अवघ्या काही मिनिटात OnePlus 9, 9 Pro, 9R आणि स्मार्टवॉच लाँच होणार, इथे पाहा Live

वनप्लसने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, कंपनी आपला आगामी स्मार्टफोन वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो 23 मार्च रोजी (आज) लाँच करणार आहे. (OnePlus 9 Series Launch LIVE)

अवघ्या काही मिनिटात OnePlus 9, 9 Pro, 9R आणि स्मार्टवॉच लाँच होणार, इथे पाहा Live

मुंबई : वनप्लसने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, कंपनी आपली आगामी वनप्लस 9 ही स्मार्टफोन सिरीज23 मार्च रोजी (आज) लाँच करणार आहे. या सिरीजअंतर्गत कंपनी OnePlus 9, OnePlus 9 Pro और OnePlus 9R हे तीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. तसेच कंपनी या सोबत वनपल्सचं स्मार्टवॉचदेखील लाँच करणार आहे. वनप्लसने आपल्या अधिकृत घोषणेत म्हटले आहे की, फोनचे हार्डवेअर आणि कॅमेरा अधिक शक्तिशाली बनविण्यासाठी कंपनी Hasselblad बरोबर काम करत आहे. दरम्यान अवघ्या काहीच वेळात एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये स्मार्टवॉच लाँच होणार आहे. (oneplus 9 series launch event 2021 live updates live stream india today check OnePlus 9 OnePlus 9 Pro and oneplus 9R phone price specifications features online)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 23 Mar 2021 18:52 PM (IST)

  शानदार कॅमेरा

  दरम्यान, वनप्लसने म्हटलं आहे की, ते वनप्लस 9 सिरीजमध्ये कस्टम सोनी IMX789 सेन्सर वापरणार आहेत. हा सेन्सर प्रायमरी कॅमेराच्या रुपात उपलब्ध असेल. कंपनीने म्हटले आहे की, आतापर्यंत कोणत्याही वनप्लस डिव्हाइसमधील हा सर्वात अॅडव्हान्स मेन कॅमेरा सेन्सर असेल. नवीन सेन्सर हा जुन्या सेन्सर्सच्या तुलनेत 64 पटीने अधिक दमदार असेल. ज्याच्या मदतीने तुम्ही प्रत्येक रंग आणि प्रत्येक फोटो अधिक चांगल्या प्रकारे कॅप्चर करु शकाल.

 • 23 Mar 2021 18:51 PM (IST)

  2 वर्षांची वॉरंटी

  वनप्लसच्या या नव्या सिरीजबाबत नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार वनप्लस 9 वर दोन वर्षांची वॉरंटी दिली जाणार आहे. वनप्लसचे सीईओ पीट लाऊ यांनी याबाबतची पुष्टी केली आहे. दरम्यान, ही वॉरंटी जगभरातील ग्राहकांसाठी असणार आहे की, केवळ चिनी ग्राहकांसाठीच असणार, याबाबत पीट यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. बहुतांशी स्मार्टफोन कंपन्या केवळ 1 वर्षाच्या वॉरंटीसह स्मार्टफोन लाँच करत असतात, अशा परिस्थितीत वनप्लसचं हे पाऊल जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरेल, असं बोललं जात आहे.

 • 23 Mar 2021 18:49 PM (IST)

  ग्लोबल व्हर्च्युअल इव्हेंट

  OnePlus कंपनी एका ग्लोबल व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये ही सिरीज आणि स्मार्टवॉच लाँच करणार आहे. या इव्हेंटचं थेट प्रक्षेपण कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर, OnePlus आणि OnePlus India च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल. YouTube वर आधीच हा इव्हेंट क्रिएट करण्यात आला आहे. ज्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7.30 वाजता होईल. या कार्यक्रमाचे प्रसारण फ्रेंच, जर्मन, इटालियन, स्पॅनिश आणि इंग्लिश या भाषांमध्ये केलं जाईल. आज ही सिरीज ग्लोबली लाँच केली जाईल, उद्या म्हणजेच 24 मार्च रोजी चीनमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला जाईल. 30 मार्चपासून याचा पहिला सेल सुरु होईल.

  इथे पाहा लाईव्ह इव्हेंट

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI