अहमदाबाद दुर्घटनेतील विमानाच्या इंजिनबाबत एअर इंडियाचा दावा काय?

अहमदाबाद दुर्घटनेतील विमानाच्या इंजिनबाबत एअर इंडियाचा दावा काय?

| Updated on: Jul 04, 2025 | 9:51 AM

अहमदाबाद दुर्घटनेतील विमानाच्या इंजिनबाबत एअर इंडिया कंपनीने आपली बाजू मांडली आहे. विमानाचे दोन्ही इंजिन सुस्थितीत होते, पायलटसुद्धा अत्यंत अनुभवी होती, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

जवळपास गेल्या चार दशकांमधील भारतीय विमान कंपनीशी संबंधित मोठी दुर्घटना 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये घडली. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केलेलं बोइंग 787-8 विमान अवघ्या काही क्षणांतच खाली कोसळलं होतं. या भीषण अपघातात विमानातील फक्त एक प्रवासी सोडता इतर सर्वांचा मृत्यू झाला. इतकंच नव्हे तर हे विमान ज्या मेडिकल कॉलेज हॉस्टेलवर कोसळलं होतं, तिथेही अनेकांनी आपले प्राण गमावले होते. एअर इंडियाच्या त्या विमानात नेमकी काय गडबड होती, असे प्रश्न विचारले जात असताना कंपनीकडून महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे. “विमान सुस्थितीत होतं आणि पायलटसुद्धा अत्यंत अनुभवी होते. आम्ही या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत आहोत. या अपघाताचं कारण काय असू शकतं याबद्दल कोणत्याही निष्कर्षावर न पोहोचणं चांगलं”, अशी प्रतिक्रिया ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिली.

Published on: Jul 04, 2025 09:51 AM