By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.
यावर्षीच्या कापसाला भाव नसल्याने कापसाचा मृत्यू झाला असल्याचं शेतकरी म्हणत आहेत.
शेतकऱ्यांसह ठाकरे गटाच्या वतीने कापसाची जामनेरमध्ये अंत्ययात्रा काढून आंदोलन केले.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी निषेध नोंदवला.
कापूस भाव वाढत नसल्यामुळे घरात पडून मेला, ठाकरे गटाच्यावतीने शोकाकुल पत्र काढत शोकाकुल वातावरणात राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
कापसाची अंत्ययात्रा काढताना कापसाला भाव मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये कार्यकर्त्यांनी केली.