पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कठोर निर्बंध लागणार? वाढत्या रुग्णसंख्येमुळं चिंता वाढली

| Updated on: Jan 15, 2022 | 10:37 AM

पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीची कोरोना बैठक बोलवालीय. या बैठकीत अजित पवार काय निर्णय घेणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय.

Follow us on

पुणे (Pune) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून 5 हजारांपेक्षा जास्त कोरोना (Corona) रुग्ण आले आहेत. मात्र, गेल्या 24 तासात 10 हजार पेक्षा जादा कोरोना रुग्णांची नोंद झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील निर्बंध कठोर होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीची कोरोना बैठक बोलवालीय. या बैठकीत अजित पवार काय निर्णय घेणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय. पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. गेल्या 24 तासात रुग्णसंख्या दहा हजारापार गेलीय. दिवसभरात पुण्यात 10 हजार 76 रुग्णसंख्या आढळून आली. तर, 2 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.