Vaishnavi Hagawane Case : मोठी बातमी! निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक

Vaishnavi Hagawane Case : मोठी बातमी! निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक

| Updated on: May 30, 2025 | 4:09 PM

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला पोलिसांनी नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांची सहा पथकं निलेश चव्हाणचा शोध घेत होते. त्यानंतर अखेर आज पोलिसांना निलेश चव्हाण याला पकडण्यात यश आलं आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण याच्याकडे वैष्णवीचे बाळ ठेवण्यात आलेले होते. वैष्णवीचे कुटुंबीय हे बाळ आणण्यासाठी गेल्यावर निलेश याने त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावले होते. तसंच बाळाला देण्यास नकार दिला होता, असं वैष्णवीच्या कुटुंबाने आरोप केलेले आहेत. त्याचबरोबर निलेश चव्हाण स्वत:च्या पत्नीचे अश्लील व्हिडीओ बनवल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे. त्याच्या लॅपटॉपमध्ये पोलिसांना अनेक आक्षेपहार्य गोष्टी आढळून आल्या आहेत.

Published on: May 30, 2025 04:09 PM