AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरु परमात्मा परेशु… आमिरच नव्हे हे अभिनेतेही बनले कोच, अनोख्या शिकवणीने गाजवला मोठा पडदा

अभिनेता आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात आमिरने प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. पण याआधीही बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आले आहेत ज्यात बॉलिवूडचे कलाकार प्रशिक्षकांच्या अर्थात कोचच्या भूमिकेत दिसले आहेत.

| Updated on: Jun 23, 2025 | 10:59 AM
Share
बॉलिवूडमध्ये मि.परफेक्शनिस्ट नावाने ओळखला जाणारा सुपरस्टार आमिर खान याने त्याच्या गेल्या 4 दशकांच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. कधी तो रोमँटिक हिरो म्हणून दिसला, तर सरफरोश सारख्या चित्रपटातू नकधी त्याचा डॅशिंग अंदाजही दिसला. तर कधी कॉमेडीद्वारे त्यांना लोकांना खळखळून हसवलं. हाच आमिर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यावर प्रेरणादायी भूमिका साकारत आहे. चित्रपटांमध्ये तो मेंटर किंवा कोचच्या भूमिकेत दिसला.

1 / 9
पण बॉक्स ऑफिसवर अशी भूमिका करणारा तो काही एकमेव अभिनेता नाही. वर्षानुवर्षे असे अनेक प्रेरणादायी चित्रपट बनवले जात असून त्या या चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्यांनी प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. आमिर स्वतः देखील प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला आहे. चित्रपटांमध्ये कठीण प्रशिक्षकांची भूमिका साकारणाऱ्या अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेऊया.

2 / 9
2022 मध्ये आलेल्या 'झुंड' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 80 व्या वर्षी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका लोकांना खूपच आवडली, त्यांचं बरंच कौतुकही झालं. त्यांचा हा चित्रपट वास्तविक जीवनापासून प्रेरित होता. या चित्रपटात त्यांनी विजय बोराडेची भूमिका साकारली. त्या चित्रपटात ते मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉल शिकवताना दिसले.

3 / 9
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहेत यात शंकाच नाही. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेकविध भूमिका साकारल्या आहेत आणि त्यासाठीच त्यांना खूप प्रेम, कौतुक आणि आदरही मिळाला आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या 'इक्बाल' चित्रपटात त्यांनी एका क्रिकेट प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात श्रेयस तळपदे हा प्रमुख भूमिकेत होता.

4 / 9
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननेही एकदा प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. 2007 साली आलेल्या, प्रचंड गाजलेल्या 'चक दे ​​इंडिया' चित्रपटात तो हॉकी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला होता. या भूमिकेतील त्याचा खणखणीत अभिनय, त्याची स्टाईल, त्याचं काम लोकांना प्रचंड आवडलं आणि चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरही चांगलीच कमाई केली होती.  त्याने वास्तविक जीवनातील प्रेरित भूमिका साकारली.

5 / 9
साऊथमधील तसेच बॉलिवूडमधीलही अनेक चित्रपटांमध्ये चांगल्या भूमिका साकारणारा अभिनेता आर माधवन हाही एक चित्रपटामध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेतही दिसला आहे. सुधा कोंगारा प्रसाद दिग्दर्शित 'साला खडूस' चित्रपटात त्याने मुख्य प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील आर माधवनच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. पण बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.

6 / 9
तर आर बाल्की दिग्दर्शित 'घूमर' हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट होता ज्यामध्ये अभिषेक बच्चनने प्रशिक्षकाची मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिषेकसोबत सैयामी खेर ही प्रमुख भूमिकेत होती. घूमरमध्ये अभिषेक हा क्रिकेट कोच म्हणून झळकला आणि त्याने महिलाच्या क्रिकेट टीमला कोचिंग दिल्याचं दाखवण्यात आलं. 2023 साली हा चित्रपट रिलीज झाला होता.

7 / 9
राजेश शर्मा यांनी गेल्या दशकात अनेक मोठ्या आणि छोट्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या अभिनेत्याने एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरीमध्येही महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ते धोनीच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसले होते. चित्रपटातील त्यांचा अभिनय खूपच प्रभावी होता आणि सर्वांना तो खूप आवडलाही होता.

8 / 9
गुणी अभिनेता असलेल्या राजकुमार रावबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 'छलांग' नावाचा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट केला. हा एक रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट होता जो 2020 साली प्रदर्शित झाला. हंसल मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं आणि त्यांनी त्यांच्या पारंपारिक दिग्दर्शन शैलीपेक्षा काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. या चित्रपटात राजकुमार याच्याव्यतिरिक्त नुसरत भरुचा, मोहम्मद झीशान अय्युब आणि सौरभ शुक्ला हे देखील दिसले होते. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.

9 / 9
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....