दैव तारी त्याला कोण मारी! मी उडी मारली नाही.., विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाचा अंगावर काटा आणणारा अनुभव

दैव तारी त्याला कोण मारी! मी उडी मारली नाही.., विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाचा अंगावर काटा आणणारा अनुभव

| Updated on: Jun 13, 2025 | 12:02 PM

अहमदाबादमध्ये झालेल्या मेघानी येथील विमान अपघातात बचवलेल्या रमेश विश्वकुमार यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आहे.

मी विमानातून उडी मारली नाही, सीटसह बाहेर फेकलो गेलो, अशी प्रतिक्रिया अहमदाबाद विमान अपघातात बचवलेल्या एकमेव प्रवाशाने दिलेली आहे. काल अहमदाबादमध्ये झालेल्या मेघानी येथील विमान अपघातात 241 प्रवाशांसह 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा विमान अपघात म्हणून बघितला जातो आहे.

दरम्यान, या अपघातात विमानातील 242 प्रवाश्यांपैकी केवळ एक प्रवासी बचावला आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. रमेश विश्वकुमार असं त्यांचं नाव आहे. घटनेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांचे नातेवाईक आणि बचवलेल्या रमेश विश्वकुमार यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यावेळी रमेश विश्वकुमार यांनी अपघाताच्या वेळीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यावेळी रमेश विश्वकुमार यांनी अपघाताच्यावेळी उडी मारली असेल, त्यामुळे ते वाचू शकले असं अंदाज लावला जात होता. मात्र रमेश विश्वकुमार यांनी सांगितलं की त्यांनी उडी मारली नव्हती. अपघात झाला त्यावेळी ते सीटसह बाहेर फेकले गेले होते. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

Published on: Jun 13, 2025 11:59 AM