AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 स्पर्धेतील दहा संघांना प्लेऑफमध्ये जाण्याची किती आणि कशी संधी, जाणून घ्या एका क्लिकवर

आयपीएल 2023 स्पर्धेतील प्लेऑफमध्ये संधी जबरदस्त चुरस सुरु आहे. आतापर्यंत 56 सामने झाले असून गुजरात, चेन्नई, राजस्थान आणि मुंबई संघांचे गुण चांगले असून टॉप 4 मध्ये आहेत. पण कधी कसा उलटफेर होईल सांगता येत नाही. अजूनही दहा संघांना तशी पाहिली तर संधी आहे. जर तर का होईना पण चमत्काराची अपेक्षा आहे.

| Updated on: May 12, 2023 | 2:25 PM
Share
गुजरात टायटन्स संघाने एक पाऊल प्लेऑफच्या दिशेने टाकलं आहे.सध्या गुजरातचे 16 गुण आहेत. आता तीन पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफमधलं स्थानं पक्क होणार आहे. गुजरातचा नेट रनरेट देखील चांगला आहे. (Photo : IPL/BCCI)

1 / 10
चेन्नईनेही एक पाऊल प्लेऑफच्या दिशेन टाकलं आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने 15 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. उर्वरित दोन पैकी एका सामन्यात काहीही करून विजय मिळवणं गरजेचं आहे. चेन्नईचे पुढचे सामने कोलकाता आणि दिल्लीसोबत आहेत. (Photo : IPL/BCCI)

2 / 10
राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थाने अजूनही दोन सामने उरले आहेत. सध्याची स्थिती पाहता दोन पैकी दोन सामने जिंकावे लागणार आहेत. नेट रनरेट चांगला असल्याने सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानचे पुढचे दोन सामने आरसीबी आणि पंजाबसोबत आहेत. (Photo : IPL/BCCI)

3 / 10
मुंबई इंडियन्स गुणतालिकेत 12 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. पण नेटरनरेट कमी असल्याने चौथ्या स्थानावर आहे. मुंबईचे एकूण तीन सामने आहेत. त्यापैकी दोन सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. नेट रनरेट चांगला ठेवावा लागेल. मुंबईचे पुढचे तीन सामने गुजरात, लखनऊ आणि हैदराबादसोबत आहेत. (Photo : IPL/BCCI)

4 / 10
लखनऊ सुपर जायंट्स गुणतालिकेत 11 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. लखनऊला अजून तीन सामने खेळायचे आहेत. त्यामुळे तीन पैकी तीन सामन्यात विजय आवश्यक आहे. म्हणजेच 17 गुण होतील आणि प्लेऑफमध्ये संधी मिळेल. लखनऊचे पुढचे तीन सामने लखनऊ, मुंबई आणि कोलकात्यासोबत आहेत. (Photo : IPL/BCCI)

5 / 10
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. आरसीबीचे दहा गुण आहेत. आरसीबीला तीन सामने खेळायचे आहेत. तिन्ही सामने जिंकण्यासोबत चांगला रनरेट असणं गरजेचं आहे. आरसीबीचे पुढचे तीन सामने राजस्थान, हैदराबाद आणि गुजरातसोबत आहेत. (Photo : IPL/BCCI)

6 / 10
कोलकाता नाइट रायडर्स 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. कोलकात्याला पण प्लेऑफची संधी आहे. पण उर्वरित दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. चेन्नई आणि लखनऊसोबत पुढील सामने आहेत. पण असं करूनही पदरी 14 गुणच होतील. त्यामुळे काही चमत्कार घडणं आवश्यक आहे. खासकरून टॉप 4 मधल्या संघांना तळाच्या संघांनी पराभूत केलं तर गणित सोपं होईल. (Photo : IPL/BCCI)

7 / 10
पंजाब किंग्स 10 गुणांसह आठव्या स्थावर आहे. पण कोलकात्याच्या तुलनेत पंजाबकडे तीन सामने खेळायचे आहेत. त्यामुळे तीन सामन्यात विजय मिळवला तर 16 गुण होतील. तसेच टॉपमध्ये असलेल्या संघांना तळाच्या इतर संघानी मात दिली तर गुणांचं गणित जवळ येईल. त्यामुळे उर्वरित तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. पुढील तीन सामन्यापैकी दोन सामने दिल्लीसोबत आणि एक सामना राजस्थानसोबत आहे. (Photo : IPL/BCCI)

8 / 10
सनराईजर्स हैदराबादचा संघ 8 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. हैदराबादला अजूनही चार सामने खेळायचे आहेत. हैदराबादने चारही सामन्यात विजय मिळवला तर 16 गुण होतील. मोठ्या फरकाने जिंकल्यास नेट रनरेटवर परिणाम होईल. त्याचबरोबर प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळेल. हैदराबादचे चारही सामने टॉपच्या संघांसोबत आहे. लखनऊ, गुजरात, बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स सोबत आहे. यासोबत टॉपच्या संघांनी इतर संघांसोबत काही सामने गमवणं गरजेचं आहे. (Photo : IPL/BCCI)

9 / 10
दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफची तशी संधी नाही. खरं तर दिल्लीला सामना विजयासोबत मोठ्या चमत्काराची आवश्यकता आहे. कारण गुणांसोबत वरील नऊ संघांच्या नेट रनरेटवर फरक पडणं आवश्यक आहे. तसं काही घडेल अशी शक्यता नाही. त्यामुळे दिल्लीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. (Photo : IPL/BCCI)

10 / 10
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.