AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा मार्गदर्शक होताच मोठे बदल! दोन दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता

आयपीएल 2025 स्पर्धेच्या रिटेन्शन यादीची उत्सुकता आता संपली आहे. राजस्थान रॉयल्सने संपूर्ण सहा खेळाडूंचा रिटेन्शन ऑप्शन वापरला आहे. तर एकच विदेशी खेळाडू रिटेन्शन यादीत ठेवला असून दोन दिग्गज खेळाडूंना बाहेर केलं आहे. चला जाणून घेऊयात राजस्थान रॉयल्स संघाबाबत

| Updated on: Oct 31, 2024 | 7:02 PM
Share
राजस्थान रॉयल्सने आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहे. राजस्थानने संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरन हेटमायर या कॅप्ड प्लेयर्संना रिटेने केलं आहे. तर संदीप शर्माला अनकॅप्ड प्लेयर म्हणून रिटेन केलं आहे.

1 / 5
राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने कर्णधार संजू सॅमसनला पहिला रिटेनर म्हणून कायम ठेवला आहे. त्यामुळे संघाची धुरा त्याच्याच खांद्यावर असणार आहे. या आयपीएलमध्ये राहुल द्रविड आणि संजू सॅमसन ही जोडी दिसणार आहे. दुसऱ्या जेतेपदासाठी राजस्थान रॉयल्सची धडपड असणार आहे.

2 / 5
राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनसाठी 18 कोटी, यशस्वी जयस्वालसाठी 18 कोटी, रियान परागसाठी 14 कोटी, शिमरन हेटमायरसाठी 11 कोटी, ध्रुव जुरेलसाठी 14 कोटी आणि अनकॅप्ड संदीप शर्मासाठी 4 कोटी मोजले आहे. राजस्थानने रिटेन्शनमध्येच 79 कोटी रक्कम मोजली आहे. त्यामुळे मेगा लिलावासाठी फक्त 41 कोटी पर्समध्ये असणार आहेत.

3 / 5
राजस्थान रॉयल्सने सहा खेळाडूंना रिटेन करताना आरटीएम ऑप्शन सोडला आहे. त्यामुळे दोन दिग्गज खेळाडूंना धक्का बसला आहे. यात आर अश्विन आणि युजवेंद्र चहल या दोन दिग्गज फिरकीपटूंचा समावेश आहे. आता दोन्ही खेळाडू मेगा लिलावात उपलब्ध असणार आहेत. या खेळाडूंसाठी किती रक्कम मोजणार याची उत्सुकता लागून आहे.

4 / 5
जोस बटलर,  डोनोव्हन फरेरा, कुणाल राठोड, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, ॲडम झाम्पा, आवेश खान (एलएसजीकडून), रोव्हमन पॉवेल (लिलाव - 7.40 कोटी), शुभम दुबे (लिलाव - 5.80 कोटी), टॉम कोहलर कॅडमोर (लिलाव - 40 लाख), नांद्रे बर्गर (लिलाव - 50 लाख), आबिद मुश्ताक (लिलाव - 20 लाख) या खेळाडूंना रिलीज केलं आहे.  यापैकी पाच खेळाडूंना 2024 मिनी लिलावात घेतलं होतं.

5 / 5
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...