VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 24 March 2022
मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून निवडून आले. परंतु, ते सध्या पक्षात सक्रिय नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय. शिवाय आज स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या होणाऱ्या हिवरखेड येथील मेळाव्यात आमदार देवेंद्र भुयार यांना आमंत्रण नाही. अशावेळी देवेंद्र भुयार यांच्या स्वाभिमानी पक्षातून हकालपट्टीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून निवडून आले. परंतु, ते सध्या पक्षात सक्रिय नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय. शिवाय आज स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या होणाऱ्या हिवरखेड येथील मेळाव्यात आमदार देवेंद्र भुयार यांना आमंत्रण नाही. अशावेळी देवेंद्र भुयार यांच्या स्वाभिमानी पक्षातून हकालपट्टीची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. मौर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यासंदर्भात राजू शेट्टी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी आणि आमदार देवेंद्र भुयार यांच्यामधील मतभेद गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर आलेत.
