उन्हाळ्यात पायांच्या तळव्यावर जळजळ होण्याची समस्या आहे? तर हे घरगुती उपाय नक्की करा!
तळव्यांना खाज सुटण्याची समस्या दूर करण्यासाठी आपण बादलीत पाणी भरावे. त्यात थोडे खडे मीठ टाका. त्यात काही वेळ पाय ठेवा. या पाण्यात तुम्ही व्हिनेगरही टाकू शकता. यामुळे पायांना आराम मिळेल. कोरफड, खोबरेल तेल आणि कापूर मिक्स करून घ्या. हे आता पायाच्या तळव्यावर लावा. हे मिश्रण पायांना थंड ठेवण्याचे काम करेल आणि यामुळे पायांची जळजळ थांबण्यास मदत होईल.
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये अनेकांना पायात जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. पायात कोरडेपणा, युरिक ऍसिड वाढणे, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता यामुळे ही समस्या उद्भवते. अनेक वेळा मधुमेहामुळे पायात जळजळ होण्याची समस्या असते.
1 / 5
हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. हे पायांची जळजळ कमी करण्यास मदत करते. यासाठी हळदीमध्ये खोबरेल तेल मिसळून पायाला लावा. यामुळे पायांना आराम मिळेल. त्यात अँटीबायोटिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत.
2 / 5
तळव्यांना खाज सुटण्याची समस्या दूर करण्यासाठी आपण बादलीत पाणी भरावे. त्यात थोडे खडे मीठ टाका. त्यात काही वेळ पाय ठेवा. या पाण्यात तुम्ही व्हिनेगरही टाकू शकता. यामुळे पायांना आराम मिळेल.
3 / 5
कोरफड, खोबरेल तेल आणि कापूर मिक्स करून घ्या. हे आता पायाच्या तळव्यावर लावा. हे मिश्रण पायांना थंड ठेवण्याचे काम करेल आणि यामुळे पायांची जळजळ थांबण्यास मदत होईल.
4 / 5
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. अनेक वेळा शरीरात टॉक्सिन जास्त झाल्यामुळे पायात जळजळ आणि खाज सुटते. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)