VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 PM | 18 June 2022

| Updated on: Jun 18, 2022 | 1:17 PM

केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून कडाक्याचा विरोध होताना दिसतो आहे. आज चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये भरतीसाठी अग्निवीरांसाठी 10 टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने हे ट्विट करून ही माहिती जाहीर केली आहे.

Follow us on

केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून कडाक्याचा विरोध होताना दिसतो आहे. आज चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये भरतीसाठी अग्निवीरांसाठी 10 टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने हे ट्विट करून ही माहिती जाहीर केली आहे. त्यामध्ये अग्निवीरांना दोन्ही दलांमध्ये भरतीसाठी उच्च वयोमर्यादेतून 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे असे म्हटले आहे. अग्निवीरच्या पहिल्या बॅचसाठी वयाची अट उच्च वयोमर्यादेपासून 5 वर्षे असेल. सध्याच्या नियमांनुसार, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये माजी सैनिकांसाठी 10 टक्के कोटा आहे. अग्निपथमुळे जे तरूण आर्मी भरतीची तयारी करत होते, त्यांच्या आशेवर पाणी फिरल्याचे बोलले जात आहे. यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये आंदोलने केली जात आहेत.