Photo : भटक्याची भ्रमंती; मिलिंद सोमणची दार्जिलिंगमध्ये ट्रेकिंग!

मिलिंद सोमण आणि अंकिता दोघंही दार्जिलिंगमध्ये ट्रेकिंगचा आनंद घेत आहेत. (Wandering; Milind Soman’s trekking in Darjeeling!)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:05 AM, 27 Nov 2020
मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या भटकंतीसाठी नेहमीच चर्चेत असतो. एकटाच नाही तर प्रत्येक वेळी त्याची पत्नी अंकितासुद्धा त्याच्यासोबत असते.
आता मिलिंद आणि अंकिता दोघंही दार्जिलिंगमध्ये ट्रेकिंगचा आनंद घेत आहेत. या ट्रेकचे सुंदर फोटो अंकितानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
पश्चिम बंगालमधील सर्वोच्च शिखर संदक्फू येथे मिलिंद ट्रेकिंगचा आनंद घेत आहे. दहा हजार फूट उंचीवरून काढलेला हा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
फोटोमध्ये दोघंही ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये दिसत आहेत. या ट्रॅडिशनल ड्रेसमधील फोटो त्यांच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस आला आहे.
आता मिलिंद आणि अंकिता काला पोखरी या गावात वेळ घालवत आहेत. या गावाचं सौंदर्य मोहित करणारं आहे.
सध्या मिलिंद सोमण त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे अडचणीत आला आहे. त्याच्या विरोधात एफआरआयसुद्धा दाखल करण्यात आला आहे.