Ladki Bahin Yojana Video : आदिती तटकरेंकडून ‘लाडक्या बहिणी’साठी आनंदाची बातमी, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला…

Ladki Bahin Yojana Video : आदिती तटकरेंकडून ‘लाडक्या बहिणी’साठी आनंदाची बातमी, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला…

| Updated on: Mar 03, 2025 | 1:47 PM

तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना महायुती सरकारकडून मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे.

राज्यभरातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना महायुती सरकारकडून मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे. येत्या ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना योजनेचा हफ्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासंदर्भातील माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. येत्या ८ मार्च महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे पैसे मिळणार आहे. महिला दिनाचं औचित्य साधून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा हफ्ता जमा करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. येत्या ८ तारखेला शनिवार असून महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनींसह सर्व महिलांसाठी सभागृहात एक विशेष सत्र पार पडणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अनुसरून थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात उपलब्ध करून देणार आहोत. तर ५, ६ मार्चपासूनच याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली.

 

Published on: Mar 03, 2025 01:33 PM