AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणच्या मातीत रंगणार ‘परब’ कुटुंबाचा गणेशोत्सव, चिन्मयी साळवीचा खास अनुभव

कोकणचं निसर्गरम्य वातावरण, गावाकडची माणसं, पारंपरिक पद्धतीने होणारा गणेशोत्सव आणि त्यातला उत्साह यामुळे मालिकेतील हा गणेशोत्सवाचा ट्रॅक नक्कीच खास ठरणार आहे. परब आणि खानोलकर कुटुंबाच्या या गावच्या मुक्कामात नेमकं काय घडणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.

| Updated on: Sep 10, 2026 | 3:32 PM
Share
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि महाराष्ट्रात सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. कोकणातल्या गणेशोत्सवाला एक वेगळंच महत्त्व आहे. घराघरात बाप्पाचं स्वागत, पारंपरिक पूजा, आरती, भजन आणि गावच्या वातावरणात होणारा उत्सव हा कोकणच्या गणेशोत्सवाचा खास भाग आहे.

1 / 5
याच पारंपरिक आणि उत्साही वातावरणाची झलक आता ‘सनई चौघडे’ मालिकेतही पाहायला मिळणार आहे. यावर्षी ‘परब’ कुटुंब गणपतीच्या उत्सवासाठी गावी जाणार आहे. त्यांच्यासोबत खानोलकर कुटुंबातील काही सदस्यही गावात पोहोचणार आहेत.

2 / 5
हरतालिकेचं पूजन, कार्यशाळेतून गणपतीचं आगमन, चार मुलींच्या हातून बाप्पाचं आगमन, गावातली आरती, डबल बारी भजन, गौरीचं आगमन आणि पारंपरिक पद्धतीने होणारं गणपती विसर्जन अशा अनेक प्रसंगांमधून कोकणातला गणेशोत्सव प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. यावेळी गावातील मंडळी डोक्यावरून गणपती घेऊन मिरवणुकीत सहभागी होताना दिसतील.

3 / 5
या गणेशोत्सवाच्या शूटिंगचा अनुभव सांगताना शर्वरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री चिन्मयी साळवी म्हणाली, "माझ्यासाठी हा अनुभव खूपच खास आहे. मी पहिल्यांदाच कणकवलीला गेले होते आणि मला माझ्याच गावी आल्यासारखं वाटलं. माझं गाव संगमेश्वर असल्यामुळे इथला दरवळ, शेणी-चुलीचा वास आणि गावचं वातावरण खूप आपलंसं वाटलं. गणपतीसाठी सुट्टीचा अर्ज घेऊन चाकरमणी जसे गावी जातात, अगदी तसेच आम्ही सगळे गावी आलोय. यामध्ये खानोलकर कुटुंबातलेसुद्धा काही मेंबर्स आहेत, त्यामुळे पुढे खूप इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळणार आहेत."

4 / 5
"आमचा शेवटचा दिवस बीचवर शूटिंगचा होता आणि त्या दिवशी आम्ही सगळ्यात जास्त धमाल केली. तिथलं जेवण इतकं भारी होतं आणि भजन, आरती, डबल बारी ठेवली होती, त्यात तर पूर्ण युनिटने खूप एन्जॉय केलं. आम्ही अक्षरशः पहाटे पाच वाजेपर्यंत नाचलो आणि दुसऱ्या दिवशी साडेआठचा कॉल टाइम असूनही सगळे फुल एनर्जीमध्ये होते. अशीच धम्माल-मस्ती करत, फुल एनर्जीने आम्ही हे संपूर्ण शूट केलंय आणि ही एनर्जी नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याची मला खात्री आहे," असं चिन्मयीने सांगितलं.

5 / 5
Follow Us
भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी...
Nashik | 15 कोटींचा पैशांचा पाऊस पाडतो! भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी, बाकी...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना सवाल
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला..
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला...
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद

पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा!
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा! नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके म्हणाले..
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके बोलता बोलता हे काय म्हणाले?
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी जाहीर
जालन्यात गुटख्यावर मोठी कारवाई; 1 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

भाजप-शिंदे गटात ऑल इज नॉट वेल! दोन्ही पक्षांकडून सभात्याग
Mumbai | भाजप-शिंदे गटात ऑल इज नॉट वेल! समन्वय समिती निष्फळ; दोन्ही पक्षांकडून सभात्याग
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला यायला लाज वाटतेय, कारण... नितीन गड
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला यायला लाज वाटतेय, कारण... नितीन गडकरींचं पुन्हा मोठं विधान