Ratnagiri Landslide | खेडमधील पोसरे-बौद्धवाडीत दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू, बचावकार्याला सुरुवात

Ratnagiri Landslide | खेडमधील पोसरे-बौद्धवाडीत दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू, बचावकार्याला सुरुवात

| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 7:26 PM

खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली आहे. यात काही कुटुंब अडकले असण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील बिरमणी इथं दरड कोसळलून 2 जण दगावले आहेत.

रत्नागिरी :  एकीकडे महाडचं तळीये गाव उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे 17 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली आहे. यात काही कुटुंब अडकले असण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील बिरमणी इथं दरड कोसळलून 2 जण दगावले आहेत.