Maharashtra Assembly Session 2026 LIVE : अजितदादा बेस्ट चीफ मिनिस्ट महाराष्ट्र नेव्हर हॅड – देवेंद्र फडणवीस
Maharashtra Assembly Budget Session 2026 LIVE Updates: आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पहिल्यांदाच अधिवेशात उपस्थित राहणार आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च 2026 रोजी राज्याचं अर्थसंकल्प सादर करणार आहेत... या ब्लॉगमध्ये राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं गाजणार याबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घ्या...

LIVE NEWS & UPDATES
-
दादांचे फोटो डोळ्यासमोरून जात नाही- छगन भुजबळ
आदल्या दिवशी दादा आमच्यात होते. दादांचे फोटो डोळ्यासमोरून जात नाही. अश्या पद्धतीने दादा जावं योग्य नव्हतं. अजित पवार राज्यमंत्री झाले तेव्हा माझी ओळख झाली. लोकांना जोडणं ही पवार साहेबांची शैली आहे. तीच शैली अजित पवारांनी वापरली. दादांनी सर्वाना मदत केली. आम्ही स्वप्न पाहत होतो की दादा एक दिवस मुख्यमंत्री होतील. अचानक दादा डाव मोडून गेले. आधारवड खाली अनेकजण सावली घेतात. आधारवड उलमडून पडल्यावर कळत किती मोठा होता. दादाच्या बाबतीत हेच घडलं असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
-
अजूनही वाटत दादा इथंच असतील- छगन भुजबळ
अजूनही वाटत दादा इथंच असतील. दादांचं लहान असताना त्यांचं छत्र हरवलं. दादांच्या शोक प्रस्ताववर आज बोलताना वाईट वाटत.असं वाटत की दादा इकडे आहेत असं वाटत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
-
-
गरजू माणसाला आधार देणारा आधारवड पडला- भास्कर जाधव
गरजू माणसाला आधार देणारा आधारवड पडला. 2022 मध्ये सत्तेमध्ये सामिल झाल्यावर मला त्यांनी जेवायला बोलवे होते. मंजूर झालेले कामांना स्टे दिला होता. दादांना कागद दिला दादा म्हणाले मी स्टे काढतो. मला दादांनी सांगितले आमचं धोरण ठरले आहे तुम्हाला मतद करु शकत नाही. मी त्यांच्यावर आरोप केले मला वाटले ते काम मंजूर करतील असं भास्कर जाधव म्हणाले.
-
त्या दोन सकाळ सर्वाना धक्का देणाऱ्या होत्या- उद्धव ठाकरे
माणसं येतात माणसं जातात… अनेकजण अशी असतात गेल्यावर कळतात… काहीजण जवळ असले तर कळत नाहीत पण गेल्यावर कळतात. माझ्या कारकीर्दची सुरवात ही वेगळी होती आम्ही कधी एकत्र येऊ असं वाटलं नाही. दोन सकाळ अशा होत्या की एक सकाळ आश्चर्य देणारी होती दुसरी सकाळ सर्वाना धक्का देणारी होती. मी त्यांच्यासोबत आलो तेव्हा ते सहकारी म्हणून आले. अजितदादा उपमुख्यमंत्री होते. कामकाज सुरु झालं तेव्हा मला कळलं की अजित दादा यांच्यासारखा भरसोमंद मित्र, दिलदार मी गमावला आहे. कोणतीही गोष्ट कळली नाही तर अजित दादा यांच्याशी बोलायचो. त्यांच वैशिष्ट्य म्हणजे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. एका मोठ्या वृक्षाच्या सावलीच्या सोबत एक स्वतःच अस्तिव निर्माण केलं होत. मी मुख्यमंत्री असताना दोन वेळा बारामतीला गेलो होतो… मुख्यमंत्री असताना माझ्या आजारावर बोललं जात होत त्यावेळी मला बारामतीचं सर्वकाही सांगत होते. त्यानंतर त्या रात्री मी बारामतीला गेलो तेव्हा ती बारामती पोरकी झालेली बारामती पाहिली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
-
शिवसेनाप्रमुखांची ती सवय अजितदादांना होती- उद्धव ठाकरे
अजितदादांसमोर अधिकारीही वचकून असायचे. अनेकदा कळायचे नाही की ते कौतुक करायचे की दम देतात. पण त्यांची शैली होती. अनेकदा त्यांच्या विधानाने ते अडचणीत आले. पण ते बिनधास्त बोलायचे. बेधडक काम करायचे. कारण त्यांच्या मनात पाप नसायचे. अडचणीच्या वेळी त्यांनी राज्याचं अर्थ खातं सांभाळलं. मला कशाचा अनुभव नसताना त्यांनी भरोसेमंद सहकारी म्हणून काम केलं. घड्याळ आणि वेळ… म्हणूनच अजितदादांची ती निशाणी होती की काय. दादा वेळेत यायचे. विषय घेऊन यायचे. काम झालं की लगेच निघायचे. दादांचं टेबल सर्व गोष्टी काटकोनात असायचे. ही सवय शिवसेनाप्रमुखांनाही होती.
-
-
वहिनी देखील दादांसारखी आपली वेगळी प्रतिमा तयार करतील – देवेंद्र फडणवीस
“सुनेत्रा वहिनींना जे दु:ख झालं ते आपण समजू शकतो. या कठीण परिस्थितीत वहिनींनी धीरोदत्तपणे त्याचं कार्य पुढे नेण्यासाठी निर्णय घेतला. राजकीय क्षेत्रात व्यक्तिगत वेदना बाजूला ठेऊन समाज, राज्य याचा विचार करत आपल कर्तव्य बजावावं लागतं. वहिनी देखील दादांसारखी आपली वेगळी प्रतिमा तयार करतील. त्याच दृढतेने काम करतील” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
-
पक्षाला त्यांनी एक आत्मविश्वास देण्याचं काम अजितदादांनी केलं – देवेंद्र फडणवीस
“लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा आम्हाला कमी जागा मिळाल्या. मविआच्या जास्त जागा आल्या. त्यानंतर आम्ही तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दौरे चालू केले. जास्तीत जास्त लोकापर्यंत कसं पोहोचता येईल हा प्रयत्न असायचा. त्यावेळी सर्वात जास्त फिरलेले अजितदादा होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांनी घर सोडलं. एकदिवस असा नाही की ते कुठल्या जिल्ह्यात गेले नाहीत. सभा, कार्यक्रम सुरु होते. त्यातून पक्षाला त्यांनी एक आत्मविश्वास देण्याचं काम अजितदादांनी केलं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
-
अजितदादा बेस्ट चीफ मिनिस्ट महाराष्ट्र नेव्हर हॅड – देवेंद्र फडणवीस
“अजितदादा बेस्ट चीफ मिनिस्ट महाराष्ट्र नेव्हर हॅड. महाराष्ट्राचा न झालेला सर्वोत्तम मुख्यमंत्री. एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता पण ते नाही झालं. क्षमतेचा विचार केला तर मुख्यमंत्रीपदासाठी क्षमता असलेलं नेतृत्व अजितदादांच होतं. महाराष्ट्रात वसंतदादा आणि अजितदादा ही नावं अशी आहेत, महाराष्ट्र नेहमीच त्यांना त्यांच्या कामासाठी लक्षात ठेवेल” असं फडणवीस म्हणाले.
-
पहिल्यांदाच दादांनी टायमिंग चुकवला – देवेंद्र फडणवीस
“हा सर्व वक्तशीरपणा खरा असला, तरी पहिल्यांदाच दादांनी टायमिंग चुकवला. राजकारणात दादा खूप मोठी इनिंग खेळतील असं दिसत होतं. त्यांनी पहिल्यांदा जीवनाचा टायमिगं चुकवला. याची सर्वाधिक हळहळ आपल्याला राहिलं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
मंत्रालयात कुठल्याही अधिकाऱ्यांपेक्षा लवकर पोहोचणारे दादा होते – देवेंद्र फडणवीस
“दादांच्या अनेक सवयी होत्या. दादांना दूध प्यायला आवडायचं. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी रोज हळदीच दूध पितो. दादांच्या अशा अनेक सवयी नजरसमोरुन चालल्या आहेत. दादा चप्पल घालयाचे पण पाय नेहमी स्वच्छ ठेवायचे. त्यांचा वक्तशीरपणा ही महत्वाची, चांगली सवय होती. मंत्रालयात कुठल्याही अधिकाऱ्यांपेक्षा लवकर पोहोचणारे दादा होते. सकाळी 9 वाजता दाद आपल्या चेंबरमध्ये जाऊन बसायचे. एखादा निर्णय त्यांना पटला नाही तर फाईल थांबवायचे. चर्चा करायचे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
दादांसोबत एक भावनिक नातं तयार झालं – देवेंद्र फडणवीस
“अजितदादांच अस्तित्व ठळकपणे जाणवायचं. प्रत्येक गोष्ट शिस्तीत झाली पाहिजे असं अजितदादा म्हणायचे. अजितदादा सकाळी 6 वाजता कामाला लागायचे. दादा माझ्यापेक्षा 11 वर्षांनी मोठे होते. खऱ्या अर्थाने माझे दादाच होते. एक दशकापेक्षा अधिक काळ आमची चांगली जवळीक, मैत्री होती. 2014 नंतर दादांसोबत एक भावनिक नातं तयार झालं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
अजितदादा हे एकापिढीचा आत्मविश्वास होता – देवेंद्र फडणवीस
“दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन न निघणारी आहे. दादांसोबत ती भेट कधी शेवटची असेल असं कधी वाटलं नव्हतं. दादांचं कुठलही काम त्यांच्या कागदावर लिहिलेलं असायचं. अजितदादा हे एकापिढीचा आत्मविश्वास होता” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
कठोर निर्णय घ्यायला मागे-पुढे न पाहणारे अजितदादाच होते – देवेंद्र फडणवीस
“कठोर निर्णय घ्यायचे असतील तर ते घ्ययाला कधीही मागे-पुढे न पाहणारे अजितदादा होते. पण त्याचवेळी वित्त विभागाने लाडकी बहिण योजनेचा भार अर्थसंकल्पावर फार मोठ्या प्रमाणात पडेल. त्यामुळ पूनर्विचार करावा असं सुचवल्यानंतरही तो निर्णय ठामपणे घेऊन तो विषय मंत्रिमंडळापुढे आणण्याचं काम करणारे अजितदादाच होते” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलताना काय म्हणाले?
“आज दादा आपल्यात नाहीत याची खंत आहे. यावर्षी दादांनी 12 वा अर्थसंकल्प मांडला असता. पुढच्यावर्षी 13 वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली असती. त्यानंतर पुढच्या काळात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून दादांचं कार्य राहिलं असतं. पण अचानकपणे दादा आपल्यातून निघून गेले. यावेळी हा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आली” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचा शोक प्रस्ताव मांडतान म्हणाले.
-
विलिनीकरणावर मला कोणी विचारलच नाही, तर मी का बोलू?
विलिनीकरण प्रक्रियेत मला समाविष्टच केलं नाही. विलिनीकरणावर मला कोणी विचारलच नाही, तर मी का बोलू? असं जितेंद्र आव्हाड दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्यावर म्हणाले.
-
चौकशीला जितका उशीर होईल, तितका संशयाला वाव – जितेंद्र आव्हाड
चौकशीला जितका उशीर होईल, तितका संशयाला वाव मिळेल. रोहित पवारांच्या मागण्यांमध्ये तथ्य. रोहित पवारांचे प्रश्न योग्य आहेत. DGCA काही लपवत आहेत. ब्लॅक बॉक्स जळून गेला यावर शंका आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये मच्छीमार संघटना आक्रमक; पारंपरिक जाळे घेऊन विभागीय आयुक्तालयावर धडक
छत्रपती संभाजीनगर येथे आज मच्छीमार संघटनेने आक्रमक भूमिका घेत विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन केले. आपल्या पारंपरिक जाळ्यांसह मत्स्यव्यवसायिक मोठ्या संख्येने आयुक्तालयावर धडकले आणि जोरदार घोषणाबाजी केली. मच्छिमार संस्थेकडे पूर्वीप्रमाणेच तलाव कायमस्वरूपी ठेवावेत, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी, तसेच १ जानेवारी रोजी काढण्यात आलेले परिपत्रक रद्द झाले पाहिजे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत परिपत्रक काढले होते, तलाव ठेका देण्याचे धोरण अबाधित असताना, मच्छिमार संघटनेकडे असलेले तलाव रद्द करण्यात आले होते, ते अबाधित राहिले पाहिजे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
-
महिनाभरात CID ने काय केलं? त्यांनी CCTV ताब्यात घेतलं का?- रोहित पवार
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहोत. अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास पारदर्शक होणं महत्त्वाचं आहे. मंत्री राममो नायडू यांना पदावर ठेवणं योग्य नाही. सीबीआयला तपास करण्यासाठी वेळमर्यादा द्यावी लागेल. महिनाभरात सीआयडीने काय केलंय? त्यांनी सीसीटीव्ही ताब्यात घेतला का, असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.
-
आमच्याकडे पुरावे आहेत, पण आम्हाला राजकारण करायचं नाही- रोहित पवार
अद्याप आमची शरद पवारांसोबत चर्चा झालेली नाही. पवार साहेब मुंबईत आल्यानंतर सुप्रिया सुळे त्यांच्याशी बोलतील. माझ्याकडे ब्लॅकबॉक्सचा फोटो आहे आणि तो किती जळाला आहे हे माहीत आहे. रिपोर्टमध्ये डिटेल्स असावेत, आम्हाला उगाच थातूरमातूर रिपोर्ट नको आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, पण आम्हाला राजकारण करायचं नाही, असं रोहित पवार म्हणाले.
-
राज्यात 10 कोटी वृक्षारोपण करण्याचं उद्दिष्ट- राज्यपाल
147 रस्ते सुधार योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील वृक्षारोपण वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र जन अभियान 2025 पासून सुरू करण्यात आलं आहे. या अभियानाअंतर्गत राज्यात 10 कोटी वृक्षारोपण करण्याचा मानस आहे. आतापर्यंत 9 कोटी 88 लाख वृक्षारोपण करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्यपालांनी दिली.
-
समृद्धी महामार्ग वाढवणपर्यंत नेणार, राज्याची 13 टक्के भागिदारी जीडीपीमध्ये- राज्यपाल
समृद्धी महामार्ग वाढवणपर्यंत नेणार आहोत. राज्याची 13 टक्के भागिदारी जीडीपीमध्ये आहे. व्यापक डिजिटल परिवर्तन योजना लागू केली. पोलिसांच्या घरांसाठी सरकारची विशेष योजना आहे. कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं आहे.
-
विदर्भात स्टील कॉरिडॉर करणार, गडचिरोलीत स्टील हब विकसित करणार- राज्यपाल
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, “महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीसाठी अग्रेसर आहे. गडचिरोलीतून स्टील हब विकसित करतोय. विकसित महाराष्ट्रासाठी व्यापक योजना आखल्या आहेत. विदर्भात स्टील कॉरिडॉर करणार आहोत. पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक वाढवण्यावर भर देत आहोत.”
-
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध- राज्यपाल
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकार सीमावासियांचं हिट जपणार आहे. दावोसमधून 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. दावोसमधील करारामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत, असं राज्यपाल भाषणात म्हणाले.
-
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे वर गॅस टँकरचा अपघात, पोलीस आणि प्रशासनाच्या तत्परतेने कोंडी टळली
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा एकदा गॅस टँकरचा अपघात झाला. अचानकपणे टँकरचा ब्रेक फेल झाला. यावेळी चालकाने प्रसंगावधान दाखवत टँकरची डोंगराला धडक दिली. त्यामुळे सुदैवाने टँकर पलटला नाही. अमृतांजन पुलाजवळ दहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर महामार्ग पोलीस आणि प्रशासनाने तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि पुढच्या काही वेळात क्रेनच्या साहाह्याने टँकर बाजूला घेण्यात आला. काही काळ वाहतूक ठप्प होती खरी, मात्र आडोशी बोगद्याजवळ झालेल्या अपघातातून यंत्रणांनी धडा घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे यावेळी वाहतूक कोंडी टळली.
-
राज्यपाल आचार्य देवव्रत विधीमंडळात दाखल
राज्यपाल आचार्य देवव्रत विधीमंडळात दाखल झाले आहेत. राज्यपालांचं विधीमंडळात स्वागत करण्यात आलं आहे. थोड्याच वेळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे.
-
दादा सगळ्यात आधी यायचे आणि सगळ्यात ऊशिरा जायचे- अर्जून खोतकर
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वसगळ्यांना विंस्वासात घेऊन अर्थसंकल्प सादर करतील ही अपेक्षा आहेच, छत्रपती संभाजी नगरमध्ये छत्रपती शिवरायांचा अपमान होतोय हे निधेधार्ह्य आहे, ही विेयवल्ली ठेचून काढा, यासाठी ठोस सरकारी कायदा व्हायला पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी त्यांच्या हाताचा निर्णय निश्चित घेतील
-
अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर बारामतीकडे एकवटले
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या अपघात तपास चौकशीसाठी बारामतीकर एकवटले. बारामतीतील प्रशासकीय भवन समोर नागरिकांची मोठी गर्दी. प्रांत अधिकारी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या अपघाताची चौकशी होण्यासाठी देण्यात येणार निवेदन..
-
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार राहुल नार्वेकरांच्या भेटीला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे राहुल नार्वेकरांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
-
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विधानभवनात दाखल
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विधानभवनात दाखल झाल्या आहेत. आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली.
-
दिल्लीतील महाराष्ट्र सदनला धमकीचा फोन
दिल्लीतीला महाराष्ट्र सदनला धमकीचा फोन आल्याने मोठी खळबळ उडाली. सध्या महाराष्ट्र सदनच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
-
ते कदापि होऊ देणार नाही- संजीवनी वाघ
शिवाजी महाराजाना जर नागराला बांधून उचलून नेण्याची भाषा कुणी करत असेल तर मी ते कदापि होऊ देणार नाही .घटनेच्या दिवशी माझ्यावर दगड टाकायच्या तयारीत होते . शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांच्या पुतळ्याला कुणालाही हात लावू देणार नाही. पुतळा 3 तारखेला कुणीतरी अद्न्यात व्यक्तीने बसवला होता, असे संजीवनी वाघ यांनी म्हटले.
-
शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी रास्तारोको
परभणी तालुक्यातील सिग्नापूर पाटीवर रास्तारोकोला सुरुवात. महिला शेतकऱ्यांचा ही मोठा सहभाग. शक्तीपीठ महामार्गासाठी बळाचा वापर करून जमिनीची मोजणी केली जात असल्याने शेतकरी आक्रमक. शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देणार नसल्याचा पवित्रा
-
चिखला काकड गावातील पुतळा वाद पेटला, 4 दिवस संचारबंदी
चिखला येथील काकड गावातील पुतळा वाद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पाऊल उचलत गावात चार दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे.. तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे… लोणार तालुका अंतर्गत येणाऱ्या चिखला काकड गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. .तसेच कोणत्याही प्रकारचे चिथावणीखोर भाषण, मोर्चे, आंदोलन किंवा जमाव जमवण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे… महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.. गावातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे…
-
आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद
आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक झाला आहे. याचे पडसाद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचे अ ब क ड उपवर्गीकरण लागू करावे, या मागणीसाठी धाराशिवमधून मातंग समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. आरक्षण उपवर्गीकरणाबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या आरक्षणासाठी आक्रमक पद्धतीने आंदोलन करणार असा इशारा लहुजी शक्ती सेनेने दिला आहे.
-
बदलापुरात अंडाशयाच्या तस्करीप्रकरणी सखोल तपास सुरु, तब्बल 10 लाखाहून अधिक किंमतीचा औषध साठा जप्त
बदलापुरात अंडाशयाच्या तस्करीनंतर आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. अंडाशयाच्या रॅकेटमध्ये मुंबई ठाणे परिसरातील अनेक बड्या डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांच्या तीन पथकाने ठाणे, वांगणी, विठ्ठलवाडी तसेच बदलापूरमध्ये छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे. या कारवाईत तब्बल 10 लाखाहून अधिक किंमतीचा औषध साठा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ठाण्यातील काही आयव्हीएफ सेंटरवर पोलिसांनी छापे टाकल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
मेळघाटातील खराब रस्ते आणि ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघात, अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील राणी गाव घाटात मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन पलटी होऊन 50 फूट दरीत कोसळून चार आदिवासी नागरिकांचा मृत्यू झाला होता. आता याप्रकरणी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहे. मेळघाट मधील खराब रस्ते आणि ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघात झाल्याचा आरोप अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी केला आहे. होळी सणाच्या निमित्ताने बाजार करण्यासाठी गेले होते. यावेळी जखमी प्रवाशांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व धारणीमध्ये उपचार सुरु आहेत. धारणी तालुक्यातील बेलतलाईवरून कंजूली या आपल्या गावी प्रवासी जात होते. यावेळी पिकअप वाहनात 15- 20 जण असल्याची माहिती समोर आली आहे. मेळघाटामध्ये दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे लोकांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतो.
-
दारुच्या नशेत विषारी सापाजवळ स्टंट करणं भोवलं, तरुणाचा मृत्यू
विरार पश्चिमेच्या नवापूर येथे एका तरुणाने दारुच्या नशेत विषारी सापाजवळ स्टंट करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साप पकडून गळयात घालून हा तरुण फिरत होता. विचित्र चाळे करत असताना सापाने त्याच्या हाताला दंश केला. त्यामुळे तेथील नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या खारोडी येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. राजू चंदू बरड (४०) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये विनातिकीट प्रवाशांवर कारवाई, सव्वा कोटींचा दंड वसूल
छत्रपती संभाजीनगरमध्ये विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी रेल्वेकडून सव्वा कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने जानेवारी २०२६ मध्ये सघन तिकीट तपासणी मोहीम राबवत २१ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली. या मोहिमेत एकूण १ कोटी २५ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, हा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी अधिक आहे. मोहिमेदरम्यान एका दिवसात ९०९ प्रकरणे नोंदवून सुमारे साडेपाच लाख रुपयांची वसुली करण्यात आली. प्रवाशांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून करण्यात आले आहे.
-
वेरूळ येथे घृष्णेश्वर दर्शन घेऊन परतताना महिला भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू
छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या मोरम्मा मलकाजप्पा पट्टन शेट्टी (५८, रा. कर्नाटक) या महिला भाविकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मोरम्मा या २७ जणांच्या समूहासोबत यात्रेसाठी आल्या होत्या. मंदिर परिसरात दर्शन घेऊन पार्किंगकडे परतत असताना त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. त्यांना तात्काळ खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
भिगवण प्रकरणातील पीडितेला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी बारामती, दौंड आणि इंदापूर बंदची हाक…
भिगवण प्रकरणातील पीडितेला न्याय मिळण्याच्या मागणी करता सकल हिंदू समाजाच्या वतीने बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे… या बंदला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय.. बारामती मधील मुख्य बाजारपेठ मधील सर्व दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी देखील या बंदला पाठिंबा दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे.. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांचा देखील कडेकोढ बंदोबस्त देण्यात आलाय..
-
शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी ‘मिशन निपुण’
नाशिक जिल्हा परिषद साडेपाच हजार विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देणार. दुसरी ते पाचवीतील अध्ययनात मागे असलेल्या ५,६२५ विद्यार्थ्यांना पुढील ३० दिवसांत ‘निपुण’ करण्याचे लक्ष्य आहे. मार्च अखेरीस होणाऱ्या अंतिम चाचणीपूर्वी ही विशेष मोहीम ‘मिशन मोड’वर राबवली जाणार आहे. मिशन निपुण नाशिक’ मुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढणार आहे.
-
गोंदियात सकाळपासून अवकाळी पावसाला सुरुवात…
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यात सह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रब्बी हंगामातील धान पिकाला पावसामुळे होणार फायदा, तर बागायतदार शेतीसह कडधान्य पिकाला फटका बसण्याची शक्यता शक्यता आहे. विजांच्या कडकडाटसह काही भागात हलक्या तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.
-
धाराशिव जिल्ह्यामध्ये पहाटे झालेल्या पावसामुळे ज्वारीचे नुकसान
धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांने काढून टाकलेल्या ज्वारीचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. शेतात काढून ठेवलेल्या ज्वारीवर पावसाचे पाणी साचल्याने ज्वारी काळी पडण्याची शक्यता आहे. तसेच हरभरा,द्राक्ष,आंबा, गहू या रब्बी हंगामातील पिकांनाही फटका बसण्याची मोठी शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने ज्वारी पिकाचे नुकसान पाहायला मिळत आहे.
-
आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद
आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. आमदार अमित गोरखे आक्रमक पवित्र घेणार असून त्यांचे समर्थक मुंबईकडे रवाना झाले आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचं अ ब क ड नुसार वर्गीकरण करावे अशी मातंग समाजाची मागणी आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही याबाबत निर्णय झाल्याने समाजात नाराजी असून अधिवेशनात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. धाराशिव मधूनही मोठ्या प्रमाणात समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.
-
रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे परळी तालुक्यातील मांडेखेल शिवारातील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान
परळी काल झालेल्या अवकाळी पावसामुळे परळी तालुक्यातील मांडेखेल शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या जवारी पिकावर परिणाम झाला असून संपूर्ण पीक आडवे पडले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ते मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
-
चिखला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण .
दोन गटात झालेल्या वाद प्रकरणी चिखलात काकड येथील आरोपी सरपंच गणेश काकड यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. वाशीम मधून गणेश काकड यांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहीत समोर येत आहे. आतापर्यंत 23 लोकांना अचक करण्यात आली आहे. चिखला काकड गावाच्या परिसरात कलम 163 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. समाज माध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन.. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केलं आहे.
-
कोणत्या प्रकरणांवर गाजणार राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
वाढती बेरोजगारी, तरुणाईला ड्रग्जचा विळखा, मंत्रालयासह राज्यात वाढलेली लाचखोरी, मुलुंडमधील मेट्रोचा अपघात, शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी, नरहरी झिरवळ्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि इतक देखील अन्य विषयांवर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार आहे.
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च 2026 रोजी राज्याचं अर्थसंकल्प सादर करणार आहे. 30 दिवसांच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणते कोणते मुद्दे मांडले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांचं अकस्मिक निधन, विमान अपघात, पार्थ पवार यांना मुंढला जमीन प्रकरणात दिलेली क्लीन चिट अशा अनेक प्रकरणांवर आजपासून होणाऱ्या अधिवेशनात सरकारला जाब विचारण्यात येणार असल्याचा इशारा पूर्वीच महाविकास आघाडीने दिला आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अधिवेशनात 15 विधेयके मांडली जाणार आहेत अशी माहिती दिली… शिवाय अधिवेशनात कोणते कोणते मुद्दे गाजणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर या ब्लॉगमध्ये राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं गाजणार याबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घ्या…
Published On - Feb 23,2026 8:06 AM
