AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Year Ender 2023 : वर्षभरात चमकलं या सेलिब्रिटींचं करिअर; कोणत्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर दबदबा?

कोरोना महामारी आणि लॉकडाऊननंतर प्रेक्षक थिएटरकडे फिरकतील का असा प्रश्न अनेक चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना पडला होता. मात्र 2023 या वर्षभरात बॉक्स ऑफिसवर बऱ्याच चित्रपटांनी दमदार कामगिरी केली. काहींनी तर कमाईचा 500 कोटी रुपयांचा आकडा पार केला.

| Updated on: Dec 20, 2023 | 11:53 AM
Share
2023 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. या वर्षभरात बॉलिवूड इंडस्ट्रीत काही चित्रपटांनी भरभरून कमाई केली. या चित्रपटांमुळे काही सेलिब्रिटींनाही अच्छे दिन आले. बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई करणारे हे चित्रपट कोणते, ते पाहुयात..

1 / 8
ॲनिमल- हा चित्रपट या यादीत सर्वांत पहिल्या स्थानी येतो. कारण 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या सहा दिवसांत जगभरात कमाईचा 550 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.

2 / 8
पठाण- बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानने जवळपास चार वर्षांनंतर 'पठाण' या चित्रपटातून पुनरागमन केलं. किंग खानच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचले. या चित्रपटाने भारतात 500 कोटी  रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे.

3 / 8
जवान- या यादीत शाहरुख खानचाच आणखी एक चित्रपट आहे. 'जवान'मध्ये त्याने दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय केला. विशेष म्हणजे 'पठाण' आणि 'जवान' या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण झळकली.

4 / 8
गदर 2- सनी देओल आणि अमीषा पटेल ही सुपरहिट जोडी तब्बल 22 वर्षांनंतर 'गदर 2' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तारा सिंग आणि सकिनाच्या  या कथेनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 500 कोटी रुपयांची कमाई केली.

5 / 8
टायगर 3- सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे सलमान आणि कतरिना कैफची हिट जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'टायगर 3' या चित्रपटाने आतापर्यंत 250 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे.

6 / 8
फुकरे 3- रिचा चड्ढा आणि पुलकित सम्राट यांच्या 'फुकरे 3' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर आपला जलवा दाखवला आहे. फक्त 50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केलं आहे.

7 / 8
ओएमजी 2- अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या OMG 2 या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट सनी देओलच्या 'गदर 2'सोबतच प्रदर्शित झाला होता. तगडी टक्कर असतानाही बॉक्स ऑफिसवर अक्षयच्या चित्रपटाने 221.08 कोटी रुपये कमावले.

8 / 8
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?