किवी आणि इंग्रजांना मैदानात लोळवायचं!, जेव्हा भारत झोपेत तेव्हा विराटसेनेने केलं टेकऑफ, पाहा खेळाडूंचा अंदाज!

भारताचा पुरुष आणि महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौर्‍यासाठी रवाना झाला आहे. भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंनी 2 जूनच्या रात्री मुंबईहून इंग्लंडला उड्डाण केलं. (India Tour Of England 2021 india mens And Womens Cricket team of to England)

1/7
India Tour Of England 2021 india mens And Womens Cricket team of to England
भारताचा पुरुष आणि महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर रवाना झाला आहे. भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंनी 2 जूनच्या रात्री मुंबईहून इंग्लंडला उड्डाण केलं. महिला आणि पुरुष संघ एकत्र गेले आहेत.
2/7
India Tour Of England 2021 india mens And Womens Cricket team of to England
भारतीय महिला संघाला एकच कसोटी सामना खेळायचा आहे. त्यानंतर तीन एकदिवसीय आणि टी -20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. यानंतर काही खेळाडू वगळता इतर सर्व महिला खेळाडू भारतात येतील. फोटोमध्ये टीम इंडियाची कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार मिताली राज दिसत आहे.
3/7
India Tour Of England 2021 india mens And Womens Cricket team of to England
स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर इंग्लंडमध्ये थांबतील. इंग्लंडमधील द हंड्रेड स्पर्धेत त्यांना खेळायचं आहे. भारताची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी फोटोमध्ये दिसत आहे.
4/7
India Tour Of England 2021 india mens And Womens Cricket team of to England
त्याचबरोबर भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा हा दौरा ऑगस्टमध्ये संपेल. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला प्रथम वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपची फायनल खेळायची आहे. हा सामना 18 जूनपासून साऊथॅम्प्टन येथे खेळला जाईल. फोटोत विकेटकीपर फलंदाज केएल राहुल दिसत आहे.
5/7
India Tour Of England 2021 india mens And Womens Cricket team of to England
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर भारताचा संघ इंग्लंडविरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका जुलैपासून सुरू होईल. फोटोत रोहित शर्मा दिसत आहे.
6/7
India Tour Of England 2021 india mens And Womens Cricket team of to England
आताच्या संघातील बरेच भारतीय खेळाडू प्रथमच इंग्लंडला जात आहेत तर बरेच जण यापूर्वी इंग्लडमध्ये खेळले आहेत. फोटोत दिसत असलेला इशांत शर्मा यापूर्वी इंग्लंडमध्ये बर्‍याच वेळा खेळला आहे. दुसरीकडे, मयांक अग्रवाल वरिष्ठ टीमसमवेत प्रथमच ब्रिटिशांच्या भूमीत जाणार आहे.
7/7
India Tour Of England 2021 india mens And Womens Cricket team of to England
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचा हा इंग्लंडचा पहिला दौरा असेल. ऑस्ट्रेलिया दौर्‍यापासून त्याने कसोटी कारकीर्दीची सुरुवात केली. आता इंग्लंडमधील दौऱ्यात ऑस्ट्रेलिया जशी धडाकेबाज कामगिरी केली होती, तशीच कामगिरी किंबहुना त्यापेक्षा अधिक चांगल्या कामगिरीची त्याच्याकडून अपेक्षा आहे.