AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC World Cup 2023 ENG vs NZ Highlights | न्यूझीलंडची विजयी सुरुवात, इंग्लंडवर 9 विकेट्स मात

| Edited By: | Updated on: Oct 05, 2023 | 9:14 PM
Share

ICC World cup 2023 Eng vs Nz Highlights In Marathi | न्यूझीलंड क्रिकेट टीमने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये विजयी सलामी दिली आहे. न्यूझीलंडने इंग्लंडचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला.

ICC World Cup 2023 ENG vs NZ Highlights | न्यूझीलंडची विजयी सुरुवात, इंग्लंडवर 9 विकेट्स मात

अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सामना पार पडल आहे. न्यूझीलंडने  गतविजेत्या इंग्लंडवर 9 विकेट्सच्या एकतर्फी फरकाने विजय मिळवला. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 283 धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान अवघी 1 विकेट गमावून पूर्ण केलं. इंग्लंडने 283 धावा 36.2 ओव्हरमध्ये पूर्ण केल्या. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनव्हे आणि रचिन रवींद्र या दोघांनी नाबाद शतकी खेळी केली. डेव्हॉनने नाबाद 153 आणि रचिनने नॉट आऊट 123 रन्सचं योगदान दिलं.  तर विल यंग हा 10 धावा करुन माघारी परतला. न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत करत वर्ल्ड कप 2019 फायनलमधील पराभवाचा वचपा घेतला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 05 Oct 2023 08:42 PM (IST)

    ENG vs NZ Live Score Updates | न्यूझीलंडची वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात

    अहमदाबाद | उपविजेत्या न्यूझीलंड टीमने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने इंग्लंडवर 9 विकेट्सने विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने विजयासाठी मिळालेलं 283 धावांचं आव्हान हे 36.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनव्हे याने सर्वाधिक नाबाद 152 धावा केल्या. तर रचिन रविंद्र याने नॉट आऊट 123 धावांची शतकी खेळी. तर विल यंग 10 धावांवर बाद झाला. इंग्लंडकडून सॅम करन याने एकमेव विकेट घेतली.

  • 05 Oct 2023 08:14 PM (IST)

    ENG vs NZ Live Score Updates | कॉनव्हेनंतर रवींद्रचं शतक

    अहमदाबाद | न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉन्वहे आणि रचिन रविंद्र या दोघांनी शानदार कामगिरी केलीय. वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात डेव्हॉन याच्यानंतर रचिनने शतक ठोकलंय

  • 05 Oct 2023 07:59 PM (IST)

    ENG vs NZ Live Score Updates | आयसीसी वर्ल्ड कप 2023 मधील पहिलं शतक डेव्हॉन कॉन्व्हे याच्या बॅटने

    अहमदाबाद | न्यूझीलंडचा ओपनर डेव्हॉन कॉन्व्हे यांना आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिलं शतक ठोकलंय. कॉन्व्हे याने इंग्लंड विरुद्ध 83 बॉलमथ्ये  शतक पूर्ण केलं.

  • 05 Oct 2023 07:49 PM (IST)

    ENG vs NZ Live Score Updates | न्यूझीलंड मजबूत स्थितीत, इंग्लंड बॅकफुटवर

    अहमदाबाद | डेव्हॉन कॉनव्हे आणि रचिन रविंद्र या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 24 ओव्हरपर्यंत 168 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा स्कोअर 24 ओव्हरमध्ये 1 बाद 178 इतका झाला आहे. रचिन 85 आणि डेव्हॉन 92 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 05 Oct 2023 07:01 PM (IST)

    ENG vs NZ Live Score Updates | रचिन रविंद्रचं खणखणीत अर्धशतक

    अहमदाबाद | न्यूझीलंडच्या युवा रचिन रविंद्र याने इंग्लंड विरुद्ध खणखणीत अर्धशतक ठोकलंय. रचिनने सिक्स खेचत अर्धशतक केलं. रचिनने डेव्हॉन कॉन्व्हे याच्यासोबत चांगली भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला.

  • 05 Oct 2023 06:50 PM (IST)

    चंद्राबाबू नायडू यांच्या कोठडीत 19 ऑक्टोबरपर्यंत वाढ

    कथित कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी विजयवाडा एसीबी न्यायालयाने टीडीपी प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या कोठडीत 19 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

  • 05 Oct 2023 06:45 PM (IST)

    ENG vs NZ Live Score Updates | रचिनची फटकेबाजी, न्यूझीलंडचा 8 ओव्हरनंतर स्कोअर किती?

    अहमदाबाद | न्यूझीलंडने 283 धावांचा पाठलाग करताना पहिली विकेट लवकर गमावली. विल यंग झिरोवर आऊट झाला. मात्र त्यानंतर रचिन रविंद्र आणि डेव्हॉन कॉनव्हे या दोघांनी जोरदार फटेकबाजी केलीय. न्यूझाीलंडने 8 ओव्हरमध्ये 63 धावा केल्या आहेत. कॉनव्हे 24 आणि रचिन 38 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 05 Oct 2023 06:25 PM (IST)

    ENG vs NZ : सॅम करनला पहिलं यश

    सॅम करनने पहिल्याच चेंडूवर विल यंगला बाद करून संघाला यश मिळवून दिले. विल यंग खात न उघडता झेलबाद झाला.

  • 05 Oct 2023 05:55 PM (IST)

    ENG vs NZ : इंग्लंडच्या 50 ओव्हरमध्ये 282 धावा

    जो रूटच्या 77 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडसमोर 9 विकेट गमावत 282 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 3 तर ग्लेन फिलिप आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी 2 बळी घेतले.

  • 05 Oct 2023 04:33 PM (IST)

    ENG vs NZ Live Score : बटलर आऊट

    मॅट हेन्रीने सुरुवातीपासूनच या सामन्यात अतिशय प्रभावी गोलंदाजी केली आहे. पहिली ओव्हर टाकणाऱ्या मॅट हेन्रीने इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला 43 धावांवर बाद करून मोठे यश मिळवले.

  • 05 Oct 2023 04:19 PM (IST)

    ENg vs NZ Live Score : जो रूट याचं अर्धशतक

    अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत जो रूटने न्यूझीलंडविरुद्धचा डाव सांभाळला आणि इंग्लंडसाठी आणखी एक अर्धशतक झळकावले. 57 चेंडू खेळल्यानंतर त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारत आपल्या 59 धावा पूर्ण केल्यात. जोस बटलर आणि जो रूट यांनी इंग्लंडचा डाव सावरला आहे.

  • 05 Oct 2023 03:38 PM (IST)

    ENG vs NZ Live Score : इंग्लंडच्या 118 वर 4 विकेट्स

    इंग्लंड संघ दबावात असताना आता आणखी एक धक्का इंग्लंड संघाला बसला आहे. मोईन अली 11 धावांवर आऊट झाला आहे न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स याने त्याला चारीमुंड्या चीत केलं. आता मैदानात जोस बटलर आणि जो रूट आहेत.

  • 05 Oct 2023 03:36 PM (IST)

    ENG vs NZ : हॅरी ब्रूक आऊट

    इंग्लंडला 94 धावांवर तिसरा धक्का बसला आहे. हॅरी ब्रूक 25 धावा करून बाद झाला. न्यूझीलंडचे गोलंदाजांनी इग्लंडच्या फलंदाजांवर दबाव टाकला आहे.

  • 05 Oct 2023 03:07 PM (IST)

    ENG vs NZ : मिचेल सँटनरला यश

    इंग्लंड संघाला दुसरा मोठा धक्का बसला असून जॉनी बेअरस्टो मोठा फटका खेळण्याच्या नादात आऊट झाला आहे. डॅरिल मिशेल याने सोपा झेल घेतला.

  • 05 Oct 2023 02:38 PM (IST)

    ENG vs NZ Live Update : इंग्लंडला पहिला धक्का, डेविड मलान बाद

    इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे. डेविड मलान 14 धावा करून बाद झाला आहे. हेन्रीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

  • 05 Oct 2023 02:03 PM (IST)

    ENG vs NZ Live Update : बेअरस्टोची सिक्स मारत झकास सुरूवात

    वर्ल्डकपमधील पहिल्या सामन्याला सुरूवात झाली आहे. दुसऱ्याच बॉलवर जॉनी बेअरस्टोने सिक्स मारत झकास सुरूवात केली आहे. जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान मैदानात उतरले आहेत.

  • 05 Oct 2023 01:53 PM (IST)

    ENG vs NZ Live Update : सचिन तेंडुलकर मैदानात

    भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या हस्ते मैदानात वर्ल्ड कप 2023 ची ट्रॉफी आणण्यात आली.

  • 05 Oct 2023 01:49 PM (IST)

    ENG vs NZ Live Update : स्टार खेळाडू बाहेर

    इंग्लंड संघाचा स्टार खेळाडू बेन स्टोक्स पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे खेळणार नाही.  तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसनसुद्धा दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकला आहे.

  • 05 Oct 2023 01:39 PM (IST)

    ENG vs NZ Live Score : दोन्ही संघांची प्लेइंग 11

    इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (w/c), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड

    न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (w/c), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट

  • 05 Oct 2023 01:36 PM (IST)

    ENG vs NZ Live Score : किवींनी जिंकला टॉस

    वर्ल्ड कपमधील पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंड संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

  • 05 Oct 2023 12:59 PM (IST)

    ICC World Cup 2023 Opening Ceremony Live : पहिल्या मॅचसाठी काही मिनिटे बाकी

    वर्ल्ड कपच्या ओपनिंग मॅचला सुरूवात होण्यासाठी काही मिनिटे बाकी आहेत. चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह दिसत आहे.

Published On - Oct 05,2023 12:54 PM

Follow us
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.