4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 20 July 2021

| Updated on: Jul 20, 2021 | 8:33 AM

विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. यंदा आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दाम्पत्याने महापूजा केली.

Follow us on

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2021) पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. यंदा आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दाम्पत्याने महापूजा केली.

“मी भाग्यवान आहे की मला इतक्या जवळून महापूजेचा बहुमान मिळाला. लाखो भाविक कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत. मी मोठं काहीही केलेले नाही. तुडुंब पंढरपूर, आनंदाची उधळण असते, ते वातावरण आम्हाला सर्वांना हवंय. लवकरात लवकर ते वातावरण आपल्याला मिळावे, अशी मी विठुराया चरणी प्रार्थना करतो,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.