AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heavy Rain : धाराशिवमध्ये पावसाचा कहर.. नद्यांना महापूर, रस्ते बंद; जाणून घ्या कुठे काय परिस्थिती?

चांदणी, उलका, उल्फा या नद्यांना महापूर आला आहे. रुई, दुधी, ढगपिंपरी, देवगाव (खु.), वडनेर, आवारपिंपरी, वागेगव्हाण परिसरातील नदीकाठी आणि वस्त्यांवर राहत असलेले अडीचशे ते तीनशे जण पाण्यात अडकल्याने या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

| Updated on: Sep 23, 2025 | 11:32 AM
Share
धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. धाराशिवच्या भूम परंडासह कळंब परिसरातही रात्री जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक रस्ते बंद  असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

1 / 6
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. भूम परंडा भागात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची ते पाहणी करत आहेत. मुसळधार पावसामुळे इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या 65 लोकांना वाचवण्यात आलं आहे.

2 / 6
धाराशिवमधल्या सिरसावगावातील घराघरात  पुराचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे अन्नधान्य, पीठ, जीवनावश्यक वस्तू वाहून गेले आहेत. चांदणी नदीला आलेल्या पुरात नागरिकही अडकले होते. त्याचसोबत पशुधनाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विद्यार्थ्यांचं शालेय साहित्यही पाण्यात भिजल्याच्या घटना समोर येत आहेत.

3 / 6
धाराशिवमधल्या दुधना, चांदणी आणि बानगंगा नदी परिसरातील सोयाबीन शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. सोयाबीनसह अन्य पिकंही वाहून गेली आहेत. भूम तालुक्यातील बेदरवाडी इथली सोयाबीनची शेती पूर्णपणे नष्ट झाली आहे.

4 / 6
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे ढगपिंपरी, वडनेर भागातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्काराला पाचारण करावं लागलं. पावसाने शेती-शिवारात पाणीच पाणी आहे.

5 / 6
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात पिंपळगाव इथल्या गोठ्यात बांधलेल्या 20 गायी पुरामुळे दावणीला दगावल्या. भूम तालुक्यातील तीन गावांतील सहा कुटुंबांतील एकूण 14 जणांना पुराच्या पाण्यातून हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित बाहेर काढलं.

6 / 6
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.