PHOTO | धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये!

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणारी रेणू शर्मा पुन्हा एकदा पोलीस स्थानकात पोहोचली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:56 PM, 14 Jan 2021
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा पुन्हा एकदा पोलीस स्थानकात पोहोचल्या आहेत.
यावेळेस रेणू शर्मांनी डीएन नगर पोलीस स्टेशन गाठले आहे.
तक्रारदार रेणू शर्मा डीएन नगर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.
यावेळी आपल्य्या सोबत घडलेल्या प्रकरणाची माहिती रेणू शर्मा डीएन नगर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांना देणार आहेत.
यापूर्वी रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात ओशिवरा पोलीस स्थानकामध्ये लेखी तक्रार दाखल केली होती.
मुंडे यांनी आपल्याला बॉलिवूडमध्ये संधी देण्याचं आणि लग्नाचं आमिष दाखवून सातत्यानं बलात्कार केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे.
धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने ओशिवरा पोलीस स्थानकात 10 जानेवारीला तक्रार केली. याप्रकरणी 11 जानेवारीला रोजी मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. तरुणीने केलेल्या आरोपांनुसार 2006 पासून अत्याचार सुरु असल्याचा दावा तिने केला आहे.