ठाकरेंनी काय गमावलं याचा अमृता फडणवीसांनी पाढा वाचला, दानवेंनी 4 शब्दात उत्तर दिलं!

ठाकरेंनी काय गमावलं याचा अमृता फडणवीसांनी पाढा वाचला, दानवेंनी 4 शब्दात उत्तर दिलं!

| Updated on: Oct 10, 2022 | 3:54 PM

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अमृता फडणवींसाच्या टीकेला चार शब्दात प्रत्युत्तर दिलंय.

मुंबई : ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील सत्ता संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी ट्विट करत या सगळ्या परिस्थितीवर भाष्य केलंय. ठाकरेंनी सारं काही गमावलं आहे. धनुष्यबाण, पक्ष आमदार, खासदार, भाजप सारखा सच्चा मित्र आणि हिंदुत्वाचा विचार… एवढं सगळं शिवसेना गमावून बसली आहे, असं ट्विट अमृता यांनी केलं आहे. त्याला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी चार शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. आमची चिंता आम्ही करू, असं दानवे (Ambadas Danve) म्हणालेत.

Published on: Oct 10, 2022 03:54 PM