Ravi Rana यांच्या समर्थकांचं महापालिकेत आंदोलन, आयुक्त आष्टीकर यांच्याकर शाईफेक केली

| Updated on: Feb 09, 2022 | 3:23 PM

अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज (shivaji maharaj) यांच्या पुतळ्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा (ravi rana) समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (pravin ashtikar) यांच्या अंगावर शाईफेकून निषेध नोंदवला आहे.

Follow us on

अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज (shivaji maharaj) यांच्या पुतळ्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा (ravi rana) समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (pravin ashtikar) यांच्या अंगावर शाईफेकून निषेध नोंदवला आहे. आज दुपारी रवी राणा यांच्या महिला कार्यकर्त्यांनी पालिकेत येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आयुक्तांना पुतळा का हटवला याचा जाब विचारून त्यांच्या अंगावर थेट शाई फेकली. काही कळायच्या आत हा प्रकार झाल्याने आयुक्त आष्टीकरही काही काळ गोंधळून गेले. मात्र, पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवून या महिला कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर काढले. मात्र, या प्रकारामुळे पुतळा हटवण्याचं राजकारण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे पालिकेच्या आवारात आज दुपारी अधिकारी आणि सुरक्षा रक्षकासोबत कचऱ्याची पाहणी करत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. ओपन स्पेस असल्याने या ठिकाणी दोन महिला आल्या. त्यांना सुरक्षा रक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एका महिलेने आपल्या पिशवीतून एक बॉटल काढली. त्यात काही तरी असल्याचं लक्षात आल्याने आष्टीकर सतर्क झाले अन् ते जीवाच्या आकंताने पळाले.