Air India Plane Crash :  ‘त्या’ 10 मिनिटांमुळे आज जिवंत, गुजरातच्या तरूणीनं सांगितलं तिच्यासोबत काय घडलं?

Air India Plane Crash : ‘त्या’ 10 मिनिटांमुळे आज जिवंत, गुजरातच्या तरूणीनं सांगितलं तिच्यासोबत काय घडलं?

| Updated on: Jun 13, 2025 | 1:05 PM

गुजरातमधील भरूच येथील रहिवासी भूमी चौहान दोन वर्षांनी सुट्टीसाठी भारतात आली होती. गुरुवारी अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमान एआय-१७१ ने तिला लंडनला परतायचे होते, मात्र काही कारणामुळे ती वेळेवर विमानतळावर पोहोचू शकली नाही, ज्यामुळे तिचा जीव वाचला.

गुजरातमधील भरूच येथील रहिवासी भूमी चौहान हिलाही एअर इंडियाच्या विमान AI-171 ने लंडनला जायचे होते, परंतु ती सरदार वल्लभभाई विमानतळावर 10 मिनिटे उशिरा पोहोचली. हे तेच विमान होते जे नंतर क्रॅश झाले होते, ज्यामध्ये क्रू मेंबर्ससह 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला होता. विमान अपघातातून वाचलेल्या भूमीने तिचा अनुभव सांगितला.

अहमदाबाद विमानतळावर पोहोचण्यास १० मिनिटे उशीर झाला म्हणून भूमी चौहान आज जीवंत आहे. भूमी चौहान गुरुवारी एअर इंडियाच्या विमान एआय-१७१ ने प्रवास करणार होती. मात्र ती फ्लाईटच्या वेळेवर पोहोचू शकली नाही. एका वृत्तसंस्थेला माहिती देताना ती म्हणाली, वाहतूक कोंडीमुळे विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे तिला विमानात चढू देण्यात आले नाही. दरम्यान, तिचा जीव वाचल्यानंतर भूमीने देवाचे आभारच मानले. तिने सांगितले की मी सुरक्षित आहे, पण विमान अपघात हृदयद्रावक आहे.

Published on: Jun 13, 2025 01:04 PM