Pakistan : आधी दहशतवाद संपवा… अमेरिकन खासदारानं खडसावलं, जागतिक व्यासपीठावर पाकचा पर्दाफाश

Pakistan : आधी दहशतवाद संपवा… अमेरिकन खासदारानं खडसावलं, जागतिक व्यासपीठावर पाकचा पर्दाफाश

| Updated on: Jun 07, 2025 | 12:27 PM

ओसामा बिन लादेनला हत्या करण्यात अमेरिकेला मदत करण्यासाठी तुरूंगात टाकलेल्या डॉ. शकील आफ्रिदी यांना सोडण्याची गरज याबद्दल खासदार शर्मन यांनी पाकिस्तानी प्रतिनिधीमंडळात आपल्या सरकारला सांगितले. ते म्हणाले की डॉ. आफ्रिदी सोडणे हे 9/11 च्या पीडितांसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानचा चांगलाच पर्दाफाश झाला आहे. आधी दहशतवाद संपवा, असं अमेरिकन खासदाराने पाकिस्तानच्या शिष्टमंडळाला खडसावलं असल्याचे समोर आले आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करा, असं वॉश्गिटनमध्ये पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वातील पाकिस्ताच्या शिष्टमंडळाची भेट घेताना म्हटलंय. पाकिस्तानने या घृणास्पद दहशतवादी संघटनेचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी पाकिस्तानने सर्व शक्य ती पाऊलं उचलावी आणि दहशतवादाविरोधात लढा द्यावा , असं अमेरिकेचे खासदार ब्रॅड शर्मन यांनी म्हटलंय.  गुरुवारी अमेरिकन संसदेचे सदस्य ब्रॅड शर्मन यांची पाकिस्तानी प्रतिनिधीमंडळाची भेट झाली. तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वात भारतीय खासदारांचे सर्व पक्ष प्रतिनिधीमंडळ वॉशिंग्टन डी.सी. मध्ये होते तेव्हा पाकिस्तानी प्रतिनिधीमंडळाने अमेरिकन राजधानीला भेट दिली.

Published on: Jun 07, 2025 12:27 PM