व्हीव्हीएस लक्ष्मण आशिया कप 2022 मध्ये राहुल द्रविडची जबाबदारी पार पाडणार आहे. 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून भारतीय संघ 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. अधिक जाणून घ्या...
Aug 25, 2022 | 9:04 AM
व्हीव्हीएस लक्ष्मण आशिया कप 2022 मध्ये राहुल द्रविडची जबाबदारी पार पाडणार आहे. 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून भारतीय संघ 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल.
1 / 5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. लक्ष्मण यांना भारतीय संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.
2 / 5
यूएईला रवाना होण्यापूर्वी भारतीय प्रशिक्षक द्रविड यांना कोरोनाचा फटका बसला होता, त्यानंतर बीसीसीआयने द्रविड संघासोबत जात नसल्याचे सांगितले होते.
3 / 5
द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मणने झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर भारतीय संघासोबत एकदिवसीय मालिकेतही क्लीन स्वीप केला होता. मात्र, द्रविड आशिया कपमधून पूर्णपणे बाहेर नाही.
4 / 5
द्रविडचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला तर तो UAE मधील संघात सामील होईल. उपकर्णधार केएल राहुल, दीपक हुडा, आवेश खान यांच्यासह लक्ष्मण हरारेहून दुबईला रवाना झाला होता.