आधी किस वाल्या महिलेची चर्चा, आता शिवराळ भाषा वापरणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ, नियमांचे उल्लंघन नेमके कशासाठी?

राजस्थान मधील जोधपूर येथे एका रेल्वे स्थानकावर एका तरुणीने पोलिसांशी चांगली हुज्जत घातली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:17 AM, 22 Apr 2021
1/6
कानपूर : देशात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे चिंतासुद्धा वाढली आहे.कोरोनावर संसर्गाला वेळीच थोपवता यावे म्हणून देशात वेगवेगळे नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, अनेकांकडून या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. अनेकांकडून या नियमांची पायमल्ली केली जात आहे.
2/6
काही ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकारसुद्धा अनेक ठिकाणाहून समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांशी हुज्जत घालणारा असाच एक व्हिडीओ मध्यंतरी चांगलाच व्हायरल झाला होता. "माझ्या मनात आलं तर मी माझ्या नवऱ्याला इथेच किस करेल, तुम्ही काय करणार," अशा भाषेत पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या या महिलेवर सोशल मीडियावर चांगलीच टीका झाली होती.
3/6
आता तसाच एक प्रकार समोर आला आहे. राजस्थान मधील जोधपूर येथे एका रेल्वे स्थानकावर एका तरुणीने पोलिसांशी चांगली हुज्जत घातली आहे. तिने पोलिसांशी बोलताना शिवराळ भाषेचासुद्धा वापर केलाय. सध्या तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
4/6
मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी जोधपूरला आली होती. भोपाळ एक्स्प्रेसमधून उतरल्यानंतर पोलिसांनी तिली आडवलं. तसेच तिने कोरोना चाचणी केलेली आहे का हे विचारलं. राजस्थान सरकारने बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक केल्यामुळे पोलिसांनी ही चौकशी केली.
5/6
मात्र, या तरुणीने टेस्ट करायला थेट नकार दिला. तसेच, पोलिसांनी विनवणी करुनही ही तरुणी ऐकत नव्हती. तिने जवळपास एक तास रेल्वे स्थानकावर गदारोळ केला. व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही तरुणी महिला पोलिसांनासुद्धा दाद देत नव्हती.
6/6
या सर्व घटनेचा व्हिडीओ स्थानकावरील एका प्रवाशाने शूट केला असून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी या तरुणीला समजावून सांगताना दिसत आहेत. तरीही या तरुणीने दाद न दिल्यामुळे नंतर या तरुणीला पोलिसांनी नियमानुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असं सांगितल्यावर आपली कोरोना चाचणी करण्यास परवानगी दिली. दरम्यान हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.