Anjali Damania : मुंडे ठणठणीत, बेल्स पाल्सी अजार फक्त 4 आठवड्यांचा ते खोटारडे… अंजली दमानियांचा घणाघात
'डिसेंबर २०२३ मध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नीने मुंबईतील वीरभवन इमारतीत घर १६ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी केले होते. वीरभवन इमारतीत ९ व्या मजल्यावर ९०२ असा या घराचा क्रमांक आहे. तरी देखील मुंडे म्हणतात मुंबईत माझं घर नाही'
धनंजय मुंडे यांच्या नावावर गिरगाव चौपाटीतील एन. एस. पाटकर मार्गावरील वीरभवन इमारतीत आलिशान घर असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. मंत्रीपद गेल्यानंतरही बरेच दिवस उलटले तरीही त्यांनी शासकीय बंगला सोडलेला नाही यावरून दमानिया यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. दमानिया यांनी सर्व माध्यमांना विनंती करत मुंबईतील वीरभवन इमारतीत 9 व्या मजल्यावरील 902 हे घरं कोणाचं आहे, याची माहिती घेऊन चौकशी करावी. इतकंच नाहीतर धनंजय मुंडे यांच्या तब्येतील काहीच झालं नसताना त्यांनी ते कारण सांगून अद्याप शासकीय बंगला सोडला नसल्याचे स्पष्टीकरण दिलंय. बेल्स पाल्सी नावाचा हा आजार फक्त चार आठवडेच चालतो. त्यानंतर माणूस ठणठणीत बरा होतो. एककीडे सांगायचं मी फोनवर बोलत नाही अन् दुसरीकडे सभा गाजवायच्या, असं म्हणत अंजली दमानिया यांनी मुंडे खोटं बोलत असल्याचा दावा केलाय.
