‘टायगर इज बँक’, शरद पवार यांच्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांची घोषणा

‘टायगर इज बँक’, शरद पवार यांच्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांची घोषणा

| Updated on: May 05, 2023 | 6:58 PM

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. परंतु, शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी गेले पाच दिवस युवक आणि युवती काँग्रेसच्या पदाधिकारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ठाण मांडून बसले होते. त्यांच्या या मागणीला यश आले आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. परंतु, शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी गेले पाच दिवस युवक आणि युवती काँग्रेसच्या पदाधिकारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ठाण मांडून बसले होते. त्यांच्या या मागणीला यश आले आहे. शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. यावेळी शरद पवार यांनी काम करण्याची संधी द्या अशी अनेकांची भावना आहे. अनेक नेत्यांनी मला विंनती केली. त्यामुळे राजीनामा मागे घेत आहे. तसेच, कुणाला जायचं असल्यास थांबबू शकत नाही असेही स्पष्ट केले. मात्र, शरद पवार यांच्या या घोषणेमुळे गेले पाच दिवस चव्हाण सेंटर येथे ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. यावर प्रतिक्रया देताना युवती काँग्रेसच्या पदाधिकारी सलक्षणा सलगर यांनी थेट शब्दात नेमकीच प्रतिक्रिया दिली आहे. साहेब आमच्या पक्षाचे टायगर आहेत. त्यांच्यापासून राजकारण सुरु होते आणि त्यांच्यापर्यंतच संपते. त्यामुळे या निर्णयावर ‘टायगर इज बँक’ अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: May 05, 2023 06:58 PM