात चांगली पसंती मिळत आहे. MG Motor India ने ही प्रसिद्ध कार 7 सीटर व्हेरियंटसह (MG Hector Plus 7 Seater) जानेवारी 2021 मध्ये लाँच केली आहे.  या कारमध्ये कंपनीने नवीन CVT गियरबॉक्स सध्याच्या पेट्रोल इंजिनसोबत जोडलं आहे. यापूर्वी एमजी हेक्टर पेट्रोल वेरियंट डुअल-क्लच ट्रान्समिशनसह (DCT) सादर करण्यात आलं होतं. नवीन CVT युनिट 2021 एमजी हेक्टरमध्ये 1.5-लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनसोबत जोडलं जाईल. हे इंजिन 141 बीएचपी आणि 250 एनएम टार्क जनरेट करतं. सध्या हे 6-स्पीड मॅनुअल आणि डीसीटी गियरबॉक्ससह दिलं जातं. नव्या ट्रान्समिशन अपडेटसह एमजी इंडिया हेक्टरची किंमत जवळपास 50,000-60,000 रुपयांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या कारच्या 7 सीटर व्हेरिएंटची किंमत 13.34 लाख रुपये ते 18.32 लाख रुपयांच्या घरात आहे.

3/6
Renault Kiger : रेनॉ इंडियाने (Renault India) त्यांची सब फोर मीटर SUV कायगर (Renault Kiger) 15 फेब्रुवारी ला भारतात लाँच केली आहे. नवीन रेनॉ कायगरची एक्स-शोरूम किंमत 5.45 लाख रुपयांपासून सुरु होते. तर या कारच्या टॉप वेरियंटची किंमत 9.55 लाख रुपये इतकी आहे. रेनॉ कायगरमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 99 bhp पॉवर आणि 160 Nm टॉर्क निर्माण करु शकतं. सोबतच 5 स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन स्टँडर्डची सुविधा असेल. AMT सह सीवीटी ट्रांसमिशनचा पर्यायही देण्यात आला आहे. रेनॉ कायगरमध्ये मल्टीसेंस ड्राइव्ह मोड फीचर देण्यात आलं आहे. ही कार इको, नॉर्मल आणि स्पोर्ट मोडवर चालवता येईल. Renault Kiger ही कार कंपनीने एकूण 4 वेरिएंटमध्ये सादर केली आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ मॉडलचा समावेश आहे.

4/6
Toyota Fortuner facelift : टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने जानेवारी 2021 मध्ये फॉर्च्युनरचे फेसलिफ्ट आणि नवीन Legender व्हेरिएंट बाजारात आणलं आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 29.98 लाख रुपये इतकी आहे. या कारच्या टॉप एन्ड व्हेरिएंटसाठी तुम्हाला 37.58 लाख रुपये मोजावे लागतील. टोयोटा फॉर्च्यूनरमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्याय मिळतील. नवीन फॉर्च्युनर सध्याच्या (रेग्युलर) 2.8L डिझेल इंजिनचं पॉवरफुल व्हर्जन आहे. अपडेटेड फॉर्च्यूनर 201 bhp पॉवर आणि 500Nm टॉर्क जनरेट करते. याच्या ट्रान्समिशनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अपडेटेड मॉडल 6 स्पीड मॅन्यूअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्ससोबत आहे. या एसयूव्हीच्या फ्रंट एंडमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नव्या डिझाईनमध्ये मॅश पॅटर्न ग्रिल, LED DRL सह रिवाइज्ड हेडलँप्स, अपडेटेड फॉग लँप इनक्लोजर, नवे बंपर, सिल्व्हर स्किड प्लेटही आहे. तसेच यामध्ये नव्या डिझाईनसह एलॉय देण्यात आले आहेत.

5/6
Tata Safari 2021 : टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीने त्यांची नवीन टाटा सफारी (Tata Safari 2021) 7 सीटर कॉन्फिग्रेशनमध्ये लाँच केली आहे. Tata Safari 2021 SUV ची सुरुवातीची किंमत 14.69 लाख रुपये (एक्स शो-रूम) इतकी ठेवण्यात आली आहे. या कारच्या टॉप वेरियंटची किंमत 21.25 लाख रुपये इतकी आहे. 90 च्या दशकात भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी टाटा सफारी आता अधिक अपग्रेडेड तंत्रज्ञानासह आपल्या भेटीला आली आहे. सफारी एकूण सहा व्हेरियंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ या व्हेरियंट्सचा समावेश आहे. तसेच ईपीबी (इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक) आणि एका मोठ्या पॅनरोमिक सनरूफप्रमाणे काही टॉप फीचर्सना ही कार सपोर्ट करते. तसेच अधिक नियंत्रणासाठी यामध्ये ESP आधारित टेरेन रिस्पॉन्स मोडही देण्यात आला आहे. या कारच्या बुकिंगला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे.

6/6
2021 Jeep Compass : नवीन Jeep Compass (जीप कंपास) मध्ये तुम्हाला 1.4-लीटरचे टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल जे 163 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय यात 2.0-लीटर डिझेल इंजिन देखील देण्यात आले आहे जे 173 पीएसची शक्ती आणि 350 एनएमची टॉर्क जनरेट करते. त्या कारची सुरुवातीची किंमत (एक्स-शोरूम) 16.99 लाख रुपये आहे आणि या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 28.29 लाख रुपये इतकी आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI