धनंजय मुंडे-प्रीतम मुंडे एकाच मंचावर, पण एकमेकांकडे ना पाहिलं, ना बोलले, पाहा फोटो

1/7
बीड : राज्याच्या राजकारणात मुंडे घराण्याला मोठे स्थान आहे. या घराण्यातील नेत्यांच्या एका इशाऱ्यावर अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे.

2/7
धनंजय मुंडे आणि प्रीतम, पंकज मुंडे यांच्यातील राजकीय वैरसुद्धा महाराष्ट्रासाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. या बंधू-भगिनींमधील राजकीय चढाओढ आपण अनेकदा पाहिली आहे.

3/7
त्यांच्या याच राजकीय वैराची झलक बीडमधील परळी येथील एका कार्यक्रमात पाहायला मिळाली.

4/7
परळी शहरात काल (30 ऑगस्ट) स्वर्गीय मनोहरपंत बडवे सभागृह लोकार्पण सोहळा तसेच विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे, आणि खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.

5/7
या कार्यक्रमात मुंडे भाऊ-बहीण एकमेकांच्या बाजूला बसले होते. मात्र, शेजारी बसूनदेखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा किंवा संवाद झाला नाही. दोघांमध्ये संवाद न झाल्यामुळे हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरतोय.

6/7
मात्र, या कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर राजकीय शेरेबाजी मात्र मोठ्या ताकदीने केली. प्रीतम मुंडे यांना कार्यक्रमाला यायला उशीर झाल्याने त्यांनी परळीच्या शहरांतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेवर बोट ठेवले.

7/7
तर त्याला उत्तर म्हणून धनंजय मुंडे यांनी परळीचा पायाभूत विकास सुरु आहे, त्यामुळे ताईला इथे पोहोचण्यास उशीर झाला, अशी कोपरखळी मारली. याच राजकीय टोलेबाजीवर सध्या वेगवेगळी चर्चा होत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI