AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचं 53 व्या मजल्यावरचं स्वप्नवत घर; समुद्राच्या विहंगम दृश्यापासून म्युझिक रुमपर्यंत, पहा खास झलक

Madhuri Dixit: मुंबईतील एका उंच इमारतीच्या 53 व्या मजल्यावर माधुरी दीक्षितचं हे अत्यंत आलिशान आणि सुंदर असं घर आहे. या घरातून समुद्राचं विहंगम दृश्य पहायला मिळतं.

| Updated on: Sep 08, 2026 | 8:33 AM
Share
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिच्या अभिनयाइतकंच तिचं वैयक्तिक आयुष्य आणि तिची लाइफस्टाइलही चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. आता तिच्या मुंबईतील आलिशान घराची झलक समोर आली असून, या घरातील प्रत्येक कोपरा माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्या आवडी-निवडीची खास झलक दाखवतो.

1 / 9
तब्बल 5500 चौरस फुटांच्या या घराची खासियत म्हणजे समुद्राचं विहंगम दृश्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसैन यांच्या कलाकृतींचा अप्रतिम संगम.

2 / 9
माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांचं हे घर मुंबईतील एका उंच इमारतीच्या 53व्या मजल्यावर आहे. या घरातून अरबी समुद्र आणि मुंबईच्या स्कायलाइनचं सुंदर दृश्य दिसतं. घराची रचना प्रसिद्ध आर्किटेक्ट अपूर्वा श्रॉफ यांनी केली आहे.

3 / 9
घरासाठी माधुरी आणि डॉ. नेने यांची कल्पना अगदी स्पष्ट होती. आधुनिक, पण कमीत कमी सजावट असलेलं आणि कुटुंबाला आरामदायी वाटेल असं घर. त्यामुळे घराच्या इंटिरिअरमध्ये सरळ रेषा, न्यूट्रल रंग आणि मोकळी जागा यांना महत्त्व देण्यात आलं आहे.

4 / 9
या घरात प्रवेश करताच सर्वांचं लक्ष वेधून घेतात त्या एम. एफ हुसैन यांच्या रंगीबेरंगी पेंटिंग्स. हुसैन यांनी माधुरीला काही खास चित्रं भेट दिली होती. घराच्या प्रवेशद्वाराजवळच हुसैन यांची गणेशाची चित्रं पाहायला मिळतात.

5 / 9
डॉ. श्रीराम नेने हे तंत्रज्ञानाचे चाहते असल्यामुळे घरात स्मार्ट ऑटोमेशनचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. घरातील लाइटिंगपासून विविध सुविधांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मात्र, टेक्नॉलॉजीचा वापर करताना घराचा शांत आणि आकर्षक लूक कायम ठेवण्यात आला आहे.

6 / 9
घरात होम थिएटर आणि स्वतंत्र म्युझिक रूम देखील आहे. या रूममध्ये गिटार, ड्रम्स आणि पियानो ठेवण्यात आले आहेत. कुटुंबासोबत संगीताचा आनंद घेण्यासाठी ही जागा खास तयार करण्यात आली आहे. याशिवाय ऑटोमेटेड बार आणि अत्याधुनिक गॉरमेट किचनही घराचा आकर्षणाचा भाग आहे.

7 / 9
इतक्या महागड्या आणि आधुनिक सुविधांनी सजलेल्या घरामागे माधुरीसाठी एक भावनिक बाजूही आहे. तिच्यासाठी घर म्हणजे केवळ लक्झरी किंवा इंटिरिअर नसून कुटुंबासोबत निवांत आणि आनंदी वेळ घालवण्याची जागा आहे.

8 / 9
समुद्राचं शांत दृश्य, कलेचा सहवास, संगीत आणि कुटुंबासाठी तयार केलेल्या जागा यामुळे या घराला एक खास वैयक्तिक स्पर्श मिळतो.

9 / 9
Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा

दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...