RCB vs PBKS IPL 2025 Final Score And Updates : आरसीबीचा विराट विजय, पंजाबवर 6 धावांनी मात करत पहिल्यांदा जिंकली आयपीएल ट्रॉफी
Royal Challengers Bengaluru Vs Punjab Kings IPL 2025 Final Score and Highlights Updates in Marathi : अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपला जेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव केला.

RCB vs PBKS, IPL 2025 Final Live Score and Updates in Marathi: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची 17 वर्षांची प्रतीक्षा संपली. 18 व्या पर्वात अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव करून आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यासह आरसीबीचे जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. आरसीबीने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 191 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण पंजाबचा संघ 7 विकेट गमावून फक्त 184 धावा करू शकला. पंजाबकडून शशांक सिंगने सर्वाधिक नाबाद 61 धावा केल्या, परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
LIVE Cricket Score & Updates
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Updates : ऑरेंज आणि पर्पल कॅप गुजरात टायटन्सकडे
आरसीबीने अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर मात करत आयपीएल ट्रॉफी जिंकली. मात्र ऑरेंज आणि पर्पल कॅपएकाच संघाच्या खेळाडूंनी मिळवली. एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते. त्यानुसार साई सुदर्शन हा 18 व्या हंगामातील ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. तर प्रसिध कृष्णा याने पर्पल कॅप पटकावली.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : निर्णायक क्षणी 2 विकेट्स आणि 1 कॅच, कृणाल पंड्या मॅन ऑफ द मॅच
आरसीबीचा ऑलराउंडर कृणाल पंड्या हा अंतिम सामन्यात सामनावीर ठरला आहे. कृणालने बॅटिंग करताना 4 धावा केल्या. तसेच 4 ओव्हर टाकल्या. कृणालने या 4 ओव्हरमध्ये 12 डॉट बॉल टाकले. तसेच 2 विकेट्सही घेतल्या. कृणालची खेळाडू म्हणून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही चौथी वेळ ठरली. मुंबईने एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यापैकी 3 वेळा कृणाल आयपीएल विजेत्या मुंबई संघाचा भाग होता.
-
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : आरसीबीने अखेर जेतेपदावर नाव कोरलं, 17 वर्षांची प्रतीक्षा संपली
आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा धावांनी धुव्वा उडवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान गाठताना पंजाबने टप्प्याटप्प्याने विकेट गमावल्या. तसेच पंजाब किंग्सचं पहिल्या जेतेपदाचं स्वप्न भंगलं. आरसीबीने यापूर्वी तीनदा अंतिम फेरी गाठली होती. तिन्ही वेळेस अपयश आलं होतं. पण चौथ्यांदा जेतेपद मिळवण्यात यश आलं. अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव केला. आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन होताच विराट कोहलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कोहली स्वतःला रोखू शकला नाही आणि लहान मुलासारखा रडू लागला.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : पंजाबला सातवा झटका, अझमतुल्लाह ओमरझई आऊट
आरसीबीने पंजाबला किंग्सला सातवा झटका दिला आहे. यश दयाल याने अझमतुल्लाह ओमरझई याला आऊट केलं आहे. अझमतुल्लाह याने 1 धाव केली. आरसीबीचं यासह आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : पंजाबला सहावा झटका, मार्क्स स्टॉयनिस आऊट, आरसीबी विजयाच्या दिशेने
आरसीबीने पंजाबला सहावा झटका दिला आहे. भुवनेश्वर कुमार याने डावातील 17 व्या ओव्हरमध्ये आधी नेहल वढेरा याला आऊट केलं. त्यानंतर मार्क्स स्टॉयनिस याला आऊट केल. पंजाबने यासह सहावी विकेट गमावली. आरसीबीने यासह विजयाच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे.
-
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : नेहल वढेरा आऊट, पंजाबला पाचवा झटका
आरसीबीने पंजाबला पाचवा झटका देत सामन्यावर आणखी घट्ट पकड मिळवली आहे. आरसीबीने नेहल वढेरा याला आऊट केलं आहे. वढेरा 18 बॉलमध्ये 15 रन्स करुन आऊट झाला. भुवनेश्वर कुमार याने ही विकेट घेतली. तर कृणाल पंड्या याने नेहलची कॅच घेतली.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : नेहल वढेरा-शशांक सिंह जोडी जमली, पंजाबला विजयाची आशा कायम
नेहल वढेरा आणि शशांक सिंह जोडी जमली आहे. त्यामुळे पंजाबला विजयाची आशा कायम आहे. पंजाबने 191 रन्सचा पाठलाग करताना 16 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 136 रन्स केल्या आहेत. त्यामुळे पंजाबला विजयासाठी 24 बॉलमध्ये आणखी 55 धावांची गरज आहे.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : आरसीबीची सामन्यावर पकड, पंजाब बॅकफुटवर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सामन्यावर पकड मिळवली आहे. आरसीबीने कर्णधार श्रेयस अय्यर आणि जोश इंग्लिस या दोघांना बाद करत पंजाबला बॅकफुटवर ढकललं आहे. पंजाबच्या 191 धावांचा पाठलाग करताना 14 ओव्हररनंतर 4 आऊट 106 रन्स झाल्या आहेत. नेहल वढेरा 6 तर शशांक सिंह 3 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : पंजाबला चौथा झटका, आरसीबीचं जोरदार कमबॅक
कृणाल पंड्या याने 13 व्या ओवहरमधील पहिल्याच बॉलवर पंजाब किंग्सला झटका दिला आहे. कृणालने जोश इंग्लिसला लियाम लिविंगस्टोन याच्या हाती कॅच आऊट केलं. लियामने सीमारेषेवर सुरेख कॅच घेतला. जोशने 23 बॉलमध्ये 39 रन्स घेतल्या. कृणालची ही दुसरी विकेट ठरली.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : कॅप्टन श्रेयस आऊट, आरसीबीचं जोरदार कमबॅक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जोरदार कमबॅक केलं आहे. कृणाल पंड्या याने प्रभिसमरन सिंह याला आऊट करत पंजाबला दुसरा झटका दिला. त्यानंतर रोमरियो शेफर्ड याने सर्वात मोठी विकेट घेतली आहे. रोमरियोने पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याला त्याच्या खेळीतील दुसऱ्याच बॉलवर आऊट केलं. विकेटकीपर जितेश शर्मा याने श्रेयसचा 1 रनवर कॅच घेतला.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : पंजाबला दुसरा झटका, प्रभसिमरन सिंह आऊट
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कृणाल पंड्या याने पंजाब किंग्सला दुसरा झटक देत पहिली वैयक्तिक विकेट मिळवली आहे. कृणाल पंड्या याने इमपॅक्टर प्लेअर प्रभसमिरन सिंह याला भुवनेश्वर कुमार याच्या हाती कॅच आऊट केलं. प्रभसिमरन सिंह याने 22 बॉलमध्ये 2 फोरसह 26 रन्स केल्या.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : प्रभसिमरन सिंह-जोश इंग्लिस जोडी जमली, आरसीबी विकेटच्या शोधात
पंजाब किंग्सची प्रभसिमरन सिंह-जोश इंग्लिस ही जोडी जमली आहे. त्यामुळे आरसीबी विकेटच्या शोधात आहे. पंजाबने 8 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 70 रन्स केल्या आहेत. त्यामुळे पंजाबला विजयासाठी आणखी 12 ओव्हरमध्ये 121 रन्सची गरज आहे. प्रभसिमरन 25 तर जोश इंग्लिस 16 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : पंजाबच्या पावरप्लेनंतर 1 आऊट 52 रन्स
पंजाब किंग्सने 191 रन्सचा पाठलाग करताना पावरप्लेमध्ये आरसीबी विरुद्ध 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावू 52 रन्स केल्या आहेत. जोश इंग्लिस हा 8 धावांवर नाबाद खेळत आहे. तर प्रभसिमरन सिंह 15 रन्सवर नॉट आऊट आहे. त्याआधी प्रियांश आर्या 24 रन्स करुन आऊट झाला.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : पंजाब किंग्सला पहिला धक्का, प्रियांश आर्या बाद
पंजाब किंग्सला प्रियांश आर्याच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. प्रियांश आर्य 24 धावा करून तंबूत परतला आहे. हेझलवूडच्या गोलंदाजीवर फिलिप सॉल्टने अप्रतिम झेल पकडला.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : प्रभसिमरन सिंगला मिळालं जीवदान, 10 धावांवर असताना झेल सोडला
पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंगला जीवदान मिळालं आहे. हेझलवूडच्या गोलंदाजीवर रोमारियो शेफर्डने सोपा झेल सोडला. 10 धावांवर असताना हा झेल सोडला. आता हा किती महागात पडेल हे लवकरच कळेल.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : पंजाब किंग्सकडून विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रभसिमरन आणि प्रियांश जोडी मैदानात
पंजाब किंग्सकडून आरसीबीन विजयासाठी दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य ही जोडी मैदानात उतरली आहे. पहिल्याच चेंडूवर प्रियांशने चौकार मारला.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 191 धावांचं आव्हान, आरसीबी रोखणार का?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 9 गडी गमवून 190 धावा केल्या आणि विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं. शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने कमाल केली. त्याने तीन विकेट घेत आरसीबीला 200 धावा करण्यापासून रोखलं. पंजाब किंग्स आता हे आव्हान पूर्ण करणार की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु रोखणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : आरसीबीला आठवा झटका, रोमारियो शेफर्डनंतर कृणाल पांड्या बाद
रोमारियो शेफर्ड बाद झाल्यानंतर कृणाल पांड्या 4 धावा करून तंबूत परतला आहे. त्यामुळे 200 धावांचा पल्ला गाठणं आरसीबीला कठीण झालं आहे. अर्शदीपला या षटकात दुसरी विकेट मिळाली.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score: रोमारियो शेफर्ड बाद
रोमारियो शेफर्डला बाद करण्यात अर्शदीप सिंगला यश आलं आहे. अर्शदीपने जबरदस्त यॉर्कर चेंडू टाकला. या चेंडू खेळताना चुकला आणि पायचीत होत तंबूत परतावं लागलं. शेफर्डने 9 चेंडूत 17 धावांची खेळी केली.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : जितेश शर्मा आऊट, आरसीबीला सहावा झटका
आरसीबीने निर्णायक क्षणी मोठी विकेट गमावली आहे. आरसीबीचा विकेटकीपर बॅट्समन जितेश शर्मा आऊट झाला आहे. विजयकुमार वैशाख याने 18 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर जितेश शर्मा याला बोल्ड केलं. जितेशने 10 बॉलमध्ये 24 रन्स केल्या.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : रोमरियो शेफर्डला जीवनदान, प्रवीण दुबेकडून मोठी चूक
आरसीबीचा स्फोटक फलंदाज रोमरियो शेफर्ड याला जीवनदान मिळालं आहे. सबस्टीट्यूड प्रवीण दुबे याने 1 रनवर रोमरियोचा कॅच सोडला. त्यामुळे रोमरियाला जीवनदान मिळालं. प्रवीणची ही चूक पंजाबला किती महागात पडणार हे 20 ओव्हरनंतरच स्पष्ट होईल.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : आरसीबीला पाचवा झटका, लियाम लिविंगस्टोन आऊट
कायले जेेमिन्सन याने जितेश शर्मा आणि लियाम लिविंगस्टोन जोडी फोडली आहे. जेमिन्सन याने लियाम लिविंगस्टोन याला एलबीडब्लयू आऊट केलं आहे. लियामच्या रुपात आरसीबीने पाचवी विकेट गमावली. लियामने 15 चेंडूत 25 धावांचं योगदान दिलं. लियामने या खेळीत 2 चौकार लगावले.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : जितेश शर्माची फटकेबाजी, आरसीबीच्या 150 धावा पूर्ण
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 16.1 ओव्हरमध्ये 150 धावा पूर्ण केल्या. जितेश शर्मा याने ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला. आरसीबीच्या यासह 152 झाल्या. जितेश 17 तर लियाम लिविंगस्टोन 19 धावांवर नाबाद खेळत आहे. आता आरसीबी 200 धावांचा टप्पा पूर्ण करणार का? याकडे आरसीबी चाहत्यांचं लक्ष आहे.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : आरसीबीला मोठा झटका, विराटची अंतिम सामन्यात अर्धशतकाची संधी हुकली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा झटका लागला आहे. अझमतुल्लाह ओमरझई याने आरसीबीला मोठा झटका दिला आहे. ओमरझई याने आपल्याच बॉलिंगवर विराट कोहली याला कॅच आऊट करत आरसीबीला चौथा झटका दिला आहे. विराटने 35 बॉलमध्ये 43 रन्स केल्या. विराटच्या रुपात आरसीबीने चौथी वेकट गमावली.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : विराट कोहलीची फटकेबाजी, अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अनुभवी फलंदाज विराट कोहली पंजाब विरुद्धच्या अंतिम सामन्यात जोरदार फटकेबादी करत आहे. त्यामुळे विराट अर्धशतकाच्या दिशेने जात आहे. आरसीबीने 14 ओव्हरनंतर 3 विकेट्स गमावून 125 रन्स केल्या आहेत. विराट 41 तर लियाम लिविंगस्टोन 14 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : कॅप्टन रजत पाटीदार आऊट, आरसीबीला तिसरा झटका
पंजाबच्या कायले जेमीन्सन याने विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार हे सेट जोडी फोडली आहे. जेमीन्सन याने रजत पाटीदार याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. आरसीबीने रजतच्या रुपात तिसरी विकेट गमावली आहे. रजतने 16 बॉलमध्ये 26 रन्स केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. रजतने विराटसह तिसऱ्या विकेटसाठी 40 धावा जोडल्या.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score : विराट कोहली-रजत पाटीदार जोडी जमली
आरसीबीचे आजी माजी कर्णधार रजत पाटीदार आणि विराट कोहली ही जोडी जमली आहे. आरसीबी अंतिम सामन्यात मोठी सलामी भागीदारी करण्यात अपयशी ठरली. फिलीप सॉल्ट आणि मयंक अग्रवाल दोघेही ठराविक अंतराने आऊट झाले. त्यामुळे आरसीबीची 6.2 ओव्हरनंतर 2 आऊट 56 अशी स्थिती झाली. त्यानंतर रजत आणि विराट या जोडीने आरसीबीचा डाव सावरला आहे. दोघेही आता सेट झाले आहेत.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score: आरसीबीला दुसरा धक्का, मयंक अग्रवाल 24 धाव करून बाद
आरसीबीला मयंक अग्रवालच्या रुपाने दुसरा धक्का बसला आहे. त्याने 18 चेंडूत 24 धावांची खेळी केली. युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारला. पण अर्शदीप सिंगने उत्तर झेल पकडला.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score: पॉवर प्लेच्या 6 षटकात आरसीबीच्या एक गडी बाद 55 धावा, विराट-मयंक जोडी मैदानात
पॉवर प्लेच्या 6 षटकात आरसीबीने एक गडी गमवून 55 धावा केल्या आहेत. आरसीबीने 9.08 रनरेटने धावसंख्या केली आहे. मयंक अग्रवाल 24, तर विराट कोहली 13 धावांवर खेळत आहे.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score: आरसीबीच्या 4 षटकात 1 गडी बाद 39 धावा, विराट-मयंक जोडी मैदानात
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पॉवर प्लेच्या 4 षटकात 1 गडी गमवून 39 धावा केल्या आहेत. 10 च्या रनरेटने स्कोअर होत आहे. विराट कोहली आणि मयंक अग्रवाल जोडी मैदानात आहे. तर फिलीप सॉल्ट 16 धावा करून बाद झाला.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score: आरसीबीला पहिला धक्का, फिलिप सॉल्ट 16 धावा करून बाद
फिलिप सॉल्टने आरसीबीला पहिल्या षटकात आक्रमक सुरुवात करून दिली. त्याच्या आक्रमक खेळीमुळे पंजाब संघ अडचणीत येईल असं वाटत होतं. पण दुसऱ्या सामन्यात जेमिसनने त्याची विकेट काढली. फिलिप सॉल्ट 16 धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरने अप्रतिम झेल पकडला.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Live Score: विराट कोहली आणि फिलीप सॉल्ट जोडी फलंदाजीसाठी मैदानात
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहली आणि फिलीप सॉल्ट ही जोडी मैदानात आली आहे. अर्शदीप सिंग पंजाबकडून पहिलं षटक टाकत आहे. पहिलाच चेंडू वाइड टाकला. सॉल्टने या षटकात एक चौकार आणि षटकार मारत 13 धावा काढल्या.
-
PBKS vs RCB Final IPL 2025 Updates : आयपीएलच्या अंतिम फेरीत यशस्वीरित्या पाठलाग केलेले सर्वाधिक धावा
- 200 – केकेआर विरुद्ध पीबीकेएस, 2014
- 191 – केकेआर विरुद्ध सीएसके, 2012
- 179 – सीएसके विरुद्ध एसआरएच, 2018
- 171 – सीएसके विरुद्ध जीटी, 2023
- 164 – आरआर विरुद्ध सीएसके, 2008
-
PBKS vs RCB Final IPL 2025 Updates : पंजाब किंग्ज इम्पॅक्ट प्लेयर
पंजाब किंग्ज इम्पॅक्ट प्लेयर: प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, हरप्रीत ब्रार
-
PBKS vs RCB Final IPL 2025 Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इम्पॅक्ट प्लेयर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इम्पॅक्ट प्लेयर: रसिक सलाम, मनोज भंडागे, टिम सेफर्ट, स्वप्नील सिंग, सुयश शर्मा.
-
PBKS vs RCB Final IPL 2025 Updates : पंजाब किंग्सची प्लेइंग इलेव्हन
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विषक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
-
PBKS vs RCB Final IPL 2025 Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड.
-
PBKS vs RCB Final IPL 2025 Updates : प्रथम फलंदाजी करावी लागणार असल्याने रजत पाटीदार म्हणाला…
रजत पाटीदार म्हणाला का, आम्हीही गोलंदाजी करणार होतो. खेळपट्टी कठीण दिसतेय, चांगली धावसंख्या उभारण्याचा आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आहोत. हा आमच्यासाठी फक्त एक सामना आहे. हा एक मोठा टप्पा आहे पण मी म्हटल्याप्रमाणे आमच्यासाठी हा फक्त एक बाहेरचा सामना आहे. त्याच संघासह उतरू. खेळपट्टी चांगली दिसत आहे. मला वाटते की ही एक सपाट खेळपट्टी आहे.
-
PBKS vs RCB Final IPL 2025 Updates : नाणेफेक कौल जिंकल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला….
श्रेयस अय्यर म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. फक्त माझ्या मनाला आणि शरीराला सकारात्मक संकेत द्यायचे आहेत. हा एक अद्भुत दिवस आहे. गर्दी उत्साहवर्धक आहे. आपल्याला फक्त इथे येऊन आनंद घ्यायचा आहे. मुले उत्तम स्थितीत आणि मानसिकतेत आहेत. टीम मीटिंगमध्ये आपण फक्त एवढेच बोललो की तुम्ही जितके शांत राहाल तितके चांगले. मी असे म्हणणार नाही की हा दुसऱ्या सामन्यासारखा आहे. हा अंतिम सामना आहे आणि आपण अंतिम सामन्यासारखा खेळणार आहोत.
-
PBKS vs RCB Final IPL 2025 Updates : नाणेफेक जिंकत पंजाब किंग्सने निवडली गोलंदाजी
आयपीएल 2025 स्पर्धेचा अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकून पंजाब किंग्सने गोलंदाजी निवडली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही पंजाबने प्रथम गोलंदाजी स्वीकारत धावांचा पाठलाग केला होता. तसेच अंतिम फेरी गाठली होती, 17 वर्षानंतर दोन्ही संघांना पहिल्या जेतेपदाची आस आहे. त्यामुळे हा सामना खूपच महत्त्वाचा आहे.
-
IPL 2025 Closing Ceremony Live Updates : माँ तुझे सलाम, शंकर महादेवन यांचा लाईव्ह परफॉर्मन्स, सैन्य दलाला सलाम
आयपीएल 2025 क्लोसिंग सेरेमनीत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि त्यांचे दोन्ही मुलं सादरीकरण करत आहेत. ही कलाकार मंडळी देशभक्तीपर गीतांनी उपस्थित क्रिकेट चाहत्यांना प्रेरित करत आहेत. शंकर महादेवन यांनी ऑपरेशन सिंदूरचे स्मरण करून परफॉर्मन्स करत आहेत.
-
IPL 2025 Closing Ceremony Live Updates : दुशमन के छक्के छुडा दे, हम इंडियावाले, बीसीसीआयकडून सैन्य दलाला सॅल्यूट
आयपीएल 2025 समारोप सोहळ्यातून बीसीसीआयकडून भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे आभार जाहीर करण्यात आले आहेत. सैन्य दलाने ऑपेरशन सिंदूरद्वारे पहलगाम हल्ल्याचा वचपा घेत पाकिस्तानला धडा शिकवला होता. या दरम्यानच्या तणावाच्या स्थितीमुळे 18 वा मोसम स्थगित करण्यात आला. मात्र सैन्य दलाने पाकिस्तनची मस्ती जिरवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुन्हा एकदा आयपीएल 2025 स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना सुरुवात करता आली. आता अंतिम सामन्याआधी समारोप समारोहाआधी बीसीसीआयने आणि क्रिकेट चाहत्यांनी सैन्य दलाचे आभार मानले आहेत.
-
IPL 2025 Closing Ceremony Live Updates : आयपीएल 2025 समारोप सोहळ्याला सुरुवात
आयपीएल 2025 मधील अंतिम फेरीत पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजता क्लोजिंग सेरेमनीला सुरुवात झाली आहे. ऑपरेशन सिंदूर ही या क्लोजिंग सेरेमनीची थीम आहे. शंकर महादेवन आणि अन्य कलाकारांकडून या समारोप समारोहात परफॉर्मन्स केला जात आहे.
-
PBKS vs RCB Final IPL 2025 Updates : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील चॅम्पियन्स संघ कोणते?
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात गेल्या 17 हंगामांमध्ये 3 संघांचा दबदबा राहिला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा ट्रॉफी उंचावली आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने 3 वेळा ट्रॉफी उंचावली आहे. तर या व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि गुजरात टायटन्स या संघांनी प्रत्येकी 1-1 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
-
PBKS vs RCB Final IPL 2025 Updates : आरसीबी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम आयपीएल 2025 फायनल महामुकाबल्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहचली आहे. आरसीबीचे खेळाडू बसमधून उतरून स्टेडियममध्ये पोहचले आहेत. आता सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 6 वाजता क्लोसिंग सेरेमनीला सुरुवात होणार आहे.
-
PBKS vs RCB Final IPL 2025 Updates : आरसीबीची आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीतील कामगिरी कशी?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात याआधी तिन्ही वेळा अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबीने 2009, 2011 आणि 2016 साली अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र तिन्ही वेळा आरसीबीला आयपीएल ट्रॉफीने हुलकावणी दिली. आता आरसीबी चौथ्या प्रयत्ना यशस्वी ठरणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.
-
PBKS vs RCB Final IPL 2025 Updates : विराट कोहलीची 3 आयपीएल फायनलमधील कामगिरी कशी? पाहा आकडे
विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीपासून आरसीबीकडून खेळतोय. विराटची आरसीबीसाठी फायनल खेळण्याची ही चौथी वेळ आहे. याआधी विराटने एकूण 3 अंतिम सामन्यांमध्ये मिळून 96 रन्स केल्या आहेत. विराटने 2009 साली डेक्कन चार्जर्स विरुद्ध अंतिम फेरीत 7 धावा केल्या. सीएसके विरुद्ध 2011 साली 35 धावांची खेळी केली. तर 2016 साली सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 54 रन्स केल्या.
-
PBKS vs RCB Final IPL 2025 Updates : कॅप्टन श्रेयस-रजत 6 महिन्यांत फायनलमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने
आयपीएल 2025 फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. रजत पाटीदार आरसीबीचं तर श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करणार आहे. रजत आणि श्रेयस या दोघांची कर्णधार म्हणून आमेनसामने येण्याची 6 महिन्यांतील दुसरी वेळ आहे. गेल्या वेळेस 15 डिसेंबर 2024 रोजी श्रेयसच्या नेतृत्वात मुंबईने रजत पाटीदारच्या मध्य प्रदेशवर मात करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली होती.
-
भुमीहिन लाभार्थ्यांना घर मिळालं पाहिजे – मंत्री जयकुमार गोरे
भुमीहिन लाभार्थ्यांना घर मिळालं पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्री यांनी घेतली आहे. तशा सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत असे मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे. २० लाख घरे येणाऱ्या एका वर्षात पुर्ण करण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं आहे असेही गोरे यांनी म्हटले आहे.
-
PBKS vs RCB Final IPL 2025 Updates : महामुकाबल्याकडे सर्वांचंच लक्ष, कोण उंचावणार आयपीएल ट्रॉफी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यापैकी कोणता संघ आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा विजेता होणार? याबाबत क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. आरसीबीला 3 प्रयत्नांमध्ये अंतिम सामन्यात विजय मिळवता आला नाही. तर पंजाबही एकदा अपयशी ठरलीय. त्यामुळे दोन्ही संघांचा यंदा 18 वर्षांची प्रतिक्षा संपवण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र एकाच संघाचं ते स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता तो विजेता संघ कोण असणार? याची उत्सूकता ही शिगेला पोहचली आहे.
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Playing XI : आयपीएल फायनलचं काऊंटडाऊन सुरू
पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होत आहे. आयपीएलमधील आजचा हा अंतिम सामना आहे. संध्याकाळी 7 वाजता हा सामना होणार आहे. म्हणजे अवघे तीन तास सामन्याला बाकी आहे.
-
IPL 2025 FINAL : टॉस जिंकून बॅटिंग घ्यावी की बॉलिंग?
-
RCB vs PBKS IPL 2025 Final Playing XI : फायनलपूर्वीच दोन मॅच विनर जखमी; काय घडणार?
आयपीएलचा आज अंतिम सामना रंगणार आहे. पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात निर्णायक लढत होणार आहे. पण त्यापूर्वीच दोन मॅच विनर जखमी झाल्याने टेन्शन वाढलं आहे. आरसीबीचा स्फोटक फलंदाज टिम डेव्हिड जखमी झाल्याने त्याची खेळण्याची शक्यता कमी आहे. तर, दुसरीकडे पंजाब किंग्सचा स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहलच्या फिटनेसवरूनही चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या सामन्यात चहलच्या खेळण्यावरूनही शंका उपस्थित केली जात आहे.
-
अय्यर, पाटीदारला इतिहास रचण्याची संधी, IPLच्या रेकॉर्डमध्ये होणार नोंद
पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलची फायनल मॅच होणार आहे. यावेळी आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आमि पीबीकेएसचा कर्णधार श्रेयस अय्यरला इतिहास रचण्याची संधी आहे.
आज आरसीबी जिंकल्यास आयपीएलच्या इतिहासात वेगाने ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्णधाराच्या यादीत पाटीदारचा समावेश होणार आहे. तर आज पंजाब जिंकल्यास आयपीएलच्या दोन वेगवेगळ्या फ्रेंचाईजमध्ये ट्रॉफी जिंकणारा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची नोंद होणार आहे.
-
RCB vs PBKS Head to Head Records: दोन्ही संघांची एकमेकांविरोधातील कामगिरी, कोणता संघ भारी?
RCB vs PBKS Head to Head Records: दोन्ही संघांची एकमेकांविरोधातील कामगिरी, कोणता संघ भारी?
-
वैभव सूर्यवंशीला आयपीएलचा सर्वात मोठा पुरस्कार मिळणार? फायनल नंतर होणार घोषणा
आयपीएलमधील युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला इमर्जिंग प्लेयर अवॉर्ड मिळण्याची शक्यता आहे. 1 एप्रिल 1999 मध्ये किंवा त्याच्यानंतर जन्म झालेल्यांना किंवा 5 कसोटी आणि 20 वनडेहून अधिक सामने खेळणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. वैभवचा जन्म 1999 नंतरचा असल्याने त्याला हा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.
-
या संघानी पाच वेळा पटकवले विजेतेपद
मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळा जेतेपद पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे.
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधील खेळाडू कोण कोण? कसा आहे संघ?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू XII संघ
1) फ़िल सॉल्ट, 2) विराट कोहली, 3) मयंक अग्रवाल, 4) रजत पाटीदार (कप्तान), 5) लियम लिविंगस्टन/टिम डेविड, 6) जितेश शर्मा (विकेटकीपर), 7) रोमारियो शेफ़र्ड, 8) क्रुणाल पंड्या, 9) भुवनेश्वर कुमार, 10) यश दयाल, 11) जॉश हेज़लवुड, 12) सुयश शर्मा
-
पंजाब टीममधील खेळाडू कोण कोण? कसा आहे संघ?
पंजाब किंग्स XII संघ
1) प्रियांश आर्य, 2) प्रभसिमरन सिंग, 3) जॉश इंग्लिस (विकेटकीपर), 4) श्रेयस अय्यर (कप्तान), 5) नेहाल वढेरा, 6) शशांक सिंह, 7) मार्कस स्टॉयनिस, 8) अज़मतुल्लाह ओमरज़ाई, 9) विजयकुमार वैशक, 10) काइल जेमिसन, 11) अर्शदीप सिंह, 12) युज़वेंद्र चहल/हरप्रीत बराड़
-
IPL Final 2025 : फायनलमध्ये किती धावा काढणारा बनेल चॅम्पियन? काय आहे गणित?
आयपीएलचा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. यावेळी टॉस जिंकणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच अहमदाबादची पीच पाहता या पीचवर 200 हून अधिक धावा करणारा संघ चॅम्पियन बनणार असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण 200 हून अधिक धावा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
आयपीएलमध्ये आज मिळणार नवीन चॅम्पियन
आज आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्समध्ये लढत होणार आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज हा सामना रंगणार असून आयपीएलला नवीन चॅम्पियन मिळणार आहे.
-
टेन्शन… टेन्शन… आयपीएलच्या फायनलपूर्वीच आरसीबीचा एक खेळाडू गायब
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्समध्ये लढत होणार आहे. या अंतिम सामन्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागला आहे. पण आरसीबीचा ओपनर फिल सॉल्ट हा गायब झाला आहे. तो प्रॅक्टिस सेशनलाही हजर नव्हता. त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
-
श्रेयस अय्यरची झोप उडाली? फायनलपूर्वी काय म्हणाला?
पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज अंतिम लढत होणार आहे. पण या लढतीपूर्वीच पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नांगी टाकल्यासारखं दिसतंय. निदान त्याच्या विधानातून तरी तसं दिसतंय. मला रात्रभर झोप लागली नाही. कसाबसा चार तास झोपलो, असं श्रेयस म्हणाला. आता यावरून काय समजायचं ते समजून जा.
-
IPL 2025 Final RCB vs PBKS : झोप उडाली, अंतिम सामन्याचा धसका, हा कर्णधार रात्रभर झोपलाच नाही
IPL 2025 Final RCB vs PBKS : झोप उडाली, अंतिम सामन्याचा धसका, हा कर्णधार रात्रभर झोपलाच नाही
-
विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या पर्वातील शेवटचा सामना पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) यांच्यात आज होणार आहे. विजेत्या संघाला 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील, तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये मिळतील.
-
RCB Vs PBKS IPL 2025 Final Live Streaming : आरसीबी विरुद्ध पंजाब महामुकाबला किती वाजता सुरू होणार?
-
IPL 2025 Final : आयपीएलचा अंतिम सामना, संध्याकाळी अहमदाबादचं हवामान कसं राहणार ?
-
IPL 2025 Final : किती वाजता होणार टॉस ? मॅच कितीला होणार सुरू ?
IPL 2025 Final : आयपीएलच्या 18 व्या हंगामातील सर्वात महत्वाचा, अंतिम सामना आज होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स या दोन संघात आज आयपीएल ट्रॉफीसाठी महामुकाबला होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यातील टॉस संध्याकाळी 7 वाजता तर मुख्य सामन्याला 7.30 वाजता सुरूवात होईल.
-
आयपीएल 2025ची फायनल आज, आरसीबी वि. पंजाब भिडणार
आयपीएल 2025 मधील फायनल मॅच आज होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स हे दोन्ही संघ अंतिम फेरीत एकमेकांना भिडणार आहेत. संध्याकाळी 7.30 पासून फायनल मॅच सुरू होईल. आरसीबी की पंजाब, आयपीएलची ट्रॉफी कोण उंचावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published On - Jun 03,2025 9:06 AM
