4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 25 September 2021

| Updated on: Sep 25, 2021 | 7:38 AM

भक्त मंडळी एकाच वेळेस ठिकठिकाणी गर्दी करण्याची शक्यता आहेत. पण कोविडचं संकट अजून संपलेलं नाही. त्यामुळे धार्मिक स्थळं, त्यांची ट्रस्ट मंडळी, आणि प्रार्थनेसाठी येणाऱ्या मंडळींनी नेमके कोणते नियम पाळायचे याची नियमावलीच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलीय. 

Follow us on

ठाकरे सरकारनं अखेर राज्यातली मंदिरं तसच इतर धार्मिक स्थळं खुली करण्याची घोषणा केलीय. गेल्या वर्षभरात जवळपास कोविडच्या ह्या संपूर्ण काळात महाराष्ट्रातली सर्व धार्मिक स्थळं बंदच आहेत. सरकारच्या घोषणेनंतर ती 7 ऑक्टोबरपासून उघडली जातील. त्यामुळे भक्त मंडळी एकाच वेळेस ठिकठिकाणी गर्दी करण्याची शक्यता आहेत. पण कोविडचं संकट अजून संपलेलं नाही. त्यामुळे धार्मिक स्थळं, त्यांची ट्रस्ट मंडळी, आणि प्रार्थनेसाठी येणाऱ्या मंडळींनी नेमके कोणते नियम पाळायचे याची नियमावलीच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलीय.

धार्मिक स्थळांनी प्रवेशद्वारावर सॅनिटायझर तसच स्क्रिनिंगची व्यवस्था करणं अनिवार्य. कोविड रोखण्यासाठी सुचना देणारे फलक लावणं अनिवार्य, तसच ऑडिओ व्हिडीओही धार्मिक स्थळांमध्ये टाईम टू टाईम लावले जावेत.