AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी स्मृती मंधानाने स्वीकारली, म्हणाली…

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा फक्त 4 धावांनी पराभव झाला. या पराभवासाठी स्मृती मंधानाची विकेट टर्निंग पॉइंट ठरली. कर्णधार हरमनप्रीत कौरने असंच मत व्यक्त केलं होतं. आता स्मृतीने पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.

| Updated on: Oct 20, 2025 | 8:43 PM
Share
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. भारताने सुरुवातीचे दोन सामने जिंकल्यानंतर सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना तर अवघ्या 4 धावांनी गमावला. स्मृती मंधाना बाद झाल्यानंतर सामन्याचं पूर्ण चित्रच बदलून गेलं.

1 / 5
इंग्लंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना 4 धावा कमी पडल्या. सामन्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने खराब शॉट सिलेक्शनला जबाबदार धरलं. यावेळी तिने स्मृतीचं नाव घेतलं होतं. आता स्मृती मंधानानेही सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरल्याची कबुली दिली आहे. विकेट पडल्यानंतर सामना हातून गेल्याचं सांगितलं.

2 / 5
इंग्लंडने दिलेल्या 289 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, टीम इंडिया चांगल्या स्थितीत होती. पण शेवटी केलेल्या चुका महागात पडल्या. 88 धावांची खेळी करणाऱ्या मंधानाने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत 125 धावांची आणि दीप्ती शर्मासोबत 67 धावांची भागीदारी केली. पण एक चुकीचा फटका संघाला मारक ठरला.

3 / 5
स्मृती मंधाना म्हणाली की, "मला वाटते की आम्ही आमचे शॉट सिलेक्शनमध्ये अधिक चांगले करू शकलो असतो. त्याची सुरुवात माझ्यापासून झाली होती, म्हणून मला वाटते की आमची शॉट सिलेक्शन चांगली असायला हवं होतं. आम्हाला प्रति ओव्हर फक्त सहा धावा हव्या होत्या. कदाचित आम्हाला खेळ पुढे नेला पाहिजे होता. मी याची जबाबदारी घेते कारण विकेट पडण्याची सुरुवात माझ्यापासून झाली."

4 / 5
स्मृती मंधाना सामन्याच्या 42व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाली. ती बाद झाली तरीही भारत सामना सहज जिंकू शकला असता. कारण दीप्ती शर्मा आणि रिचा घोष या दोघीही अनुभवी खेळाडू होत्या. 47 व्या षटकापर्यंत त्याही बाद झाल्या. शेवटी अमनजोत कौर आणि स्नेह राणा विजय मिळवून देऊ शकले नाहीत. (सर्व फोटो- बीसीसीआय वुमन्स ट्वीटरवरून)

5 / 5
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.