Skin Care : खोबरेल तेलापासून तयार केलेले हे फेस मास्क वापरा आणि हिवाळ्यात सुंदर त्वचा मिळवा!
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, त्वचेवर पुरळ येते आणि अनेकांना त्वचेवर खाज येण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. खोबरेल तेल त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यास मदत करते. खोबरेल तेल नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. त्वचेची सूज दूर करण्यासाठी एका भांड्यात एक कप खोबरेल तेल आणि एक चमचा शिया बटर वितळवा.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, त्वचेवर पुरळ येते आणि अनेकांना त्वचेवर खाज येण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. खोबरेल तेल त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यास मदत करते. खोबरेल तेल नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते.
1 / 5
त्वचेची सूज दूर करण्यासाठी एका भांड्यात एक कप खोबरेल तेल आणि एक चमचा शिया बटर वितळवा. ते थंड झाल्यावर त्यात एक चमचा मध मिसळा आणि मानेपासून चेहऱ्यापर्यंत लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा धुवा. यामुळे जळजळ होण्याची समस्या दूर होईल
2 / 5
एक चमचा खोबरेल तेल आणि टी ट्री ऑइलचे दोन ते तीन थेंब घाला. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा लावा. काही वेळ चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा आणि झोपी जा. सकाळी उठल्यावर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
3 / 5
खोबरेल तेल, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लिंबाचा रस, एक चमचा मध मिक्स करून चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
4 / 5
त्वचेवर चमक आणण्यासाठी एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा कॉफी पावडर मिक्स करून चेहऱ्याला लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. 10-15 मिनिटे चेहऱ्यावर कोरडे होऊ द्या. शेवटी कोमट पाण्याने चेहरा धुवा.