AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : मेलबर्न कसोटीत या पाच चुका ठरल्या पराभवाचं कारण, जाणून घ्या

मेलबर्न कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 184 धावांनी दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे मालिका विजयाचं स्वप्न भंगलं आहे. पाचव्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर मालिका बरोबरीत सुटेल. चार सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया 2-1 ने आघाडीवर आहे.

| Updated on: Dec 30, 2024 | 5:10 PM
Share
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यात पाच महत्त्वाचा चुका टीम इंडियाला भोवल्या. खरं तर तिसऱ्या दिवशी सामना भारताच्या पारड्यात पडला होता. मात्र पाच चुकांमुळे सर्व काही गमवण्याची वेळ आली.

1 / 6
चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माचं नेतृत्व अपयशी ठरलं. खरं तर चौथ्या कसोटीत शुबमन गिलला वगळणं टीम इंडियाला महागात पडलं. तसेच कधी कोणता गोलंदाज काढावा याचं गणित रोहितला उमगलं नाही. त्यामुळे शेवटच्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाने 61 धावांची भागीदारी केली.

2 / 6
रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत फार काही ग्रेट करू शकले नाहीत. चौथ्या कसोटीत या दोघांकडून फार अपेक्षा होत्या. रोहितने दोन्ही डावात मिळून 12 धावा केल्या. तर विराट कोहलीने 41 धावा केल्या. या दोघांची बॅट चालली असती तर कदाचित वेगळं चित्र असतं.

3 / 6
मेलबर्न कसोटीत फलंदाजीचा क्रम बदलणं टीम इंडियाच्या अंगलट आलं. रोहित शर्मा ओपनर म्हणून अपयशी ठरला. तर केएल राहुल तिसऱ्या स्थानावर गडगडला. केएल राहुलने पहिल्या तीन सामन्यात ओपनर म्हणून चांगली कामगिरी केली होती. पण तिसऱ्या स्थानावर निराशाजनक कामगिरी राहिली.

4 / 6
ऋषभ पंतची बेजबाबदार खेळीही पराभवाला कारणीभूत ठरली. चुकीच्या शॉट सिलेक्शनमुळे टीम इंडियाला फटका बसला. दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालसोबत भागीदारी जमली होती. पण मोठा फटका मारण्याच्या नादात टीम इंडियाला पराभवाच्या दरीत ढकललं.

5 / 6
टीम इंडिया मेलबर्न कसोटी वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरली होती. हा निर्णय टीम इंडियाच्या उलट पडला. जडेजाला पहिल्या डावात 3, तर दुसऱ्या डावात 1 विकेट घेण्यात यश आलं. सुंदरला दोन्ही डावात प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

6 / 6
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.